जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career in Dairy : डेअरी उद्योगात करिअर करायचं? 12 वी नंतर घ्या इथं प्रवेश

Career in Dairy : डेअरी उद्योगात करिअर करायचं? 12 वी नंतर घ्या इथं प्रवेश

Career in Dairy : डेअरी उद्योगात करिअर करायचं? 12 वी नंतर घ्या इथं प्रवेश

एकेकाळी गावापुरता मर्यादीत असलेला डेअरी उद्योग आता शहरातही झपाट्यानं वाढतोय. या क्षेत्रात करिअरची मोठी संधी आहे.

  • -MIN READ Nagpur,Maharashtra
  • Last Updated :

नागपूर, 30 जून : भारत हा कृषिप्रधान देश असून आपल्या देशात शेती हा मुख्य तर दुग्धोत्पादन हा पूरक व्यवसाय  समजला जातो.  गेल्या 30 वर्षात दुग्धोत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती झालीय. जगातील आघाडीच्या दुग्धउत्पादक देशांमध्ये भारताचा समावेश आहे. त्यामुळे दुग्धतंत्रज्ञान आणि त्याच्याशी संलग्न अभ्यासक्रमाचं महत्त्व वाढलंय. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचे निकष काय आहेत? त्याचबरोबर पुढं करिअरच्या काय संधी आहेत हे पाहूया जागतिक दुधाच्या उत्पादनातील 24 % दूध हे एकट्या भारतातून होत असून देशात 7 कोटी परिवाराकडून दूध उत्पादित केले जाते. अलिकडच्या काळात वाढते शहरीकरण, छोटे कुटुंब, आरोग्य विषयातील जागरूकता तसेच मध्यमवर्गीयांच्या उत्पनात झालेली वाढ, इत्यादी कारणांमुळे दूध व दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात प्रचंड मागणी वाढली आहे. ही वाढ भविष्यात देखील अपेक्षित आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

राज्यातील दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाची स्थापना 1992 साली यवतमाळ जिल्ह्यातील वरूड,पुसद येथे झाली. त्यानंतर लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये 2008 साली आणखी एक महाविद्यालय सुरू करण्यात आलं.  महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत ही महाविद्यालयं काम करतात. या दोन्ही महाविद्यालयातील प्रत्येकी साधारण 32 प्रवेशक्षमता आहे. या महाविद्यालयांतून बी.टेक. दुग्धतंत्रज्ञान या विषयाची पदवी मिळवता येऊ शकते. प्रवेशासाठी पात्रता आणि अटी या महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रवेश पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे.  त्याचबरोबर 12 वी विज्ञान शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री,गणित आणि इंग्लिश या विषयांसह खुल्या गटातील विद्यार्थांना 50 टक्के गुण आणि राखीव गटासाठी 40 % गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 12 वी विज्ञानच्या एकूण गुणांच्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिला जातो. फक्त क्लर्क, मॅनेजर किंवा PO च नाही तर बँकेत असते कृषी अधिकाऱ्यांची जागा; अशी मिळेल नोकरी ज्या विद्यार्थ्याकडे शेतीचा 7/12 चा उतारा किंवा भूमिहीन शेतमजुराचा उतारा असल्यास मेरिट लिस्टमध्ये 12 गुण जोडण्यात येतात. मेरिट लिस्ट ही फिजिक्स, केमिस्ट्री,गणित आणि इंग्लिश मार्क आणि अधिक 7/12 चा व शेतमजुराचा प्रमाणपत्र यावर आधारलेला आहे. यासाठी अधिकतम वीस गुण आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षाचा असून आठ सेमिस्टर मध्ये विभागला आहे यामध्ये चार प्रशिक्षणाचा समावेश असून हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर बी टेक इन डेअरी टेक्नॉलॉजी ही पदवी प्राप्त होते. अभ्यासक्रम पाच विभागात विभागला गेला असून त्यातील दुग्ध तंत्रज्ञान, दुग्ध अभियांत्रिकी, दुग्ध सूक्ष्मजीवशास्त्र, दुग्ध रसायनशास्त्, दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या विषयांचा समावेश आहे. देशात आयुर्वेदाला वाढतेय प्रचंड मागणी; हे टॉप कोर्सेस कराल तर लाईफ होईल सेट कुठे मिळेल नोकरी? हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या शिक्षणाच्या जोरावर अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. जिल्हा दुग्ध अधिकारी अन्नसुरक्षा अधिकारी अन्न महामंडळ राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळ विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक भारतीय कृषी अनुसंधान परिषद येथे सायंटिस्ट तसेच बँकिंग क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. सहकार क्षेत्राने अलीकडच्या काळात दुग्ध व्यवसायाला बळ प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील अनेक ख्यातनाम कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध आहेत त्याचबरोबर  मल्टिनॅशनल कंपनीमध्ये देखील संधी आहेत. या महाविद्यालयात सर्व प्रात्यक्षिके शिकवली जात असल्याने विद्यार्थी स्वयंरोजगार निर्माण करून अनेक दूध व दुग्ध उत्पादनावर आधारित व्यवसाय करू शकतात आमच्या कॉलेजमधील अनेक विद्यार्थी आज या व्यवसायात आहेत विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमात आपले भविष्य घडवावे. इच्छुक विद्यार्थ्यांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी www.mafsu.in या संकेतस्थळावर भेट देऊन प्रवेश प्रक्रिया आणि इतर माहिती जाणून घ्यावी अशी माहिती दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड पुसद येथील अधिष्ठाता डॉ. प्रशांत वासनिक यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात