मुंबई, 26 सप्टेंबर: बोर्ड परीक्षा संपल्यानंतर, उमेदवार आता त्यांच्या भविष्यातील योजनेसाठी विविध अभ्यासक्रमांचा शोध घेतात. अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याऐवजी अशा कोर्सवर लक्ष केंद्रित करतात, जे केल्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळते. यासाठी उमेदवारांनी शॉर्ट टर्म कोर्सेसवर विद्यार्थ्यांचा भर असतो. असे अनेक शॉर्ट टर्म कोर्स आहेत, ज्यानंतर उमेदवारांना सहज नोकऱ्या मिळतात. हे अभ्यासक्रम बारावीनंतरचे आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही शॉर्ट टर्म कोर्सेसबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही बारावीचा बोर्डाचा निकाल लागण्याआधीच सुरु करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. डिजिटल मार्केटिंग आजचे युग हे डिजिटल मार्केटिंगचे युग आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची मागणी वाढत आहे. सर्व प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांसाठी या क्षेत्रातील लोकांची गरज असते. हे अभ्यासक्रम सहा महिने ते एक वर्षाचे असतात. यासाठी उमेदवारांना जास्त शुल्कही भरावे लागणार नाही आणि २५ हजार रुपयांपर्यंत हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतील. हा कोर्स तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून करू शकता. ग्रॅज्युएट असाल तर ही सुवर्णसंधी सोडू नका; राज्यातील ‘या’ कॉलेजमध्ये भरती
कृषी विषयात डिप्लोमा
तुम्हाला शेतीमध्ये रस असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. कृषी क्षेत्रात तुम्ही तुमचे करिअर करू शकता. कृषी क्षेत्रात अनेक प्रकारचे डिप्लोमा आणि शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत. या अभ्यासक्रमात अनेक कृषी क्षेत्रांचा समावेश आहे. जेनेटिक्स, सॉईल सायन्स, डेअरी, हॉर्टिकल्चर, फार्मिंग अशा अनेक प्रकारच्या कोर्सेसमध्ये डिप्लोमा करून तुम्ही चांगली नोकरी मिळवू शकता. ऑनलाईन ग्राफिक डिझाईन वेगवेगळ्या कंपन्यांकडून प्रोजेक्टसाठी ऑनलाइन ग्राफिक डिझायनर (Graphic Design Part time jobs) नेमले जात आहेत. नोकरीमध्ये इतर गोष्टींबरोबरच पोस्टर, इन्फोग्राफिक्स, लोगो आणि मासिके आणि ब्रोशरसाठी लेआउट तयार करणे समाविष्ट आहे. या कार्यामध्ये तुम्हाला Adobe Photoshop, Adobe Illustrator, Canva आणि Corel Draw सारख्या विविध साधनांमध्ये ज्ञान आवश्यक आहे. प्रत्येक उद्योग आता एक कमांडिंग ऑनलाइन उपस्थिती प्रस्थापित करण्यासाठी ग्राफिक डिझायनर शोधत असल्याने, तुमच्यासाठी आवश्यक कौशल्ये शिकण्याची आणि सुधारण्याची ही एक चांगली संधी असू शकते. यासाठी तुम्हाला आधी YouTube वरून यासंबंधीचा कोर्स करणं आवश्यक असेल. Career Tips: 12वीनंतर सुरु करा ‘हे’ कोर्सेस; वर्षभरात मिळेल मोठ्या पॅकेजची नोकरी
सोशल मीडिया मॅनेजर
सोशल मीडिया हा ब्रँड इमेज बिल्डिंगचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रत्येक कंपनी, सेलिब्रिटी आणि सार्वजनिक व्यक्ती सोशल मीडिया मॅनेजर्सना (Social Media Managers Jobs) नियुक्त करतात. विद्यार्थी अधिक तंत्रज्ञान जाणणारे असल्याने आणि वृद्ध लोकांपेक्षा जलद गतीने सोशल मीडिया हॅण्डल करू शकतात, त्यांना या विशिष्ट क्षेत्रात मोठी मागणी आहे. जर तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजर व्हायचं असेल तर तुम्हाला Udemy, Coursera आणि Harvard edX वर ऑनलाइन कोर्स मिळतील.