बंगलोर, 12 डिसेंबर: जगातील सर्वात मोठी एरोस्पेस कंपनी आहे आणि व्यावसायिक जेटलाइनर्स आणि संरक्षण, अंतराळ आणि सुरक्षा प्रणालींची आघाडीची उत्पादक Boeing (Boeing Freshers Recruitment 2022) इथे फ्रेशर्स इंजिनिअर्स आणि अनुभवी इंजिनिअर्सच्या काही जागांसाठी लवकरच भरती (Jobs for Software Engineers) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. Associate Software Engineer – C++ या पदांसाठी ही भरती (Jobs for Freshers) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया या पदभरतीबाबत माहिती.
या पदांसाठी भरती
असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनिअर (Associate Software Engineer – C++)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनिअर (Associate Software Engineer – C++) -
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
किंवा उमेदवारांनी मास्टर्सपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
C, C++ मध्ये अनुभव.असणं आवश्यक आहे.
पायथनमध्ये चांगले प्रोग्रामिंग स्किल्स असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना Embedded Avionics System Software development चा 0 ते 3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
Microsoft Off Campus Drive: 'ही' पात्रता असणाऱ्या उमेदवारांना मिळणार नोकरी; वाचा
अशी असेल Job Profile
उमेदवार हे थेट आर्किटेक्टशी सवांद साधून कंपनीला फायदा करून देण्यात मदत करतील.
सॉफ्टवेअर सिस्टमसाठी आर्किटेक्चर, आवश्यकता, अल्गोरिदम, इंटरफेस आणि डिझाइन विकसित, दस्तऐवज आणि देखरेख करणे.
कोड डेव्हलप आणि मॉनिटर करणे.
Avionics software व्हेरिफाय करण्यासाठी टेस्ट घेणे.
उमेदवारांमध्ये हे स्किल्स असणं आवश्यक
चांगलं कम्युनिकेश स्किल्स असणं आवश्यक.
उमेदवार चांगले टीम प्लेयर असणं आवश्यक.
नवीन आव्हानं स्वीकारण्यास सक्षम असणं आवश्यक.
कामाप्रती तत्पर असणं आवश्यक.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
Government Jobs: 'या' सरकारी Jobs साठी आज सुरु करा तयारी; लाखो रुपये मिळेल पगार
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी www.boeing.co.in या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Job alert