जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; आता परीक्षेसाठी उपलब्ध होणार Question Bank; लागा अभ्यासाला

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; आता परीक्षेसाठी उपलब्ध होणार Question Bank; लागा अभ्यासाला

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर; आता परीक्षेसाठी उपलब्ध होणार Question Bank; लागा अभ्यासाला

आता राज्य सरकारकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपेढी (questions for board exam students) उपलब्ध केली जाणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 04 फेब्रुवारी : कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षीही अनेक महिने शिक्षण ऑनलाईन (Online Education) पद्धतीनं देण्यात येत आहे. त्यामुळेच एका बाजूनं ऑफलाईन परीक्षांना (Offline Exams of 10th and 12th) विद्यार्थी विरोध करत आहेत. तर राज्य सरकारनंही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच (Board Exams of Maharashtra state Board) होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खूशखबर आहे. आता राज्य सरकारकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपेढी (questions bank for board exam students) उपलब्ध केली जाणार आहे. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या निर्णयामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे विषयनिहाय Question Bank विकसित करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी या Question Bank चा संपूर्ण लाभ घ्यावा असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. पालकांनो, मुलांनी परीक्षेत यश मिळवावं अशी इच्छा आहे? मग या खास टिप्स वाचा मागील दोन वर्षात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव कमी झाला आहे. रिकाम्या जागा भरा, लघुत्तरी प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आदींच्या माध्यमातून परिक्षेचे स्वरूप कसे असेल हे विद्यार्थ्यांना लक्षात यावे, प्रश्नपत्रिका सोडविण्याच्या सरावाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने प्रश्नपेढी तयार करण्याची मागणी पालक संघटनांकडूनही सातत्याने होत होती त्यानुसार आता ही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे विद्यार्थ्यांवरील मानसिक ओझे कमी व्हावे यासाठी यावर्षी अभ्यासक्रम कमी करण्याबरोबरच परीक्षेची वेळ वाढवून देण्याचा निर्णयही मंडळामार्फत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमाचा ताण घेण्यापेक्षा काही प्रश्नांचा अभ्यास अभ्यास करावा लागणार आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्ययनासाठी या प्रश्नपेढ्यांची मदत होईल आणि परीक्षेला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास नक्कीच वाढेल, या हेतूने हे प्रश्‍नसंच तयार केले जात आहेत. या Question Bank www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात