मुंबई, 27 जुलै: CBSE ने सांगितले की, 2023 (CBSE 12th Exam 2023 Dates) मध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा 15 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होतील. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्यामुळे निकालही लवकरच जाहीर होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी आणि तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना ही महत्वाची बातमी आहे. मात्र ही परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमावर असणार आहे. त्यामुळे इतक्या कमी कालावधीत पूर्ण कोर्स होणारका असा सवाल शाळा, विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. यंदा कोरोनामुळे परीक्षा टर्ममध्ये घेण्यात आल्यात त्यामुळे इतपर्यंत परीक्षा होऊ शकल्या नाहीत. टर्म दोनच्या परीक्षाही उशिरा सुरु झाल्या. त्यामुळे निकालही उशिरा लागले. मात्र या परीक्षांमध्ये आभासक्रम कमी होता. मात्र यंदा संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता शाळांकडे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी फार कमी वेळ उरला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे. मोठी बातमी! CAT Exam 2022 ची तारीख जाहीर; ‘या’ तारखेपासून करा रजिस्ट्रेशन
जवळपास दोन वर्षांच्या कमी झालेल्या अभ्यासक्रमानंतर 100 टक्के अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या तयारीच्या धोरणावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो असं मत काही मुख्याध्यापकांचं आहे. तर अचानक झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या सध्याच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो आणि बदललेल्या वेळापत्रकामुळे त्यांच्यावर दबाव वाढू शकतो. वार्षिक परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाच्या रचनेची पुनर्रचना करावी लागेल, असंही काही शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं म्हणणं आहे.
कसं असेल CBSE 2023 परीक्षेचं पॅटर्न
सेंट्रल कौन्सिल ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने सत्र 2022-23 साठी बोर्ड परीक्षांचा नमुना जाहीर केला आहे. पॅटर्ननुसार बोर्डाच्या परीक्षेत तेच विद्यार्थी पुढे असतील, जे रटाळ न करता समजून घेऊन अभ्यास करतील. यावेळी ऐच्छिक प्रश्न 50 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहेत. पॅटर्नमध्ये एकूण 30% पर्यायी प्रश्न कमी करण्यात आले आहेत. इंडियन नेव्हीमध्ये अग्निविरांसाठी भरती सुरु; पगारपाणी आणि पात्रतेविषयी माहिती असं असू शकतं पेपर पॅटर्न सत्र 2022-23 मध्ये, इयत्ता 9 ते 12 च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन विद्यार्थ्याच्या आकलनावर, सक्षमतेवर आधारित शिक्षणावर केंद्रित असेल. नवीन सत्राच्या परीक्षांमध्ये गुणवत्तेवर आधारित प्रश्नांची संख्या १० टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. यासंदर्भात मंडळाने सर्व मुख्याध्यापकांना परिपत्रक जारी केले आहे. 2021-22 च्या परीक्षेत 50% पर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. जे आगामी परीक्षांमध्ये 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे. इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षांसोबतच इयत्ता 9वी आणि 11वीच्या वार्षिक परीक्षाही त्याच प्रश्नपत्रिकेवर होतील. अंतर्गत मूल्यांकनात कोणताही बदल झालेला नाही.