Home /News /career /

मोठी बातमी! MPSC ची अर्ज प्रक्रिया अचानक स्थगित; 'या' कारणामुळे उमेदवारांची होणार गैरसोय

मोठी बातमी! MPSC ची अर्ज प्रक्रिया अचानक स्थगित; 'या' कारणामुळे उमेदवारांची होणार गैरसोय

application process तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

application process तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रोसेस (Online application process for MPSC) तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

    मुंबई, 16 जानेवारी: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC दरवर्षी अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया (Registration process of MPSC) राबवत असते. ही परीक्षा दिल्यानंतर अनेकांना सरकारी अधिकारी (How to crack MPSC) होण्याची संधी मिळते. यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागतात. मात्र MPSC नं नुकतीच एक महत्त्वाची घोषणा (MPSC News Marathi) केली आहे. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रोसेस (Online application process for MPSC) तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. MPSC नं आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे (Online application process for MPSC stopped) ही अर्ज प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती MPSC नं दिली आहे. प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल असं MPSC नं आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलद्वारे कळवलं आहे. प्रसिद्ध सर्व जाहिरातींच्या अर्जासाठी आता उमेदवारांना काही वेळ वाट बघावी लागणार आहे. मात्र तांत्रिक अडचणी दुरुस्त करण्यात आल्यानंतर MPSC तर्फे उमेदवारांना वाढवून देण्यात येईल असं आश्वासन MPSC कडून देण्यात आलं आहे. तोपर्यंत मात्र उमेदवारांची गैरसोय होणार आहे. काही दिवसांपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र यानंतर तांत्रिक अडचणी येत होत्या. काही उमेदवारांच्या यासंबंधीच्या तक्रारीही येऊ लागल्या. यानंतर MPSC नं या अडचणी दूर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. लवकरच ही अडचण दूर करून उमेदवारांसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Jobs, Maharashtra, Mpsc examination

    पुढील बातम्या