मुंबई, 10 ऑक्टोबर: बारावीनंतर NEET UG परीक्षा देऊन मेडिकल क्षेत्रात डॉक्टर होण्याचं स्वप्नं अनेकांचं असतं. म्हणून देशभरातील लाखो विद्यार्थी NEET ची तयारी करत असतात. मात्र सर्वांचं MBBS ला प्रवेश मिळू शकत नाही. म्हणून काही विद्यार्थी आयुर्वेदिक, होमिओपॅथी किंवा डेंटल क्षेत्रात डॉक्टर होतात. आतापर्यंत MBBS नंतर होमिओपॅथीला प्रचंड मागणी होती मात्र आता याची जागा आयुर्वेदनं घेतली आहे. म्हणूनच आता प्राचीन आयुर्वेदिकला मागणी वाढली आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदिकमध्ये करिअर करण्यासाठी टॉप 5 कोर्सेस सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. आयुर्वेदिक डॉक्टर आयुर्वेद क्षेत्रातील डॉक्टरांची मागणी वाढली आहे. येथे डॉक्टर होण्यासाठी बीएएमएस पदवी मिळवणे सर्वात महत्त्वाचे आहे. पदवीनंतर तुम्ही देशात आणि परदेशात कुठेही आयुर्वेदाचा सराव करू शकता. खाजगी आयुर्वेदिक वैद्यकीय दवाखान्यांव्यतिरिक्त, संशोधन केंद्र दवाखाना, सरकारी आणि खाजगी रुग्णालये, आयुर्वेदिक फार्मास्युटिकल्स यासारख्या ठिकाणी नोकरीच्या भरपूर संधी आहेत. फ्रेशर्ससाठी सर्वात मोठी खूशखबर! ‘ही’ नामांकित IT कंपनी तब्बल 5000 जागांवर करणार भरती
आयुर्वेद नर्सिंग मध्ये डिप्लोमा
आयुर्वेद नर्सिंगमध्ये अनेक प्रकारचे डिप्लोमा आहेत. तुम्ही त्यांची पदवी 6 ते 12 महिन्यांत पूर्ण करू शकता. यानंतर तुम्ही डॉक्टर किंवा नर्सिंग होममध्ये काम करू शकाल. यासाठी सरकारी रुग्णालयांमध्येही रिक्त पदे येत आहेत. आयुर्वेदिक उद्योग आयुर्वेदिक उद्योगात मोठा ग्राहकवर्ग तयार आहे. या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांची गरज आहे. येथे तुम्ही फ्रँचायझी देऊन किंवा आयुर्वेदिक औषधाचे उत्पादन करून तुमचे स्वतःचे उत्पादन सुरू करू शकता. UPSC Recruitment 2022: अर्जाचं शुल्क फक्त 25 रुपये आणि थेट अधिकारी पदांवर नोकरी; ही घ्या अप्लाय लिंक हीलिंग थेरपिस्ट आयुर्वेद हे केवळ औषधांपुरते मर्यादित नाही. इथे थेरपिस्टसाठीही भरपूर वाव आहे. योग शिक्षक, मसाज थेरपिस्ट, फिजिकल थेरपिस्ट आणि अॅक्युपंक्चर थेरपिस्ट यांसारख्या क्षेत्रात काम करता येते. त्याची मागणी देशातच नाही तर परदेशातही आहे.