Home /News /career /

Bank of Baroda Recruitment 2021: तरुणांसाठी महत्त्वाची बातमी, बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती

Bank of Baroda Recruitment 2021: तरुणांसाठी महत्त्वाची बातमी, बँक ऑफ बडोदामध्ये मोठी भरती

Bank of Baroda Recruitment: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. कारण, बँक ऑफ बडोदामध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. जाणून घ्या सविस्तर.

    मुंबई, 10 एप्रिल: बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)मध्ये विविध पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी (Recruitment) इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. एकूण 511 पदांसाठी ही भरती प्रक्रिया (Recruitment for 511 posts) होत असून यामध्ये सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर, ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर, टेरिटरी हेड, ग्रुप हेड, प्रोडक्ट हेड, हेड (ऑपरेशन्स आणि टेक्नोलॉजी, डिजिटल सेल्स मॅनेजर, आयटी फंक्शनल अ‍ॅनलिस्ट मॅनेजर सारख्या पदांचा समावेश आहे. कुठल्या पदासाठी किती जागा रिक्त सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर - 407 ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर - 50 टेरिटरी हेड - 44 ग्रुप हेड - 6 प्रोडक्ट हेड - 1 हेड (ऑपरेशन्स आणि टेक्नोलॉजी) - 1 डिजिटल सेल्स मॅनेजर - 1 आयटी फंक्शनल अ‍ॅनलिस्ट मॅनेजर - 1 हे पण वाचा : Aarogya Vighag Recruitment: महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 899 पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या पद आणि पगार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2021 आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी bankofbaroda.in या लिंकवर क्लिक करा. अर्ज कसा करायचा, शैक्षणिक अर्हता, अनुभव आणि इतर सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये तुम्हाला पहायला मिळेल. अधिक माहितीसाठी बँकेच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. bankofbaroda.in या वेबसाईटला भेट दिल्यावर तेथील करिअर सेक्शनवर क्लिक करा. तेथे संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात तुम्हाला पहायला मिळेल. या लिंकवर क्लिक करुन इच्छूक आणि पात्र उमेदवार अर्जाच्या पेजवर जाऊ शकतात. अर्ज करण्यासाठी 600 रुपये फी भरावी लागेल. तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल. ही फी ऑनलाईन माध्यमातून भरावी लागणार आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Bank, Job, Sarkari Naukari

    पुढील बातम्या