मुंबई, 30 ऑक्टोबर: गेल्या काही दशकांमध्ये त्या त्या क्षेत्रात नोकरीपूर्वी इंटर्नशिपचा ट्रेंड खूप वाढला आहे. प्रत्येक क्षेत्रात नोकरी करण्यापूर्वी पेड किंवा अनपेड इंटर्नशिप करणं खूप महत्त्वाचं ठरत आहे. त्यामुळे करिअरला योग्य दिशा मिळण्यास मदत होते. इंटर्नशिपमुळे करिअरची सुरुवात करणाऱ्या व्यक्तीला ऑफिस कल्चरबद्दल माहिती मिळते आणि समज येते. परिणामी, त्यानंतर करिअरमध्ये चांगली प्रगती करता येते. जर तुम्ही इंटर्नशीप करत असाल किंवा करणार असाल तर काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. इंटर्न म्हणून काम करताना तुम्ही काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण काही महिन्यांची इंटर्नशीप तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. या काळात तुम्ही चमकदार कामगिरी केली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. कॉलेज सुरू असताना असो किंवा कॉलेजला मिळणाऱ्या सुट्टीत असो, केव्हाही इंटर्नशिप करताना खालील चुका टाळल्या पाहिजेत. IT Jobs: ‘या’ सर्वात मोठ्या आयटी कंपनीत फ्रेशर्स आणि विद्यार्थ्यांसाठीही जॉब्स; WFHचीही सुविधा 1) ड्रेसअप करण्याची पद्धत कपड्यांवरून एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावणं खूप सोपं आहे. तुम्ही कसे कपडे घालता यावरून लोक तुम्हाला जज करत असतात. त्यामुळे इंटर्नशिप करताना नेहमी साध्या आणि फॉर्मल ड्रेसमध्ये ऑफिसला जा. तसंच पायांमध्येही फॉर्मल शूज घाला. अशा ड्रेसअपमुळे तुमचा प्रोफेशनल लूक समोरच्या व्यक्तीच्या सहज नजरेत येतो. याशिवाय, कुर्ती जीन्स घालूनही तुम्ही ऑफिसला जाऊ शकता. कॅज्युअल किंवा रिव्हिलिंग कपडे घालून ऑफिसमध्ये कधीही जाऊ नका. 2) घाबरणं किंवा काम करण्यास नकार देणं इंटर्नशिपमध्ये एकाचवेळी असंख्य टास्क करावे लागतात. अशावेळी अजिबात घाबरू नका. जर तुम्हाला नेहमीच प्रमाणापेक्षा जास्त काम मिळत असेल तर त्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करा. यातील काही कामं कंटाळवाणीदेखील असतात. मात्र, कंटाळवाणा टास्कही चांगल्याप्रकारे पूर्ण करणं हे इंटर्नचं काम आहे. इंटर्नशिपमध्ये जास्तीतजास्त गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. यामुळे कामाची गुणवत्ता विकसित होते. याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होतो. विश्वास बसणार नाही पण हे खरंय! ग्रॅज्युएट्सना इथे थेट 50,000 रुपये सॅलरी; उद्या अर्जाची शेवटची तारीख 3) फीडबॅक न घेण्याची सवय ऑफिसमधील कोणतंही काम पूर्ण केल्यानंतर त्या कामासाठी तुमच्या टीम लीडर किंवा को-ऑर्डिनेटरकडून फीडबॅक घ्या. असं केल्यानं, तुम्ही केलेल्या चुका किंवा तुम्ही केलेल्या चांगल्या गोष्टी समजण्यास मदत होईल. चुका लक्षात आल्यानंतर त्या टाळून भविष्यात जास्त प्रगती करण्यास वाव असतो. म्हणून, ऑफिसमधील सीनिअर्सकडून कामाचा फीडबॅक घेण्याची सवय लावा. 4) ऑफिस कल्चरकडे दुर्लक्ष करणं प्रत्येक ऑफिसचं कल्चर वेगळं असतं. त्या ठिकाणच्या कामाची पद्धत वेगळी असते. तुम्ही त्या पद्धतीनं काम करणं अपेक्षित असतं. त्यामुळे कोणत्याही कंपनीत इंटर्नशिप करताना त्या कंपनीचं वर्क कल्चर समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार तुमचं काम करा. ऑफिसमध्ये होणाऱ्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्याचाही प्रयत्न करावा. असं केल्यानं आत्मविश्वास वाढतो तसंच वागण्यात सकारात्मकता येते. वरील चुका टाळल्यास तुम्ही एक चांगले इंटर्न ठरू शकता. इंटर्नशीपच्या काळात एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीसारखं जर तुम्ही काम केलं तर, कदाचित तिथेच तुम्हाला नोकरीही मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.