जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: जगभरात counselling क्षेत्राला वाढतेय प्रचंड मागणी; तुम्हीही होऊ शकता प्रोफेशनल काउन्सिलर; कसे ते वाचा

Career Tips: जगभरात counselling क्षेत्राला वाढतेय प्रचंड मागणी; तुम्हीही होऊ शकता प्रोफेशनल काउन्सिलर; कसे ते वाचा

आज पालकांसाठी काही टिप्स

आज पालकांसाठी काही टिप्स

आज आम्ही तुम्हाला काऊन्सिलिंगमध्ये करिअर कसं करणार आणि त्यासाठी कोणते कोर्सेस महत्त्वाचे आहेत? याबाबत माहिती देणार आहोत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी: आजकाल शिक्षण (Education News), नोकरी (Job news in Marathi), पैसे, प्रॉपर्टी याबाबत काहीई समस्या असल्यास किंवा संभ्रम असल्यास लोक त्या संबंधित क्षेत्रातील काउन्सिलरकडे (Education Counsellors) जातात.कोणत्याही क्षेत्रातील समस्येवर योग्य ते समाधान देण्याचं काम काउन्सिलर (Work profile of Counsellors) करतात. तसंच यामध्ये काही सल्लाही देण्याचं काम काउन्सिलर करतात. आजकालच्या काळात करिअर काउन्सिलर (How to become Career Counsellor) किंवा एज्युकेशन काऊन्सिलर्सची मागणी प्रचंड मागणी प्रचंड वाढली आहे. यात करिअर (Career in Counselling) आणि पैसे कमावण्याच्याही (How to earn money by Counselling) अनेक संधी आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काऊन्सिलिंगमध्ये करिअर कसं करणार आणि त्यासाठी कोणते कोर्सेस (Courses for Counselling in India) महत्त्वाचे आहेत? याबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. काउन्सिलर होण्यासाठी काही महत्त्वाचे कोर्सेस सर्टिफिकेट इन काउन्सिलिंग डिप्लोमा इन एज्युकेशन काउन्सिलिंग बीए/ बीएससी इन साइकोलॉजी/ एप्लाइड साइकोलॉजी एमए इन काउन्सिलिंग साइकोलॉजी एमएड इन गायडन्स साइकोलॉजी पीजी डिप्लोमा इन साइकोलॉजिकल काउन्सिलिंग MBA की MCA? ग्रॅज्युएशननंतर नक्की कोणत्या क्षेत्रात करावं PG; जाणून घ्या माहिती कांऊन्सिलर होण्यासाठी ही पात्रता आवश्यक तुम्हाला काउन्सिलर व्हायचे असेल तर तुमचे इतरांचे ऐकण्याचे कौशल्य चांगले असले पाहिजे. लोकांचे म्हणणे कसे ऐकायचे आणि त्यांचा दृष्टिकोन कसा समजून घ्यायचा हे तुम्हाला माहित असले पाहिजे. काउन्सिलरसाठी हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. तसेच काउन्सिलरने प्रत्येक परिस्थितीत संयम राखला पाहिजे. कितीही विषम परिस्थिती असली तरी काउन्सिलरकडे परिस्थिती हाताळण्याची क्षमता असली पाहिजे. काउन्सिलर होण्यासाठी तुमच्याकडे दुसऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची इच्छा असली पाहिजे. तरच तुम्ही एक चांगले काउन्सिलर होऊ शकाल. या विद्यापीठांमध्ये घेऊ शकाल शिक्षण दिल्ली विद्यापीठ, दिल्ली जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली राष्ट्रीय सार्वजनिक सहकार आणि बाल विकास संस्था, नवी दिल्ली राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली महर्षि दयानंद विद्यापीठ, रोहतक बनारस हिंदू विद्यापीठ, बनारस टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई पंजाब विद्यापीठ, चंदीगड अलीगढ विद्यापीठ, अलीगढ ख्रिस्त विद्यापीठ, बंगलोर परदेशात शिक्षण घ्यायचंय पण पैसे नाहीत? चिंता नको; अशा पद्धतीनं मिळतील पैसे किती असतो काउन्सिलरचा पगार काउन्सिलर म्हणून नोकरी करताना तुम्हाला सुरुवातीला 15,000 ते 40,000 रुपये प्रतिमहिना पर्यंत पगार मिळू शकतो. तसंच काउन्सिलर म्हणून तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरु करू शकता. लोकांना सल्ला देऊन आणि मदत करू पैसे कमवू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात