मुंबई, 15 डिसेंबर: आपल्या मुलांनी सायन्स क्षेत्रात जाऊन वैज्ञानिक (Scientist Career) व्हावं अशी इच्छा अनेक पालकांची असते. किंबहुना अशी अपेक्षा घेऊनच पालक मुलांकडे बघत असतात. मात्र प्रत्येकालाच हे जमेल असं नाही. वैज्ञानिक (How to become Scientist) होण्यासाठी अंगी गुण आणि इच्छाशक्ती असणं महत्त्वाचं असतं. तसंच आवड असणंही महत्त्वाचं आहे. जर तुम्हालाही विज्ञानात (career as Scientist) प्रचंड आवड असेल तर तुम्ही रिसर्च फिल्डमध्ये (Career in Research Field) जाऊ शकता. वैज्ञानिक होण्यासाठी नक्की कोणते पात्रतेचे निकष (Eligibility for Scientist) पूर्ण करणं आवश्यक आहे? तसंच वैज्ञानिक होण्यासाठी कोणतं शिक्षण (Education to become Scientist) घेणं आवश्यक आहे? याबद्दलच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
शास्त्रज्ञ होण्यासाठी तुमच्यात अनेक गुण असले पाहिजेत, तरच तुम्ही यशस्वी वैज्ञानिक बनू शकता. शास्त्रज्ञ होण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते गुण आणि क्षमता असायला हव्यात.
शास्त्रज्ञ होण्यासाठी तुमच्यात एक आवड, आवड असणं आवश्यक आहे आणि ते तुमच्या गोलपर्यंत पोहोचेपर्यंत असलं पाहिजे. केवळ वैज्ञानिकच नाही तर जीवनात तुम्हाला जे काही ध्येय गाठायचं आहे, ते साध्य करण्याची तळमळ असली पाहिजे. तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या स्तरावर सर्वोत्तम प्रयत्न करणं सर्वात महत्त्वाचे आहे.
कॉमर्समध्ये शिक्षणानंतर जॉबच्या शोधात आहात? मग 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअर
ज्या विद्यार्थ्याला लहानपणापासूनच विज्ञान आणि त्यासंबंधित इतर विषयांमध्ये जास्त रस असेल, त्या व्यक्तीला वैज्ञानिक बनण्याचा अधिकार आहे. विज्ञानात स्वारस्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, हे एक योग्य क्षेत्र असू शकतं जिथून ते त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकतात. शास्त्रज्ञ होण्यासाठी पुस्तकी ज्ञानापेक्षा अधिक व्यावहारिक ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जे शिकता ते दैनंदिन जीवनात वापरायला विसरू नका.
हे शिक्षण घेणं आवश्यक
शास्त्रज्ञ होण्यासाठी कोणताही विशेष अभ्यासक्रम नसतो. शास्त्रज्ञ होण्यासाठी तुम्हाला दहावीनंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांपासून सुरुवात करावी लागेल. यानंतर, एमएससी, एम फिल, पीएचडी, अभियांत्रिकी इत्यादी समान विषयांमध्ये उच्च शिक्षण पदवी आणि पदव्युत्तर केल्यानंतर, वेळोवेळी शास्त्रज्ञांच्या पदांसाठी अर्ज करता येतो. सुरुवातीला तुम्हाला रिसर्च असोसिएट, जुनिअर रिसर्च असोसिएट म्हणून नोकरी मिळू शकते.
किती मिळतो पगार
शास्त्रज्ञांची नोकरी ही ए ग्रेडची नोकरी आहे, त्यामुळे त्यांना सुरुवातीपासून खूप चांगला पगार मिळतो जो वेळ आणि अनुभवानुसार वाढत जातो. पगाराव्यतिरिक्त शास्त्रज्ञांना अनेक भत्ते वगैरेही मिळतात आणि पगारापेक्षा जास्त मान या क्षेत्रात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Scientist, जॉब