मराठी बातम्या /बातम्या /करिअर /12 वी नंतर कशात करिअर करणार? या कोर्सनी सेट होऊन जाईल आयुष्य!

12 वी नंतर कशात करिअर करणार? या कोर्सनी सेट होऊन जाईल आयुष्य!

12 वी नंतर करा हे कोर्स, सेट होऊन जाईल आयुष्य

12 वी नंतर करा हे कोर्स, सेट होऊन जाईल आयुष्य

बारावी पास झाल्यानंतर 'पुढे काय' हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला विचारला गेला असेल. करिअरच्या वेगवेगळ्या शाखा आणि मार्ग यांमधली विविधता म्हणजे एक मोठाच गुंता असतो.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 16 मार्च : बारावी पास झाल्यानंतर 'पुढे काय' हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला विचारला गेला असेल. करिअरच्या वेगवेगळ्या शाखा आणि मार्ग यांमधली विविधता म्हणजे एक मोठाच गुंता असतो. त्यातून आपल्याला नेमकं काय हवंय हे निवडणं म्हणजे एक कोडंच असतं. खरं तर करिअर निवडण्याचा निर्णय आई-वडील आणि मूल अशा दोन्ही बाजूंनी एकत्रितरीत्या विचारविनिमय करून घेतला पाहिजे. त्यामध्ये आपली सांपत्तिक स्थिती, आपल्याला असलेली आवड आणि त्या क्षेत्राला भविष्यात असलेल्या संधी या बाबींचा विचार करायला हवा. तंत्रज्ञानाधारित रोजगारांच्या संख्येत सध्या वाढ झाली आहे. त्यामुळे उज्ज्वल भवितव्य असलेल्या करिअर मार्गाची निवड करणं महत्त्वाचं आहे. बारावीनंतर निवडता येण्याजोगे आघाडीचे तीन करिअर ऑप्शन्स आपण पाहू या.

  व्हिडिओ एडिटर : व्हिडिओ एडिटिंग म्हणजे असं क्षेत्र आहे, की ज्यात तंत्रज्ञान आणि कला यांच्या संयोगाने चलच्चित्रणाचा प्रभाव वाढवायचा असतो. हे वैविध्यपूर्ण क्षेत्र आहे. त्यात कंटेंट डेव्हलपर्स, फिल्म एडिटर्स, व्हिडिओ कंटेंट डेव्हलपर्स, मल्टिमीडिया डिझायनर्स, ब्रॉडकास्ट इंजिनीअर्स आणि अ‍ॅनिमेटर्स आदींचा समावेश असतो.

  पोर्टफोलिओ मजबूत असल्यास वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ एडिटिंग जॉब्ज मिळू शकतात. हे अशा प्रकारचं क्षेत्र आहे, जिथे शैक्षणिक गुणवत्तेपेक्षा अनुभवावर किंवा कौशल्यावर जास्त भर दिला जातो. एक पर्याय म्हणून फिल्म एडिटिंगमध्ये सर्टिफिकेशन घेऊ शकता.

  डिजिटल मार्केटिंग : अनेक कंपन्या आपल्या सेवा आणि उत्पादनांच्या जाहिरातीसाठी सोशल मीडिया, ई-मेल, ब्लॉग्ज, डिजिटल अ‍ॅडव्हर्टायझिंग आदी माध्यमांचा वापर करतात. त्याला डिजिटल मार्केटिंग असं म्हणतात. डिजिटल फूटप्रिंट तयार करणं आणि ऑडियन्स स्पेसिफिक कॅम्पेन्स तयार करणं या दोन्ही गोष्टी या प्रक्रियेचा भाग आहेत. डिजिटल मार्केटिंगचा व्यवस्थापक कायम ट्रेंड्सवर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे नेमक्या कोणत्या गोष्टींमुळे शोधलं जाण्याची क्षमता वाढते हे लक्षात येतं.

  मार्केटिंगची पारंपरिक पद्धत अद्याप प्रभावी आहे; मात्र त्याची जागा डिजिटल मार्केटिंग वेगाने घेत आहे. कारण त्यातून विश्लेषण चांगल्या प्रकारे करता येतं आणि माहिती सहज उपलब्ध होते. या क्षेत्रात तब्बल 8,60,000 एवढ्या ओपनिंग्ज आहेत. लिंक्डइनने असा दावा केला आहे, की अत्यंत मागणी असलेल्या आघाडीच्या 10 पोस्ट्समध्ये डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट ही एक महत्त्वाची पोस्ट आहे. सोशल मीडिया, कंटेंट प्लॅनिंग, एसईओ, अ‍ॅनालिटिक्स आणि डिजिटल मार्केटिंगची अन्य कौशल्यं अवगत असलेल्या उमेदवारांना मोठी मागणी आहे.

  सायबर सिक्युरिटी इंजिनीअर : सायबर सिक्युरिटी इंजिनीअर्सना इन्फॉर्मेशन सिक्युरिटी इंजिनीअर्स असंही म्हणतात. कम्प्युटर सिस्टीम्स, सॉफ्टवेअर्स आदींना असलेला धोका शोधून काढणं, तसंच हॅकिंग, मालवेअर, रॅन्समवेअर आणि सर्व प्रकारच्या सायबर क्राइम्सवर उच्च तंत्रज्ञानाच्या साह्याने उपाय शोधणं आणि राबवणं हे या इंजिनीअर्सचं काम असतं. सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना, नियम आदींबद्दल चर्चा करणारा तो एक महत्त्वाचा टीम मेंबर असतो. फायनान्शियल सर्व्हिसेस, सरकारी संस्था, आरोग्य यंत्रणा, उत्पादक आणि रिटेल यंत्रणा आदी क्षेत्रांत सायबर सिक्युरिटी इंजिनीअर्सना करिअरच्या संधी आहेत. जग डिजिटलायझेशनकडे वेगाने वाटचाल करत आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी इंजिनीअर्सचा समावेश जगभरात सर्वत्र सर्वोच्च उत्पन्न मिळवणाऱ्या प्रोफेशनल्समध्ये होऊ शकतो.

  First published: