• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • CAT 2021: विद्यार्थ्यांनो, परीक्षेची तारीख जाहीर; 'या' तारखेपासून सुरु होणार अप्लिकेशन्स

CAT 2021: विद्यार्थ्यांनो, परीक्षेची तारीख जाहीर; 'या' तारखेपासून सुरु होणार अप्लिकेशन्स

विविध पदव्युत्तर आणि सहकारी/डॉक्टरेट कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी CAT परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 02 ऑगस्ट: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) ने कॉमन अॅडमिशन टेस्ट (CAT 2021) ची अधिसूचना त्याच्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. यानुसार यंदा  28 नोव्हेंबरला CAT परीक्षा (CAT Exam date 2021) घेण्यात येणार आहे. हे परीक्षा कम्प्युटर बेस्ड असणार आहे. तीन सेशन्समध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे अशी माहिती नोटिफिकेशनमध्ये (CAT Exam Notification) देण्यात आली आहे. CAT 2021 परीक्षा भारतभरातील 158 परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल. उमेदवारांना त्यांच्या आवडीनुसार 6 टेस्ट शहरे निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमेदवारांना यासाठी मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडीचा वापर करून अप्लिकेशन रजिस्टर करावी लागणार आहे. या अप्लिकेशनसाठी शुल्कही भरावं लागणार आहे. SC, ST आणि PwD प्रवर्गातील उमेदवारांना यासाठी 1100/- रुपये शुल्क भरावं लागणार आहे. तर अन्य सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2200/– रुपये शुल्क भराव लागणार आहे. हे वाचा - 'तुम्ही सक्षम नाही' असं सांगत कंपनीनं दिला नकार; महिलेनं दिलं भन्नाट उत्तर विशेष म्हणजे उमेदवार कितीही संस्थानांसाठी अप्लाय करत असेल तर त्यांना एकदाच शुल्क भरावं लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे पैसे वाचणार आहेत. तसंच एकदा भरलेलं शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केलं जाणार नाहीये असं स्पष्ट करण्यात आलं आहे. विविध पदव्युत्तर आणि सहकारी/डॉक्टरेट कार्यक्रमांमध्ये प्रवेशासाठी CAT परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. कधी सुरु होणार रजिस्ट्रेशन CAT 2021 परीक्षेसाठी येत्या 04 ऑगस्ट 2021 पासून रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात आणि नोटिफिकेशन वाचूनच रजिस्ट्रेशन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. iimcat.ac.in या वेबसाईटवर उमेदवार नोटिफिकेशन बघू शकणार आहेत.
  Published by:Atharva Mahankal
  First published: