मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

धक्कादायक आकडेवारी! 'या' Top IT कंपन्यांवर आली संक्रांत; दर 5 पैकी 1 कर्मचारी सोडून जातोय नोकरी; Attrition Rate वाढला

धक्कादायक आकडेवारी! 'या' Top IT कंपन्यांवर आली संक्रांत; दर 5 पैकी 1 कर्मचारी सोडून जातोय नोकरी; Attrition Rate वाढला

एका वृत्तानुसार काही टॉप IT कंपन्यांमधील दर पाच पैकी एक कर्मचारी जॉब सोडून (Why IT employees Leaving their jobs?) जात आहे.

एका वृत्तानुसार काही टॉप IT कंपन्यांमधील दर पाच पैकी एक कर्मचारी जॉब सोडून (Why IT employees Leaving their jobs?) जात आहे.

एका वृत्तानुसार काही टॉप IT कंपन्यांमधील दर पाच पैकी एक कर्मचारी जॉब सोडून (Why IT employees Leaving their jobs?) जात आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई , 30 नोव्हेंबर: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून IT क्षेत्रातील कर्मचारी (Work from home for IT employees) घरून काम करत आहेत. वर्क फ्रॉम होममुळे (Work from home) कर्मचाऱ्यांना कुटुंबासह वेळ घालवत काम करता येत आहेत. विशेष म्हणजे कोरोना महामारीच्या काळात भल्याभल्या कंपन्यांना आर्थिक तोट्याचा सामना करावा लागला असताना IT कंपन्या (Profit to IT companies in corona) मात्र जोमात आहेत. मात्र असं सकारात्मक चित्र असेल तरी IT कंपन्यांसमोर मात्र एक वेगळीच समस्या आहे. खरं म्हणजे काही टॉप IT कंपन्यांमध्ये कर्मचारी सोडून जाण्याचं प्रमाण म्हणजेच Attrition rate प्रचंड वाढला (Increasing of Attrition rate in IT Industry) आहे. 'टेकगिग' या वेबसाईटनं दिलेल्या एका वृत्तानुसार काही टॉप IT कंपन्यांमधील दर पाच पैकी एक कर्मचारी जॉब सोडून (Why IT employees leaving their jobs?) जात आहे.

डिजिटल टॅलेंटच्या वाढत्या मागणीच्या अनुषंगाने IT कंपन्यांचा अ‍ॅट्रिशन रेट (What is Attrition Rate?) सातत्याने वाढत आहे. भारतीय आयटी कंपन्यांसाठी ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. आयटी सेवा कंपन्यांची मागणी मजबूत असताना, विक्रमी संख्येने तंत्रज्ञ एकतर संस्था बदलत आहेत किंवा थेट नोकरी सोडून जात आहेत. त्यामुळे या Attrition rate ला कमी करण्यासाठी कंपन्यांमध्ये चढाओढ लागली आहे.

बापरे! 2021 संपेपर्यंत तब्बल 10 लाख IT कर्मचारी सोडणार जॉब्स? भरतीसोबतच Attrition Rate मध्ये धक्कादायक वाढ

UnearthInsight या मार्केट इंटेलिजन्स फर्मच्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की आयटी क्षेत्रातील आर्थिक वर्ष 2022 च्या उत्तरार्धातही राजीनाम्याचा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे IT कंपन्या एकीकडे हजारो कर्मचाऱ्यांना काम देण्याच्या विचारात असेल तरी दुसरीकडे मात्र आहेत त्या कर्मचाऱ्यांना थांबवण्यात अपयशी ठरत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांची नोकरी सोडून जाण्यामागची कारणं नेमकी आहेत तरी काय? त्याआधी बघूया काय सांगतो हा रिपोर्ट.

काय आहे रिपोर्ट

फायनान्शिअल इअर 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत (ऑक्टो ते मार्च) IT क्षेत्रामध्ये 17-19% कर्मचारी कमी होण्याची अपेक्षा आहे. तसंच दर पाचपैकी एक कर्मचारी नोकरी सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या Attrition Rate चा सामना करण्यासाठी काही टॉप IT कंपन्यांनी निरनिराळ्या प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली आहे. अधिक अ‍ॅट्रिशनचा सामना करण्यासाठी टॉप आयटी कंपन्या तब्बल 4.5 लाख कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याच्या तयारीत आहेत.

कोणत्या कंपनीचा किती Attrition Rate

भारतातील काही टॉप IT कंपन्यांपैकी काही कंपन्यांचे Attrition Rate पुढीलप्रमाणे आहेत. Wipro कंपनीमध्ये सर्वाधिक Attrition Rate आहेत. Wipro चा Attrition Rate सर्वाधिक म्हणजेच 20.5% आहे. तर यापाठोपाठ Infosys आहे. Infosys चा Attrition Rate 20.1% आहे. तसंच TCS चा Attrition Rate 11.9% आहे.

Online Upskilling courses: करिअरची नवी सुरुवात करताय? मग हे कोर्सेस कराच

कर्मचारी का सोडून जाताहेत कंपनी

कोरोनामुळे IT कर्मचारी घरून काम करत होते. मात्र आता अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम बंद करून कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही कर्मचारी अशा कंपनीच्या शोधात असू शकतात ज्या कंपन्या वर्क फ्रॉम होमला परवानगी देतील. म्हणून असे कर्मचारी कंपनीसोडून जाऊ शकतात.

IT सेक्टरमध्ये इतर क्षेत्रांच्या तुलनेत पगार हे चांगले असतात आणि कामानुसार सतत पगारवाढही होत असते यात शंका नाही. मात्र काही फ्रेशर्सना म्हणावा तसा किंवा अपेक्षेपेक्षा कमी पगार मिळतो. म्हणूनच अधिक पगार मिळवण्याच्या हेतूनं कर्मचारी जॉब्स सोडून जाऊ शकतात.

First published:

Tags: Career, जॉब