जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / NEET शिवायही मेडिकलमध्ये बनवू शकता करिअर; लाखों रुपयात मिळेल पगार

NEET शिवायही मेडिकलमध्ये बनवू शकता करिअर; लाखों रुपयात मिळेल पगार

NEET शिवायही मेडिकलमध्ये बनवू शकता करिअर; लाखों रुपयात मिळेल पगार

मेडिकल शाखेत प्रवेश हवा आहे पण नीट परीक्षा नको मग हे कोर्सेस तुमच्यासाठी उत्तम आहेत.

    मुंबई, 24 जुलै : जीवनात यशस्वी डॉक्टर (Doctor) व्हावं, रुग्णसेवा करावी, असं स्वप्न अनेक तरुण-तरुणी पाहतात. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शालेय जीवनापासूनच खूप मेहनतही केली जाते. सध्याच्या शिक्षण पद्धतीनुसार मेडिकल शाखेत (Medical) प्रवेश मिळण्यासाठी नीट परीक्षा (NEET Exam) उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. इयत्ता 12 वीचे गुण आणि नीट परीक्षेच्या गुणांच्या आधारे संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनीला देशातल्या टॉप मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस (MBBS) किंवा बीडीएस (BDS) या शाखांना प्रवेश दिला जातो. काही कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना नीट परीक्षा देणं किंवा या परीक्षेत अपेक्षित गुण मिळवणं साध्य होत नाही. त्यामुळे सायन्स शाखेची दारं आपल्यासाठी बंद आहेत, अशी भावना या विद्यार्थ्यांमध्ये तयार होते; पण असा विचार चुकीचा आहे. कारण नीट परीक्षा न देतादेखील सायन्स शाखेचं शिक्षण घेऊन उत्तम करिअर (Career) करू शकता. असे काही कोर्स आहेत की ज्यासाठी नीट परीक्षा देणं अनिवार्य नाही. इयत्ता 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षेसोबतच मेडिकल शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी नीट परीक्षेची तयारी करतात; पण रिपोर्ट नुसार ही परीक्षा न देतादेखील तुम्ही मेडिकल क्षेत्रात उत्तम करिअर करू शकता. इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुमच्यासाठी बीएस्सी बायोटेक्नोलॉजी (BSc Biotechnology) हा उत्तम पर्याय आहे. यासाठी नीट परीक्षा पास होणं गरजेचं नाही. या शाखेत उत्तीर्ण झाल्यानंतर बायोटेक्नोलॉजिस्ट म्हणून तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता. हे वाचा -  ऑटोमोबाईल क्षेत्रात रस आहे पण जॉब नाही? चिंता नको राव; पुण्यातील कंपनीत मिळतेय नोकरी जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी किंवा मॅथ्स हे विषय घेऊन इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही चार वर्षांचा बीएस्सी नर्सिंग (BSc Nursing) हा कोर्स करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्टाफ नर्स, रजिस्टर्ड नर्स (आरएन), नर्स टीचर, मेडिकल कोड या पोस्टसाठी अर्ज करू शकता. नर्सिंग कोर्ससाठी नीट परीक्षा देण्याची गरज नाही. परंतु, काही राज्यांमध्ये नीट परीक्षेतल्या गुणांच्या आधारे बीएस्सी नर्सिंगचे प्रवेश सुरू केले आहेत. बीएस्सी नर्सिंग केल्यानंतर तुम्ही वर्षाला तीन लाख ते आठ लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. खासकरून विद्यार्थिनींसाठी हा कोर्स उत्तम पर्याय आहे. इयत्ता 12वी नंतर बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर (BSc Agriculture) हादेखील चांगला पर्याय आहे. देशातली अनेक कॉलेजेस आणि विद्यापीठांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. विशेष म्हणजे यासाठी फीदेखील कमी आहे. बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर झाल्यानंतर तुम्ही अ‍ॅग्रोनॉमिस्ट, अ‍ॅग्रीकल्चर सायंटिस्ट, अ‍ॅग्रीबिझनेस आदी क्षेत्रांत काम करू शकता. हे शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळाल्यास किंवा उत्तम व्यवसायाचा जम बसल्यास तुम्ही वर्षाला नऊ ते दहा लाख रुपये कमावू शकता. हे वाचा -  क्या बात है! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी नोकरीची बंपर ऑफर; ‘या’ पदांवर मिळेल उत्तम पगाराचा जॉब बीएस्सी न्यूट्रिशन अँड डाएटिशियन (BSc Nutrition And Dietitian), ह्युमन न्युट्रिशन, फूड टेक्नॉलॉजी हे कोर्सेस इयत्ता 12 वीनंतर करता येतात. हे कोर्सेस तीन ते चार वर्षांत पूर्ण होतात. या शिक्षणानंतर तुम्ही न्यूट्रिशनिस्ट, फूड टेक्नॉलॉजिस्ट आणि रिसर्च आदी प्रकारे काम करू शकता. या नोकरीतून वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात