मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

भावी डॉक्टरांसाठी महत्त्वाची बातमी! BDS अभ्यासक्रमात होणार मोठे बदल; क्रेडिट बेस्ड सिस्टीम अन्..

भावी डॉक्टरांसाठी महत्त्वाची बातमी! BDS अभ्यासक्रमात होणार मोठे बदल; क्रेडिट बेस्ड सिस्टीम अन्..

बीडीएस अभ्यासक्रमातील क्रेडिट-आधारित प्रणालीसारख्या विविध तरतुदी भविष्यात विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण सुलभ करतील.

बीडीएस अभ्यासक्रमातील क्रेडिट-आधारित प्रणालीसारख्या विविध तरतुदी भविष्यात विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण सुलभ करतील.

बीडीएस अभ्यासक्रमातील क्रेडिट-आधारित प्रणालीसारख्या विविध तरतुदी भविष्यात विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण सुलभ करतील.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेऊन यशस्वी डॉक्टर (Doctor) व्हावं असं युवक-युवतींना वाटतं. त्या दृष्टीने ते परिश्रम घेत असतात. सध्याच्या काळात मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना विशेष प्रयत्न करावे लागतात. एमबीबीएस, बीएमएमएस आणि बीएचएमएस या शाखांसोबत बीडीएस (BDS) अर्थात दंत शल्य चिकित्सक हा अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांची पसंती मिळवत आहे. आता अंडरग्रॅज्युएट डेंटल एज्युकेशनमध्ये (Undergraduate Dental Education) मोठा बदल होणार आहे. `बीडीएस`साठी आता नवे नियम लागू होणार आहेत. यात क्रेडिट बेस्ड सिस्टीम आणि इंटर्नशिपचा समावेश आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे.

अंडरग्रॅज्युएट डेंटल एज्युकेशनमध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत. `एमबीबीएस`च्या धर्तीवर डेंटल एज्युकेशन अर्थात दंतविषयक शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना आता एक वर्षाची इंटर्नशिप (Internship) सक्तीची करण्यात येणार आहे. तसंच सेमिस्टर पद्धतीचं पालन करावं लागणार आहे. बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (Bachelor of Dental Surgery) अर्थात बीडीएस कोर्सच्या मसुद्याच्या नियमानुसार, बीडीएस कोर्समध्ये आता क्रेडिट आधारित प्रणाली असेल. `बीडीएससा`ठी नवीन नियम तयार करणाऱ्या डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यकारी समितीचे सदस्या डॉ. अनिल कुमार चंदना यांनी अभ्यासक्रमातल्या बदलांबाबत अधिक माहिती दिली आहे.

असे असतील बदल

मसुद्याच्या नियमानुसार, बीडीएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साडेपाच वर्षे लागतील. सध्या हा अभ्यासक्रम साडेचार वर्षांत पूर्ण होतो. हा अभ्यासक्रम मुख्य विषय म्हणून विभागला जाईल, ज्याचा विद्यार्थ्यांना अभ्यास करावा लागेल. या शिवाय अभ्यासक्रमात वैकल्पिक विषय (Optional Subject) असतील. हे विषय निवडण्याचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असेल. तसंच यात फाउंडेशन कोर्सही (Foundation Course) समाविष्ट असतील. मसुद्यानुसार, फाउंडेशन कोर्स चे दोन प्रकार असतील. त्यात कंप्लसरी फाउंडेशन कोर्स आणि इलेक्टिव्ह फाउंडेशन कोर्सचा समावेश असेल.

वाचा - MBBS in Abroad: परदेशात मेडिकलचा अभ्यास करायचाय? मग या आहेत जगभरातील टॉप 5 युनिव्हर्सिटीज

नवीन अभ्यासक्रमात वैद्यकीय प्रशिक्षणाच्या परिणामांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने क्षमता-आधारित दृष्टीकोनाचा अवलंब करण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे. प्रत्येक कोर्ससाठी क्रेडिट्स प्रदान केले जातील आणि विद्यार्थ्यांना काही निवडक विषय निवडण्याची परवानगी देऊन निवड आधारित क्रेडिट देखील दिले जाईल. नवीन प्रणालीमुळे महाविद्यालयांमध्ये क्रेडिट ट्रान्सफरदेखील शक्य होणार आहे. सध्याच्या वार्षिक प्रणाली सेमिस्टर पद्धतीत (Semester System) बदलून नऊ सेमिस्टरमध्ये वैद्यकीय प्रशिक्षणाचाही समावेश केला जाईल, असा प्रस्ताव या मसुद्यात ठेवण्यात आला आहे. सध्या बीडीएस कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करावी लागत नाही. मात्र आता त्यांना एक वर्षाची इंटर्नशिप सक्तीची करण्यात येणार आहे.

याबाबत डॉ. अनिल कुमार चंदना म्हणाले, ``अंडर ग्रॅज्युएट डेंटल अभ्यासक्रमातील प्रस्तावित बदल अभ्यासक्रम शिकवण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल घडवून आणेल आणि हा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय दर्जाचा बनण्यासाठी प्रयत्न करेल. क्रेडिट आधारित प्रणालीसारख्या विविध तरतुदींमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणदेखील शक्य होईल. बदलाची ही प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. मसुदा नियमन राज्य आणि नॅशनल डेंटल कॉलेजसोबत शेअर करण्यात आला आहे. बीडीएस अभ्यासक्रमाबाबत आणलेल्या या नियमांमुळे पुढील काळात मोठे बदल पाहायला मिळतील,`` असं डॉ. चंदना यांनी स्पष्ट केलं.

First published:

Tags: Medical, Medical exams