आपल्या आवडीलाच करिअर म्हणून निवडणारे लोकं जगात खूप कमी आहे. याबाबतीत मी मला भाग्यवान समजतो. आज मी स्वतः डिझाईन केलेलं प्रोडक्ट देशभर प्रसिद्ध आहे. पण, इथपर्यंतचा प्रवास सोप नव्हता. खूप वर्षांची मेहनत आणि रात्रंदिवस एक करुन इथपर्यंत पोहचलो आहे. पण, याची सुरुवात माझ्या छंदामुळे सुरु झाली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर अशोक जगे, आपल्या सर्वांना काही ना काही छंद असतात, कोणाला क्रीडा क्षेत्रात रुची असते तर कुणाला कला क्षेत्रात. तशी मला बाईक रायडिंगची आवड आहे. या सर्वांची सुरुवात झाली माझ्या लहानपणी. मी शाळेत असताना वडिलांनी एक बाईक घेतली, बजाज M 80. मी खूपच जास्त एक्सायटेड होतो. कारण, मला पहिल्यापासून गाड्यांचं भारी आकर्षण. वडिलांनी मला बाईक वरून खूप फिरवलं. लहान असल्यामुळे मला पुढे बसवायचे. तेव्हा जो छान गार वारा लागायचा तो अजूनही आठवतो. माझं लक्ष सतत वडील बाईक कशी चालवतात ह्यावरच असायचं. त्यावेळेस माझ्या मनात बाईक रायडिंगबद्दल इंट्रेस्ट खूप वाढला. आता मी स्वतः बाईक कधी शिकतो आणि चालवतो असं वाटू लागलं होतं. मला अजिबात पेशन्स नव्हते. आमच्या शेजारचे काका माझ्या मोठ्या भावाला रोज बाईक चालवायला शिकवत आणि मी सुद्धा त्यांच्या सोबतच असे. तेव्हा माझे पायसुद्धा बाईकवरून पुरत नव्हते. पण, त्या काकांनी मला सुद्धा बाईक चालवायला शिकवलं. एके दिवशी घरी कोणी नसताना मी गुपचूप चावी घेतली आणि क्लासला एकटाच बाईक घेऊन निघालो, तेव्हा बाईकचा मेन स्टँड सुद्धा लावता येत नव्हता.
ही बाईक माझ्या लाइफच एक टर्निंग पॉइंट ठरली पण एकट्याने बाईक जेव्हा चालवली तेव्हा समजलं की हे वाटतं तेवढं सोपं नाही, ही एक जबाबदारी आहे. नंतर जसा मी मोठा झालो आमची बाईक जुनी झाली, त्यामुळे आम्ही ती विकून टाकली. आता माझ्याकडे लायसन्स होतं, पण बाइक नव्हती. बाईक चालवायला मिळावी म्हणून मित्रांकडे मागायचो किंवा मामा कधी घरी आला की त्याची बाईक घेऊन एक राउंड मारायला नक्की जायचो. एक छोटासा राऊंड मारून पण मी खूप खुश व्हायचो. मी ठरवलं होतं जसं शिक्षण पूर्ण होईल आणि फर्स्ट जॉब लागेल, मी सर्वात आधी बाईक घेईन आणि तसंच झालं. जॉब लागला आणि मी माझी फर्स्ट बाईक घेतली, यामाहा FZS 150. ही बाईक माझ्या लाइफच एक टर्निंग पॉइंट ठरली.
करिअरला मिळालेली नवी दिशा लहानपणापासून मला नवीन प्रोडक्ट बनवण्याची आणि डिझाईन करण्याची खूप आवड होती. म्हणून आईवडिलांनी मला इंजिनियरिंगला ऍडमिशन घेतलं आणि मी ऑटोमोबाईल इंजिनिअर झालो. जॉब लागला होता, बाईक घेतली होती आणि मी त्या बाईक वर खूप फिरायचो. पण फक्त शॉर्ट डिस्टन्स. मला बाईक रायडिंग बद्दल प्रोफेशनल नॉलेज असं काहीच नव्हतं, रायडींग ग्रुप पण असतात हे पण माहित नव्हतं. मी माझ्या बाईकसाठी काही कस्टमाइज्ड प्रोडक्स डिझाईन केले होते. त्यामुळे ती खूप आकर्षक दिसायची. तसंच मी अजून एक प्रॉडक्ट डिझाईन केलं होतं ते म्हणजे फिंगर वायपर. फिंगर वायपर हे एक हेल्मेट वायपर होतं, जे पावसामध्ये बाइक चालवताना खूप उपयोगाचं होतं. या प्रॉडक्टच्या मदतीने पावसामध्ये बाईक चालवताना हेल्मेट वर उडणार चिखल आणि पाणी सहजतेने साफ करता येत होतं. असं प्रॉडक्ट पूर्ण भारतामध्ये एकही नव्हतं. हे प्रोडक्ट एवढे छान होतं की मी त्याचं प्रोडक्शन करून मार्केटमध्ये विकायचे ठरवले. माझा हेतू एवढाच होता की हे प्रॉडक्ट प्रत्येक रायडरपर्यंत पोहोचलं पाहिजे, ज्याला याची गरज आहे. मला या प्रॉडक्टचा रिस्पॉन्स खूप छान आला, सर्व ऑटोमोबाईल पोर्टल्स, वेबसाईट वर माझं आर्टिकल आलं.
स्वतःचं बाईक मोडिफिकेशन वर्कशॉप सुरू केलं महाराष्ट्र टाइम्स, ठाणेवैभव सारख्या वर्तमानपत्रात माझ्या फोटोसोबत आर्टिकल छापून आलं. आता मला पूर्ण भारतामधून मागणी यायला सुरुवात झाली, एवढेच नाही तर UK, US आणि ऑस्ट्रेलिया मधून सुद्धा ऑर्डर्स आले. अजून आनंदाची बातमी म्हणजे वर्देंची सारख्या नामांकित कंपनी मधून मला जॉब ऑफर आली. वर्देंची ही कंपनी बाईक मोडिफिकेशनसाठी खूप फेमस होती. तिथे काम करणं हे माझं एक स्वप्न होतं. तिकडे मी बाईक मोडिफिकेशन शिकलो आणि लवकरच माझं स्वतःचं बाईक मोडिफिकेशन वर्कशॉप सुद्धा सुरू केला. बाइकिंग हे माझं पॅशन आहे आणि तेच मी माझं करिअर म्हणून निवडलं याचा मला खूप आनंद आहे.
अन् माझी डोंबिवली रायडर्स क्लबमध्ये एन्ट्री झाली बरेच रायडर्स लाँग राईडला जाण्याआधी माझ्याकडून त्यांच्या बाईकमध्ये मोडिफिकेशन्स करून घ्यायचे. यामुळे बाईक राईडला फेस होणारे प्रॉब्लेम्स मला समजायचे आणि ते प्रॉब्लेम सॉल करण्यासाठी मी वेगवेगळे प्रोडक्स डिझाईन करू लागलो. मी ठरवलं की माझे नॉलेज आणि स्किल्स बाईकिंग कम्युनिटीसाठी वापरायचे. मी जसं रायडर सोबत इंटरॅक्ट करू लागलो तसे मला समजले की लाँग राईडला जाण्यासाठी रायडर्स खूप मोडिफिकेशन्स करून घेतात आणि मी कधी लाँग राईड न केल्यामुळे मला त्याचा काहीच अनुभव नव्हता. म्हणून मी ठरवलं की आपण एक रायडिंग ग्रुप जॉईन करूया म्हणजे मला पण लॉंग राईड करता येईल आणि त्या ग्रुप मेंबर्सकडून सुद्धा खूप काही शिकता येईल. फेसबुकवर बरेच ग्रुप शोधले. पण, काही ऍक्टिव्ह नव्हते तर काही फक्त महाग स्पोर्ट्स बाईकचे ग्रुप होते. पण एक ग्रुप होता जो मला योग्य वाटला, डोंबिवली रायडर्स क्लब म्हणजे DRC. - सागर अशोक जगे, बाईक रायडर, डोंबिवली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.