मुंबई, 02 फेब्रुवारी: आजकालच्या काळात नोकरीत बढती (Promotion in Office) किंवा वेतनवाढ (Salary Growth) मिळविण्यासाठी कठोर परिश्रमापेक्षा स्मार्ट वर्कची (How to do Smart work) जास्त गरज आहे. काही जॉब स्किल्स (Important Job Skills) तुम्हाला तुमच्या करिअरच्या प्रत्येक वळणावर यश मिळवण्यास मदत करतात मात्र हे स्किल्स तुमच्याकडे असणे महत्त्वाचे आहे. काही लोक खूप हुशार असूनही त्यांच्या करिअरमध्ये फार यश (How to be successful in Career) मिळवू शकत नाहीत. वास्तविक, करिअरची वाढ म्हणजेच तुमचे यश (Success tips) अनेक घटकांवर अवलंबून असते. तुमच्या वागण्या बोलण्यासोबतच काही स्किल्सही महत्त्वाचे असतात. आज आम्ही तुम्हाला याचबद्दल काही टिप्स (IMP tips for success in career) देणार आहोत ज्यामुळे तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. टेक्नॉलॉजीसोबत अपडेटेड राहा आता तंत्रज्ञानात खूप वेगाने प्रगती होत आहे यात शंका नाही. आजच्या गोष्टी उद्या जुन्या होतात. अशा परिस्थितीत या बदलांना सामोरे जाण्यासाठी स्वत:ला सक्षम बनवा. यासह, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप चांगली प्रगती साधू शकाल. सुवर्णसंधी! मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘या’ जागांसाठी Vacancy; करा अर्ज कामाची रणनीती बदला कार्यालयीन सहकाऱ्यांमधील पदोन्नतीच्या शर्यतीत आघाडीवर राहणे नेहमीच सोपे नसते. यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तसंच तुमच्या मेंदूचा योग्य वापर करावा लागेल. जर तुम्हाला तुमच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर अव्वल व्हायचे असेल तर तुम्हाला तुमची कामाची रणनीती बदलावी लागेल. नवीन संधींवर लक्ष ठेवा सोशल मीडियावर जॉब ग्रुपमध्ये कनेक्ट रहा. नोकरी उद्योगात होत असलेले बदल आणि नवीन संधी पाहत राहा. तुम्हाला कुठेतरी चांगली नोकरीची संधी मिळत असेल तर उशीर न करता अर्ज करा. आव्हानासाठी तयार रहा बदलत्या काळानुसार प्रत्येक उद्योगात काम करणे खूपच आव्हानात्मक बनले आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत काम करण्याची तयारी ठेवा. तथापि, काम आणि वैयक्तिक जीवन संतुलित ठेवा. Career Tips: Retirement नंतर बोरिंग जीवन जगू नका; करा ‘हे’ पार्ट टाइम जॉब्स; कमवा भरघोस पैसे
नवीन स्किल्स शिकत राहा
कोणत्याही कामात टिकून राहण्यासाठी किंवा पुढे जात राहण्यासाठी नवीन स्किल्स शिकणे आवश्यक आहे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या भागात येणारे फ्रेशर्स तुम्हाला मागे टाकतील आणि तुम्ही तिथेच राहाल.

)







