Home /News /career /

CBSE 10th Result 2021: आज जाहीर होणार CBSE दहावीचा निकाल? जाणून घ्या ताज्या अपडेट्स

CBSE 10th Result 2021: आज जाहीर होणार CBSE दहावीचा निकाल? जाणून घ्या ताज्या अपडेट्स

आता यावर CBSE बोर्डाच्या प्रवक्त्या रमा शर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

    नवी दिल्ली, 02 ऑगस्ट: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE नं नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. आता दहावीचे विद्यार्थीही त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत. CBSE बोर्ड 10 वीचा निकाल (CBSE 10th Result date and time) या आठवड्यात जाहीर करेल असा दावा विविध माध्यमांच्या अहवालांमध्ये केला जात होता. त्याचबरोबर काही अहवालांमध्ये असेही म्हंटल जात आहे की CBSE बोर्ड आज निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र आता यावर CBSE बोर्डाच्या प्रवक्त्या रमा शर्मा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रमा शर्मा यांच्या म्हणण्याप्रमाणे, CBSE बोर्डाकडून अजून दहावीच्या निकाल संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकृत घोषणेची वाट बघावी. आज CBSE बारावीचा निकाल जाहीर होणार नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. हे वाचा - Maharashtra 12th Result 2021: कधी लागणार बारावीचा निकाल? लवकरच होणार घोषणा दरम्यान CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून रोल नंबर जारी करण्यात आले आहेत. इयत्ता 12 वी प्रमाणे, 10 वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल तपासण्यासाठी त्यांचे रोल नंबर ऑनलाईन डाउनलोड करावे लागतील. असा चेक करा रोल नंबर दहावीचा निकाल पाहण्यासाठी cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होम पेजवर 'रोल नंबर फाइंडर 2021' (Roll Number Finder 2021) या लिंकवर क्लिक करा. यानंतर सर्व्हर निवडा नेक्स्ट पेजवर 'Continue' वर क्लिक करा आता, 'वर्ग 10' निवडा विचारलेले सर्व तपशील एंटर करा. यानंतर तुमचा CBSE 10वीचा रोल नंबर जाणून घेण्यासाठी 'Search Data' वर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: 10th class, CBSE, Exam result

    पुढील बातम्या