मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: नक्की काय आहे व्हर्च्युअल गेमिंग? या क्षेत्रात अशी करू शकता लाखोंची कमाई

Career Tips: नक्की काय आहे व्हर्च्युअल गेमिंग? या क्षेत्रात अशी करू शकता लाखोंची कमाई

व्हर्च्युअल गेमिंग

व्हर्च्युअल गेमिंग

आता या क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. चला तर जाणून घेऊयात या क्षेत्रात कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 ऑक्टोबर:   आजच्या काळात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ऑनलाइन व्हर्च्युअल गेम खेळायला आवडतं. मुलांची तर ऑनलाइन गेम खेळण्याची सवय सोडण्यासाठी पालकांना मोठी कसरतच करावी लागते. तुम्हीही आयुष्यात कधी ना कधी एखादा ऑनलाइन गेम खेळलाच असाल, मग तो नोकियाच्या कीपॅड मोबाईलमधला स्नेक गेम असो, किंवा स्मार्टफोनमधला पबजी. पण तुम्हाला माहिती आहे का, आता या क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे. चला तर जाणून घेऊयात या क्षेत्रात कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत.

गेमिंग कोर्स

आजकाल ऑनलाइन गेमिंग करिअरमध्ये विविध प्रकारचे कोर्स उपलब्ध आहेत. गेम डिझायनिंग, गेम डेव्हलपर, ग्राफिक डिझायनिंग, गेम स्टोरी लिहिणं, गेम प्रोग्रॅम तयार करणं अशा विविध गोष्टींचा गेमिंग कोर्समध्ये समावेश होतो. हे कोर्स करून तुम्ही दरमहा लाखोंची कमाई करू शकता. या क्षेत्रात डिप्लोमा, पदवी अर्थात बॅचलर डिग्री, पदव्युत्तर म्हणजेच मास्टर्स डिग्री हे तिन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

SSC CGL 2022: तब्बल 20,000 पदं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब; उद्याची शेवटची तारीख

प्रवेश घेण्यासाठी पात्रता

1. ज्या विद्यार्थ्यांना सर्टिफेकट/डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्रीसाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

2. पदव्युत्तर पदवी अर्थात मास्टर्स डिग्रीसाठी या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमात बॅचलर म्हणजे पदवी घेतलेली असणं आवश्यक आहे. तर काही विद्यापीठांमध्ये यासाठी प्रवेश परीक्षासुद्धा घेतली जाते.

3. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्येही हा अभ्यासक्रम शिकवला जातो. मात्र, परदेशातील बहुतेक विद्यापीठांमध्ये या अभ्यासक्रमाला प्रवेश देताना मास्टर्स डिग्रीसाठी GRE स्कोअर तर बॅचलर डिग्रीसाठी SAT स्कोअर विचारात घेतला जातो. त्यामुळे परदेशातून हा अभ्यासक्रम पूर्ण करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या दृष्टीने तयारी करणं आवश्यक आहे.

4. परदेशात शिकण्यासाठी लँग्वेजची एक्झाम देण्याचीही आवश्ययकता आहे. कारण बहुतेक परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी आयईएलटीएस (IELTS) किंवा टीओईएफएफ (TOEFL) चाचणीचा स्कोअर विचारात घेतला जातो.

या आहेत गेमिंगमधील टॉप करिअरच्या संधी

1.गेम अॅनिमेटर

2.गेम मेकर

3.ऑडिओ इंजिनीअर

4. क्रिएटिव्ह डायरेक्टर

5.गेम डिझायनर

6.गेम प्रोग्रॅमर

7. गेम आर्टिस्ट

8.लीड आर्टिस्ट

9.गेमिंग रायटर

10.गेम टेस्टर

व्हिडीओ गेम्स खेळण्याच्या वयात पठ्ठयानं सुरु केली कंपनी; आज 100 कोटींची उलाढाल

गेमिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी उमेदवार क्रिएटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ते त्यांच्या कल्पनेनुसार गेम डिझाइन करतात. तसंच त्याला कॉम्प्युटरचं ज्ञान, गेमिंग सॉफ्टवेअर आणि गेमिंग थिअरी यांचीही थोडीफार माहिती असणं आवश्यक आहे. गेमिंग क्षेत्रात कोर्स केल्यानंतर तुम्हाला गेमिंगशी संबंधित अनेक कंपन्यांमध्ये नोकरी मिळू शकते. तसंच तुम्ही स्वतःची गेमिंग कंपनीदेखील सुरू करु शकता. त्यामुळे येणाऱ्या काळात या क्षेत्रात उत्तम करिअरच्या संधी आहेत.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert