मुंबई, 06 सप्टेंबर: व्यवसाय किंवा मॅनेजमेंटमध्ये आवड असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशननंतर MBA (How to do MBA after graduation) करण्याची प्रचंड इच्छा असते. पदवीनंतर MBA करून अनेक विद्यार्थी चांगला जॉब (Jobs after MBA) मिळवतात. मात्र चांगला जॉब मिळवण्यासाठी चांगल्या MBA कॉलजेमधून (Best MBA College in Maharashtra) शिक्षण घेणं महत्त्वाचं असतं. अनेकदा चांगलं कॉलेज न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगला जॉब लागू शकत नाही. पण आता MBA करण्याची एक सुवर्णसंधी आली आहे आणि ते ही घरबसल्या. भारतात अशा अनेक संस्था आहेत, ज्या ऑनलाइन व्यवस्थापन अभ्यासक्रम देतात. या अभ्यासक्रमांमध्ये बीबीए आणि एमबीएला जास्त मागणी आहे. बीबीए आणि एमबीए करू इच्छिणारे विद्यार्थी हे अभ्यासक्रम कोठूनही सहज करू शकतात. या ऑनलाईन बीबीए आणि एमबीए कोर्सेसबद्दल जाणून घेऊया. शिक्षक दिनाच्या दिवशी UGC कडून मोठ्ठं गिफ्ट; रिसर्च ग्रँट्स आणि फेलोशिपची घोषणा ऑनलाइन BBA कोर्स ऑनलाइन बीबीए अभ्यासक्रम 3 वर्षांचा आहे. बीबीए करू इच्छिणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला बारावी पूर्ण केल्यानंतर या अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येईल. ऑनलाइन बीबीए अभ्यासक्रम सेमिस्टरनुसार विभागलेला आहे. प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर असतात. म्हणजेच ऑनलाइन बीबीए कोर्स एकूण 6 सेमिस्टरचा आहे. ऑनलाइन बीबीए कोर्स करण्यासाठी, तुम्ही कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 12वी मध्ये विद्यार्थ्यांना किमान 50% गुण असणे आवश्यक आहे. मात्र, राखीव श्रेणीतील विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांमध्ये विशेष प्रकारची सूट देण्यात आली आहे. ऑनलाइन बीबीए कोर्सचे वैशिष्ट्य म्हणजे एका सेमिस्टरमध्ये नापास होणारे विद्यार्थी एका वर्षात एकाच वेळी दोन सेमिस्टरच्या परीक्षा देऊ शकतात. ऑनलाईन MBA कोर्स ऑनलाइन एमबीए अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. पदवी पूर्ण केल्यानंतर ऑनलाइन एमबीए करता येते. ऑनलाइन एमबीए कोर्स 4 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. ऑनलाइन एमबीएसाठी, विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याला पदवी पदवीमध्ये किमान ५०% गुण असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याने एमबीएची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. परदेशात मेडिकलचा अभ्यास करायचाय? मग या आहेत जगभरातील टॉप 5 युनिव्हर्सिटीज किती असते कोर्से फी ऑनलाइन एमबीए कोर्स करण्यासाठी तुम्हाला दोन वर्षांत 1 ते 2 लाख रुपये खर्च करावे लागतील. देशातील अनेक संस्थांची ऑनलाइन एमबीए फी 37,500 रुपये प्रति सेमिस्टरपासून 50 हजारांपर्यंत आहे. तर ऑनलाइन बीबीए अभ्यासक्रम बहुतेक खाजगी संस्थांद्वारे चालवले जातात. ऑनलाइन बीबीए कोर्ससाठी तुम्हाला प्रति सेमिस्टर 20 ते 25 हजार रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला रु. 1,20,000/- खर्च करावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.