मुंबई, 11 मार्च: केंद्र सरकारची 'अग्निवीर' योजना सुरू झाल्यापासून सतत काहीना काही कारणामुळे चर्चेत राहिली आहे. आता गृह मंत्रालयाच्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा ही योजना चर्चेत आली आहे. गृह मंत्रालयानं गुरुवारी (9 मार्च) सीमा सुरक्षा दलामधील (बीएसएफ) रिक्त पदांवर माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण लागू केलं आहे. अग्निवीरांना त्या योजनेतून निवृत्त झाल्यानंतर बीएसएफमध्ये नोकरी देताना जो वयाचा मापदंड होता तो केंद्रीय गृहमंत्रालयाने 10 टक्क्यांनी शिथिल केला असून, ती व्यक्ती अग्निवीर योजनेच्या कितव्या बॅचमधील अग्निवीर आहे यानुसार बीएसएफमधील नोकरीसाठी वयाची मर्यादा वाढवण्यात येणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
जनरल ड्युटी केडर (नॉन-राजपत्रित) सीमा सुरक्षा दलाच्या भरती नियम, 2015 मध्ये सुधारणा करून, 9 मार्चपासून केंद्रानं जाहीर केलं की, कॉन्स्टेबलपदाशी संबंधित असलेल्या जागांसाठी माजी अग्निवीरांची उच्च वयोमर्यादा शिथिल करून त्यांचा विचार केला जाईल. माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचमधील उमेदवारांसाठी पाच वर्षांपर्यंत आणि माजी अग्निवीरांच्या इतर सर्व बॅचच्या बाबतीत तीन वर्षांपर्यंत वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.
ग्रॅज्युएट उमेदवारांनो, 'या' विद्यापीठात नोकरीची मोठी संधी; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक; करा अप्लाय
जनरल ड्युटी केडर (नॉन-राजपत्रित) सीमा सुरक्षा दलाच्या भरती नियम, 2023 मध्ये आणखी एक नोंद जोडण्यात आली आहे. या नोंदीनुसार, शारीरिक प्रवीणता चाचणीतून माजी अग्निवीरांना सूट देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी (2022) केंद्र सरकारनं 'अग्निपथ' योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना 'अग्निवीर' म्हटलं जातं. या तरुणांना चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सैन्यात नोकरी दिली जाईल. चार वर्षानंतर या तरुणांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या तरुणांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहिल, हा मुद्दा घेऊन अग्निवीर योजनेवर टीका झाली होती.
रिटायर्ड आहात? घरी बसून कंटाळा आलाय? मग SBI मध्ये तुमच्यासाठी जॉबची संधी; अशी असेल पात्रता
झालेली टीका लक्षात घेऊन गृह मंत्रालयानं चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर या तरुणांना संरक्षण दलात सहभागी करून घेण्याची तरतूद केली होती. मात्र, यामुळे केवळ 25 टक्के अग्निवीरांचाच प्रश्न सुटत होता. उर्वरित 75 टक्के अग्निवीर बरोजगार राहिले असते म्हणून त्यानंतर लगेचच केंद्रीय निमलष्करी दल आणि आसाम रायफल्समधील 10 रिक्त जागा अग्निवीरांसाठी राखीव ठेवल्या जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यावेळीदेखील माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचसाठी उच्च वयोमर्यादा पाच वर्षे आणि त्यानंतरच्या बॅचसाठी तीन वर्षांनी शिथिल केली जाईल, असं जाहीर केलं होतं. त्या पाठोपाठ आता बीएसएफमध्येही माजी अग्निवीरांना संधी दिली जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BSF, Career, Career opportunities, Indian army, Job Alert