जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / याला जिद्द म्हणावं की काय? वय वर्ष फक्त 10 आणि नावावर 2 डॉक्टरेट डिग्री; मुलामध्ये असाधारण प्रतिभा

याला जिद्द म्हणावं की काय? वय वर्ष फक्त 10 आणि नावावर 2 डॉक्टरेट डिग्री; मुलामध्ये असाधारण प्रतिभा

याला जिद्द म्हणावं की काय? वय वर्ष फक्त 10 आणि नावावर 2 डॉक्टरेट डिग्री; मुलामध्ये असाधारण प्रतिभा

अरिपिराला योगानंद शास्त्री असं नाव असलेल्या या मुलानं वयाच्या दहाव्या वर्षीच दोन डॉक्टरेट पदव्या मिळवल्या आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 01 नोव्हेंबर: बालपण ही अशी अवस्था असते, ज्यामध्ये आपल्याला ‘दुनियादारी’चा गंधही नसतो. बालपणामध्ये प्रत्येक व्यक्ती निरागसपणे आणि सहजपणे वावरत असते. भरपेट खाऊन मनसोक्त खेळणं हाच प्रत्येक बालकाचा दिनक्रम असतो. साधारण 10 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना लहान समजलं जातं. या वयात बहुतेक मुलं शाळेत जातात. त्यांना नवनवीन विषयांची तोंडओळख होते. एकूणच काय तर 10 वर्षे वय असलेल्या मुलांनी आयुष्यात उल्लेखनीय असं काहीही साध्य केलेलं नसतं. मात्र, आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात राहणारा एक 10 वर्षांचा मुलगा याला अपवाद आहे. अरिपिराला योगानंद शास्त्री असं नाव असलेल्या या मुलानं वयाच्या दहाव्या वर्षीच दोन डॉक्टरेट पदव्या मिळवल्या आहेत. अरिपिराला योगानंद शास्त्रीला ‘चाइल्ड प्रॉडिजी’ म्हणजेच असाधारण प्रतिभा असलेलं मूल या नावानं ओळखलं जातं. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कंपनीने 1000 कर्मचाऱ्यांना काढलं तरी तुमचा जॉब कधीच जाणार नाही; फक्त या टिप्स करा फॉलो वयाच्या पाचव्या वर्षी सुरू केला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास डॉ. अरिपिराला योगानंद (वय 10 वर्षे) हा ज्योतिषी कुटुंबात जन्मलेला आहे. त्याचे आई-वडील आणि आजी-आजोबा गेल्या 16 वर्षांपासून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि वैदिक विधी करतात. यामुळेच अरिपिरालालादेखील ज्योतिषशास्त्राची आवड निर्माण झाली. अरिपिराला हासुद्धा यज्ञ आणि पूजा करणारा एक ज्योतिषी आहे. त्याच्याकडे ज्योतिषशास्त्रातील दोन मानद डॉक्टरेट पदव्या आहेत. एवढ्या लहान वयात दोन डॉक्टरेट मिळवल्यामुळे अरिपिरालाचं नाव विविध रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवलं गेलं आहे. मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्स, इन्फ्लुएंसर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि हार्वर्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये अरिपिराला योगानंदच्या नावाची नोंद झाली आहे. इयत्ता पाचवीत शिकणारा अरिपिराला योगानंद शास्त्री अभ्यासातही हुशार आहे. सुवर्णसंधी सोडू नका! पुणे महापालिकेत 10वी ते ग्रॅज्युएट्सच्या 229 जागांसाठी भरती; आजची शेवटची तारीख योगानंदचे वडील डॉ. अरिपिराला कल्याण शास्त्री यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलानं वयाच्या पाचव्या वर्षी जन्मकुंडली बघून भविष्य कसं सांगितलं जातं, हे समजून घेण्यात रस दाखवला होता. वयाच्या पाचव्या वर्षी योगानंदनं ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि वैदिक विधी करण्याची पद्धत शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या पाचव्या वर्षीच डॉ. योगानंद वैदिक विधी करण्यास आणि लोकांच्या कुंडली वाचण्यास सक्षम झाला होता. तो एकही चुकीचा उच्चार न करता भजन गातो. वडिलांच्या म्हणण्यानुसार, योगानंदनं आतापर्यंत 70 होम आणि अनेक यज्ञ केले आहेत. वडिलांचा वारसा सुरू ठेवण्याची इच्छा डॉ. अरिपिराला योगानंद म्हणाला की, त्याला वडिलांकडून प्रेरणा मिळाली आहे. ज्या लोकांना आपल्या भविष्याबद्दल काळजी वाटते त्यांना योगानंदच्या वडिलांनी मदत केली आहे. आपणही अशाचप्रकारे लोकांची मदत करण्याच इच्छुक आहोत. आपल्या मदतीनं लोकांच्या जीवनात शांती आणि विश्वास प्रस्थापित व्हावा, असं योगानंदच म्हणणं आहे. कंपनीने 1000 कर्मचाऱ्यांना काढलं तरी तुमचा जॉब कधीच जाणार नाही; फक्त या टिप्स करा फॉलो जन्मकुंडली वाचण्याव्यतिरिक्त, योगानंद संस्कृती प्रॉडक्शन्स नावाचं एक युट्युब चॅनेल देखील चालवतो. लोकांना त्यांच्या आध्यात्मिक समस्यांवर उपाय सांगणं, हा या चॅनेलचा उद्देश आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात