मुंबई, 07 सप्टेंबर: संपूर्ण जगभरात सध्या मेडिकल क्षेत्राला (Medical Field) प्रचंड मागणी आहे. कोरोनासारख्या महामारीमुळे जगात मेडिकल ऑफिसर्स, नर्स, डॉक्टर्स यांची किती गरज आहे हे वारंवार सिद्ध झालं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेण्यापेक्षा मेडिकल क्षेत्रांमधील कोर्सेसमध्ये (Top Medical courses) प्रवेश घेत आहेत. मात्र मेडिकल क्षेत्रात यायचं म्हंटलं के NEET ही परीक्षा द्यावी लागते असा अनेकांचा समज आहे. पण असेही काही कोर्सेस आहेत ज्यांच्यासाठी तुम्हाला NEET परीक्षा देण्याची गरजच (Top Medical courses without NEET Exam) पडणार नाही. याशिवाय तुम्हाला या कोर्सेसमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे.
फार्मसी (Pharmacy)
ज्या विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट बनण्याची इच्छा आहे ते 12 वी नंतर B. pharm ची निवड करू शकतात. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी NEET परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची आणि पात्र होण्याची आवश्यकता नाही. बी फार्म. एक UG कोर्स आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात काम करू शकतात. ते फार्मासिस्ट, केमिकल टेक्निशियन, औषध निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, क्लिनिकल रिसर्च असोसिएट इत्यादी बनू शकतात.
सायकोलॉजी (Psychology)
या अभ्यासक्रमात मानवी विकास, सामाजिक वर्तन, खेळ, आरोग्य, क्लिनिकल आणि संज्ञानात्मक प्रक्रिया यासारख्या विषयांचा समावेश असतो. बारावीनंतर NEET न घेता, उमेदवार मानसशास्त्र विषयातील बॅचलर ऑफ आर्ट्स (BA) ऑनर्सची निवड करू शकतात. हा पूर्णवेळ तीन वर्षांचा UG अभ्यासक्रम आहे. पदवी घेतल्यानंतर खासगी आणि सरकारी क्षेत्रात सहज नोकरी मिळू शकते. विद्यापीठं, सरकारी संस्था, दवाखाने, शाळा आणि रुग्णालयांमध्ये काम मिळू शकतं.
हे वाचा - BREAKING: राज्यातील कॉलेजेस सुरू होण्याचा मुहूर्त ठरला! या तारखेपासून सुरु होणार
नर्सिंग (Nursing)
हा एक व्यावसायिक अभ्यासक्रम आहे जो उमेदवारांना वैद्यकीय उपचारांद्वारे मानवतेची सेवा करण्यास तयार करतो. उमेदवार बीएससी नर्सिंग, वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील 4 वर्षांचा UG अभ्यासक्रम निवडू शकतात. नर्सिंग कोर्समधून पदवी घेतल्यानंतर नर्स शिक्षक, स्टाफ नर्स इत्यादी म्हणून काम करता येऊ शकतं.
फिजिओथेरपी (Physiotherapy)
बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा देखील करिअरच्या सर्वात जास्त पर्यायांपैकी एक आहे. फिजिओथेरपी किंवा फिजिकल थेरपीचा हेतू एखाद्या व्यक्तीच्या हाडांना किंवा स्नायूंना बरं करणारा कोर्स आहे. बॅचलर पदवी पूर्ण केल्यानंतर उमेदवार क्रीडा, सैन्य, शिक्षण, संशोधन आणि विमा एजन्सीसारख्या विविध क्षेत्रात करिअर करू शकतात.
असे अनेक कोर्सेस आहेत जे तुम्ही NEET ची परीक्षा न देताही करू शकता. त्यासाठी संबंधित कॉलेजेसच्या वेबसाईटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Medical exams, Private medical colleges