मुंबई, 22 मार्च: आजकालच्या तरुणाईमध्ये सरकारी नोकरीची (Government Jobs) क्रेझ प्रचंड वाढली आहे. ग्रॅज्युएशन कोणत्याही क्षेत्रात केलं असेल तरी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण तयारी (Government preparation) करत असतात. त्यात केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील कंपन्यांमध्ये किंवा विभागांमध्ये नोकरी (latest central government jobs) करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं प्रमाण अधिक असतं. अनेकजण एखाद्या महत्त्वाच्या पदासाठी तयारी करत असतात. सरकारी नोकरीतील काही महत्त्वाच्या पदांपैकी एक पद म्हणजे SDO म्हणजे सब डिव्हिजन ऑफिसर (Who is SDO?). SDO म्हणून जॉब (How to become Sub Division Officer) मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला SDO म्हणजे नक्की काय आणि SDO होण्यासाठी नक्की काय पात्रता (eligibility to become SDO) असणं आवश्यक आहे याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. SDO चं नक्की काम काय SDO म्हणजे उपविभागीय अधिकारी ज्याची नियुक्ती जवळपास प्रत्येक सरकारी विभागात केली जाते, तो एक विभाग स्तरावरील अधिकारी असतो, जो अनेक प्रकारची कामे करतो. एसडीओ प्रत्येक जिल्ह्य़ात प्रत्येक सरकारी विभागाचे अधिकारी लहान तुकड्यांमध्ये नियुक्त करतात. या अधिकाऱ्यांचे काम विभाग स्तरावर शासकीय कामकाज नीटपणे पार पाडण्याचे असते. देशातील सर्व नियमांमध्ये, प्रत्येक शहर आणि जिल्ह्यात एक एसडीओ नियुक्त केला जातो, जो सरकारी यंत्रणा सुरळीत चालवण्याची जबाबदारी घेतो. काय सांगता! 10 पैकी 6 कर्मचाऱ्यांना पुन्हा हवंय WFH; कमी पगारही मान्य अशी होते SDO ची निवड SDO होऊन सरकारी नोकरी मिळवायची असेल, तर SDO ची निवड प्रक्रिया जाणून घ्या. एसडीओची निवड सरकारकडून दोन प्रकारे केली जाते. पहिला मार्ग म्हणजे विभागीय पदोन्नती, विभागातील अधिकाऱ्याला त्याच्या उत्कृष्ट कामासाठी एसडीओ म्हणून बढती दिली जाते. दुसरीकडे, सरकार या पदांसाठी भरतीचे निर्देश देते. ज्यासाठी परीक्षाही घेतली जाते. एसडीओ अधिकाऱ्याची निवड राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. राज्य सरकार PSE (लोकसेवा आयोग) च्या परीक्षेद्वारे SDO ची निवड करते. दरवर्षी जवळपास प्रत्येक राज्य लोकसेवा आयोग एसडीओच्या निवडीसाठी परीक्षा घेतो. ही पात्रता असणं आवश्यक एसडीओ अधिकारी होण्यासाठी तुमचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. SDO परीक्षेत बसण्यासाठी, तुमच्याकडे संबंधित क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. सावधान! ऑफिसमध्ये जाण्यास कपडे निवडताना कधीच करू नका ‘या’ चुका; अन्यथा…. किती असतो SDO चा पगार सामान्यतः, SDO चे मासिक वेतन सुमारे 23,640 रुपये असू शकते, ज्यामध्ये भत्ते आणि ग्रेडचा स्वतंत्रपणे समावेश होतो, जे सुरुवातीला नव्याने नियुक्त झालेल्या SDO अधिकाऱ्याला दिले जातात. सर्व सुविधा आणि भत्ते एकत्र जोडल्यानंतर, एसडीओचा पगार दरमहा सुमारे 51,378 रुपये येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.