जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Talathi Bharti 2022: तरुणांनो, तुम्हीही तलाठी होण्याचं स्वप्न बघताय? मग 'ही' महत्त्वाची पुस्तकं येतील कामी; बघा लिस्ट

Talathi Bharti 2022: तरुणांनो, तुम्हीही तलाठी होण्याचं स्वप्न बघताय? मग 'ही' महत्त्वाची पुस्तकं येतील कामी; बघा लिस्ट

तलाठी पदाच्या परीक्षेसाठी उपयोगी काही पुस्तक

तलाठी पदाच्या परीक्षेसाठी उपयोगी काही पुस्तक

आज आम्ही तुम्हाला तलाठी पदाच्या परीक्षेसाठी उपयोगी काही पुस्तकांची (Important books for Talathi Preparation) माहिती देणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 एप्रिल: संपूर्ण देशभरात सरकारी नोकरीसाठी (Government Jobs) तयारी करणाऱ्या तरुण तरुणींची कमी नाही. अनेक उमेदवार हे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी जीवतोड मेहनत करत असतात. महाराष्ट्रातही तरुण-तरुणी MPSC (MPSC Preparation), पोलीस भरती (Police recruitment jobs), तलाठी (Talathi Preparation) अशा अनेक सरकारी पदांवर नोकरी (How to get government Jobs) मिळवण्यासाठी अभ्यास करत असतात. यामध्ये काही जणांना यश मिळतं तर काही जण अपयशी होतात. यात तलाठी (How to become Talathi) हे असं पद आहे ज्या पदावर काम करण्यासाठी आणि नोकरी मिळवण्यासाठी हजारो तरुण परीक्षा देतात. मात्र ही परीक्षा (How to crack Talathi Exams) पास करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हीही तलाठी होण्यासाठी अभ्यास करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला तलाठी पदाच्या परीक्षेसाठी उपयोगी काही पुस्तकांची (Important books for Talathi Preparation) माहिती देणार आहोत. ज्यामधून तुम्ही अभ्यास करून नक्कीच नोकरी मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. UPSC Tips: उमेदवारांनो, UPSC ची मुलाखत देण्याआधी वाचा टिप्स; नक्की व्हाल IAS

नक्की कोण असतात तलाठी?

तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा वर्ग – 3 चा कर्मचारी असतो. म्हणजेच तलाठी हे गट ‘अ’ प्रकारचे पद आहे. तलाठ्यावर नजिकचे नियंत्रण सर्कल ऑफिसरचे (मंडल अधिकारी) व तद्नंतर तहसीलदाराचे असते. महसूल खात्याचे गावपातळीवरील दप्तर तलाठी सांभाळतो. जमीन महसूलाबाबत कोणताही अर्ज सर्वप्रथम तहसीलदार बघतो. त्यावर योग्य तो निर्णय घेऊन मग तो पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर निश्चित केलेली नोंदणी पुस्तके, अभिलेख ठेवण्याचे कार्य तलाठी करतो. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार गाव पातळीवरील महसूलविषयक कामांची जबाबदारी तलाठी पार पाडतो. अभ्यासासाठी काही महत्त्वाची पुस्तकं 1. Essential English for competitive examinations by Dr. Rashmi Singh भारतातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे प्रत्येक आवश्यक विषय आणि MCQ चे प्रत्येक आवश्यक प्रकार आणि नमुना समाविष्ट करते. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेच्या इंग्रजी विभागात उच्च गुण मिळवण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. 2. Rapid general knowledge 2021 for competitive exams by Disha Publications या पुस्तकामुळे तुम्हाला संपूर्ण जनरल नॉलेज आणि करंट अफेयर्सबाबत जाणून गंजण्यास मदत होईल. तसंच परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात तुम्हाला मिळू शकतील. 3. Dnyandeep Talathi 2022 Vargikrut Prashnasanch by Jitendra Pundekar या पुस्तकात तुम्हाला तलाठी परीक्षेत विचारले जाणारे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं मिळतील. हे एक ऑल इन वन पुस्तक आहे असं म्हणता येईल. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्नही मिळतील. JOB ALERT: ‘या’ जिल्ह्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयात होणार पदभरती; करा अर्ज

4. Talathi Chalis Prashnapatrika (Marathi) by Vinayak Ghayal

तलाठी परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी हे पुस्तक म्हणजे संजीवनी आहे. यामध्ये उमेदवारांना तलाठी परीक्षेतील काही प्रश्नपत्रिका मिळतील. या प्रश्नपत्रिकांद्वारे तुम्ही थेट परीक्षेची तयारी करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात