मुंबई, 25 ऑगस्ट: कोणत्या करिअरमध्ये चांगली नोकरी (Latest jobs) मिळेल? हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर नेहमीच असतो. याच प्रमुख कारण म्हणजे आजकालच्या काळात करिअरसोबत (Career Advice) चांगल्या पगाराची नोकरीही (Good Salary Jobs) आवश्यक आहे. म्हणूनच अनेक विद्यार्थी अशा क्षेत्रात करिअर करू इच्छितात जिथे त्यांना व्हाईट कॉलर जॉब (White collar Jobs) मिळू शकेल. जर तुम्हालाही अशीच अपेक्षा असेल तर बिनधास्त सिटी अँड टाऊन प्लॅनर (Career in City & Town Planning) म्हणून तुम्ही करिअर करू शकता. मात्र यासाठी कोणतं शिक्षण घेणं आवश्यक आहे? कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणं आवश्यक आहे? याबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
सिटी अँड टाऊन प्लॅनर म्हणजे नक्की काय?
आजकालच्या काळात इतर देशांसारखं आपल्या देशातही शहरं प्लॅनिंगनुसार तयार केले जात आहेत. म्हणजेच एखादी City तयार करताना त्यासाठीचं प्लॅनिंग कसं असावं? तसंच त्यात कोणत्या सोयी-सुविधा असणं महत्त्वाचं आहे? त्यासाठी एक चांगला नकाशा तयार करणं, त्या ठिकाणच्या पर्यावरणीय परिस्थितीबद्दल जाणून घेणं, सर्व आराखडा तयार करणं हे काम सिटी अँड टाऊन प्लॅनरचं (Career as City & Town Planner) असतं. कन्स्ट्रक्शन कंपन्यांना सिटी अँड टाऊन प्लॅनरची गरज असते.
हे वाचा - Job Alert: रोगी कल्याण समिती इथे विविध पदांसाठी नोकरीची संधी; इतका मिळणार पगार
हे शिक्षण असणं महत्त्वाचं
12 वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित), पदवी, B.Tech आर्किटेक्चर / B.Tech प्लॅनिंग / B.Tech Civil, पदव्युत्तर M.Tech प्लॅनिंग यात तुम्ही शिक्षण पूर्ण करू शकता. यानंतर तुम्ही सिटी अँड टाऊन प्लॅनरच्या नोकरीसाठी अर्ज करू शकता.
काही महत्त्वाचे कॉलेजेस
स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, चेन्नई
स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, हैदराबाद
या ठिकाणी मिळू शकते नोकरी
आर्किटेक्चर फर्म
इंजिनीअरिंग फर्म्स
कंस्ट्रक्शन फर्म्स
लँडस्केप आर्किटेक्ट्स फर्म्स
लँड रिडेव्हलपमेंट लीगल फर्म्स
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job