Home /News /career /

Career Tips: जॉब मिळवण्यासाठी Cover Letter लिहिताना कधीच करू नका 'या' चुका; जाणून घ्या योग्य पद्धत

Career Tips: जॉब मिळवण्यासाठी Cover Letter लिहिताना कधीच करू नका 'या' चुका; जाणून घ्या योग्य पद्धत

cover letter बनवताना पुढील चुका करू नका

cover letter बनवताना पुढील चुका करू नका

आज आम्ही तुम्हाला हे Cover Letter बनवताना नक्की कोणत्या चुका (Mistakes should avoid in Cover Letter) करू नयेत हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  मुंबई, 24 जानेवारी: कोणत्याही कंपनीत जॉब (Latest Jobs) मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा रेझ्युमे (Resume tips) म्हणजेच बायोडेटा तिथल्या वरिष्ठांना द्यावा लागतो. तुमच्या बायोडेटामधील माहितीनुसार तुमच्याबद्दल प्रत्येक माहिती समोरच्यांना समजते. मात्र अनेकदा कंपनीत तुमचा एकच बायोडेटा नसतो. वरिष्ठांना हजारो बायोडेटा (How to make biodata) मिळत असतात. त्यामुळे तुमचा बायोडेटा पूर्णपणे वाचला जाईलच असं नाही. त्यामुळे अनेकांना जॉब (Latest Jobs) मिळू शकत नाही. मात्र तुम्हाला जॉब हवा असेल तर बायोडेटासह Cover Letter देणंही (How to make Cover Letter for jobs) महत्त्वाचं आहे. अगदी फ्रेशर्सपासून (How to make cover letter for freshers) ते प्रोफेशनल्सपर्यंत (How to make cover letter for professionals) सर्वांना Cover लेटर आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला हे Cover Letter बनवताना नक्की कोणत्या चुका (Mistakes should avoid in Cover Letter) करू नयेत हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. कंपनीबद्दल माहिती न घेणे   पोझिशन आणि कंपनीच्या गरजेनुसार कव्हर लेटर लिहिण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. कंपनीचे संशोधन (how to research for company) केल्याने तुम्हाला त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी ओळखण्यात मदत होते आणि कोणती माहिती समाविष्ट करायची हे निर्धारित करण्यात मदत होते. कव्हर लेटर लिहिण्यासाठी उत्तम संशोधन हा सहसा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मात्र अनेकदा माहिती न घेता कव्हर लेटर बनवल्यामुळे नोकरी हातची जाऊ शकते. म्हणूनच कंपनीची आणि पोस्टची संपूर्ण माहिती घेऊनच कव्हर लेटर बनवणं आवश्यक आहे. तुम्हालाही गूढ गोष्टींची आवड आहे? मग Archaeologist म्हणून असं घडवा Career तुमच्यातील क्षमता न लिहिणे तुमचे कव्हर लेटर तुमची सर्वात मोठी ताकद असलेली कौशल्ये हायलाइट (How to highlight Skills in Cover letter) करत आहे का हे बघणे आवश्यक आहे.तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्याच्याशी संबंधित आहे का हेही बघणे महत्त्वाचे आहे. ही कौशल्ये तुमच्यासाठी एक ताकद आहेत हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे असलेल्या अनुभवांचा आणि कर्तृत्वाचा विचार करा. जे तुम्हाला भूमिकेत यशस्वी होण्यास मदत करणार नाहीत अशा कौशल्यांचा उल्लेख करणे टाळा. कव्हर लेटरमध्ये पगाराबद्दल माहिती नको तुमचा कव्हर लेटर तुमच्या वर्तमान पगाराची किंवा पगाराच्या अपेक्षांवर चर्चा करण्यासाठी योग्य जागा नाही जोपर्यंत नियोक्ता तुम्हाला असे करण्यास सांगत नाही. पगाराच्या अपेक्षांबद्दल खूप लवकर बोलल्याने असे दिसते की तुम्हाला कंपनीला कसा फायदा होऊ शकतो यापेक्षा नोकरीतून मिळणाऱ्या फायद्यांमध्ये तुम्हाला अधिक रस आहे. म्हणून कव्हर लेटरमध्ये पगाराबद्दल लिहू नका.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, Jobs, Tips

  पुढील बातम्या