मुंबई, 02 जानेवारी: इलेक्ट्रिकल, (Electrical Engineering Career) मेकॅनिकल (Mechanical Engineer Career), सिव्हिल (Civil) आणि कम्प्युटर (Computer Engineering career tips) इंजिनीरिंगप्रमाणेच सध्या इंजिनिअरिंगच्या अजून एका ब्रांचला प्रचंड महत्त्वं प्राप्त होतंय. ती ब्रांच म्हणजे एरोस्पेस इंजिनीरिंग (Aerospace Engineering). या ब्रांचकडे विद्यार्थ्यांचा कल सध्या वाढतच चालला आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये (Education and Career in Aerospace Engineering) शिक्षण आणि करिअर कसं करणार याबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. एरोस्पेस इंजिनिअरिंग नक्की आहे तरी काय? एरोप्सेस इंजिनिअरिंग (Aerospace Engineering). हे पूर्णतः डिझाईनिंगवर अवलबूंन आहे. विमान, एअरक्राफ्ट , सॅटेलाईट किंवा मिसाईल डिझायनिंगच काम करणे म्हणजे एरोस्पेस इंजिनिअरिंग. यात विद्यार्थ्यांना अनेक करिअरच्या संधी उपलब्ध असतात. Career Tips: नवीन वर्षात करिअरमध्ये मिळेल मोठं यश; या महत्वाच्या गोष्टी वाचा हे शिक्षण असणं आवश्यक एरोस्पेस इंजिनिअरिंग करण्यासाठी बारावीमध्ये सायन्स स्ट्रीममधून शिक्षण घेणं आवश्यक आहे. तसंच फीजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स हे विषय असणं आवश्यक आहे. एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन करण्यासाठी सर्वात आधी इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम (Entrance Exam) देणं आवश्यक आहे. JEE मेन, JEE Advanced, BITSAT, SRMJEEE, VITEEE, AEEE, VTUEEE, GATE यापैकी कोणतीही प्रवेश परीक्षा पास करणं महत्त्वाचं आहे. हे आहेत टॉप कॉलेजेस फ्लायटेक एव्हिएशन अकॅडमी, सिकंदराबाद व्हीएसएम इंस्टिट्यूट ऑफ एरोस्पेस अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, बंगलोर जया अभियांत्रिकी महाविद्यालय, तिरुवल्लूर हिंदुस्तान तंत्रज्ञान संस्था, कोयंबटूर (तमिळनाडू) भारत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्था (बीआयईटी), हैदराबाद राजस्थान तंत्रज्ञान व अभियांत्रिकी विज्ञान कोटा वैमानिकी व सागरी अभियांत्रिकी संस्था, बंगळुरू (कर्नाटक) हिंदुस्तान अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था (एचआयईटी), चेन्नई गुरू ग्राम इंस्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, नागपूर भारतीय वैमानिकी अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे (महाराष्ट्र) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजीनियरिंग, देहरादून पार्क कॉलेज ऑफ अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कोयंबटूर Career Tips: Successful होण्यासाठी तुमच्याकडे ‘हे’ स्किल्स असणं आवश्यक; वाचा करिअरच्या संधी एरोस्पेस इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढील संस्थानांमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता असते. विमान कंपन्या (Airlines) हवाई दल (Air Force) हेलिकॉप्टर कंपन्या (Helicopter companies) संरक्षण मंत्रालय (Ministry of Defense) क्षेपणास्त्र (Missiles) अवकाशयान (Spacecraft)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







