जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / कौतुकास्पद! शेतकऱ्याच्या पोरानं केली कमाल; बुलडाण्याचा राजू केंद्रे झळकला फोर्ब्सच्या यादीत

कौतुकास्पद! शेतकऱ्याच्या पोरानं केली कमाल; बुलडाण्याचा राजू केंद्रे झळकला फोर्ब्सच्या यादीत

कौतुकास्पद! शेतकऱ्याच्या पोरानं केली कमाल; बुलडाण्याचा राजू केंद्रे झळकला फोर्ब्सच्या यादीत

फोर्ब्स मासिकाच्या यादीत आपलं नाव असावं, अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांची इच्छा बहुतांशी वेळा पूर्ण होत नाही. पण बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील एका शेतकऱ्याच्या पोरानं मात्र कमाल केली आहे. ज्याची दखल फोर्ब्स या मासिकानं देखील घेतली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बुलडाणा, 08 फेब्रुवारी: फोर्ब्स या नामांकित मासिकात दरवर्षी वेगवेगळ्या याद्या प्रकाशित होतं असतात. जगभरात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या लोकांची यादी यामध्ये प्रकाशित केली जाते. त्यांनी समाजासाठी नेमकी कोणती कामगिरी केली? याची माहिती जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे या यादीत आपलंही नाव असावं, अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांची इच्छा बहुतांशी वेळा पूर्ण होत नाही. पण बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील एका शेतकऱ्याच्या पोरानं मात्र कमाल केली आहे. ज्याची दखल फोर्ब्स या मासिकानं देखील घेतली आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल फोर्ब्स मासिकानं बुलडाण्यातील राजू केंद्रेची दखल घेतली असून 2022च्या ‘Forbes 30 Under 30’ यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये त्याच्या कामगिरीबाबत एक स्टोरी प्रकाशित केली आहे. ‘फोर्ब्स’ इंडिया फेब्रुवारीच्या अंकात सविस्तर यादी आणि त्याची स्टोरी पब्लिश झाली आहे. ही यादी आता ऑनलाईनही उपलब्ध होईल. फोर्ब्सच्या यादीत नावं आल्यानंतर राजू केंद्रेनं आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं म्हटलं की, ‘वंचित घटकातून येणाऱ्या आणि पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या युवकासाठी ही आनंदाची आणि मोठ्या जबाबदारीची गोष्ट आहे.’ हेही वाचा- IAS Tips: UPSC ची तयारी करण्यासाठी इथे मिळेल रेडिमेड टाईमटेबल; असं बनवा परफेक्ट शेड्युल राजू केंद्रे हा ‘एकलव्य इंडिया’ याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करतो. स्वत: सारख्या पहिल्या पिढीतील शिकणाऱ्यांना तळागाळातील विद्यार्थ्यांचं नेतृत्व सक्षम करण्याचं काम तो करतो. तो सध्या चेवनिंग स्कॉलरशिपवर SOAS- युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये डेव्हलपमेंट स्टडीज शिकत आहे. याठिकाणी तो ‘भारतातील उच्च शिक्षण आणि असमानता’ या विषयावर संशोधन करत आहे. हेही वाचा- Career Tips: तुमच्यातही आहेत का एका IAS ऑफिसरचे गुण? असं घ्या जाणून येथील डिग्री पूर्ण झाली की लगेच परत येऊन नव्या दमानं काम सुरू करण्याचा मानस त्यानं बोलून दाखवला आहे. मायदेशी परतल्यानंतर पुन्हा एकदा काही महिने ग्राउंडवर जाऊन काम करायचं आहे. यासाठी आपल्या सर्वांची मदत लागेल. वेगवेगळ्या महाविद्यालयात, गावागावात उच्च शिक्षण हा विषय घेऊन संवाद साधायचा आहे. या दरम्यान जमिनीवरची परिस्थिती समजून, संस्थात्मक पातळीवर आणखी काम करायच आहे, असं त्यानं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. हेही वाचा- Exam Tips: अभ्यास करताना उत्तरं मोठ्यानं वाचणं उत्तम; अशी दीर्घकाळ राहतील लक्षात कोण आहे राजू केंद्रे? 28 वर्षांचा राजू केंद्रे हा बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंप्री ( खंदारे ) ह्या छोट्याच्या खेड्यातला तरुण आहे. त्यानं दहावीपर्यंत जिल्हा परिषदच्या शाळेत मराठी माध्यमातूनच शिक्षण पूर्ण केलं आहे. अलीकडेच त्यानं जगात प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या British Chevening Scholarship मिळवली आहे. राजू हा आपल्या कुटुंबात शिक्षण घेणारा पहिलाच पदवीधर आहे. आदिवासी, दलित, भटके, गरीब कुटुंबातील मुलांना पुढे आणण्याचे शिक्षण हे एकमेव साधन आहे, असा विश्वास राजुला आहे. यासाठी तो एकलव्य इंडिया मार्फत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात