जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / THE Asia Ranking 2022: आशियात चीनमधील विद्यापीठांचा बोलबाला; भारतातील किती आणि कोणत्या विद्यापीठांचा समावेश

THE Asia Ranking 2022: आशियात चीनमधील विद्यापीठांचा बोलबाला; भारतातील किती आणि कोणत्या विद्यापीठांचा समावेश

THE Asia Ranking 2022: आशियात चीनमधील विद्यापीठांचा बोलबाला; भारतातील किती आणि कोणत्या विद्यापीठांचा समावेश

यावर्षी भारतातील फक्त चार विद्यापीठं टॉप 100 मध्ये आहेत. टॉप 200 मध्ये 17 भारतीय विद्यापीठं (Indian Universities) आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 18 वर होता.

    मुंबई, 4 जून : चिनी विद्यापीठांनी (Chinese Universities) पुन्हा एकदा आशिया खंडातील (Asian Region) सर्वोत्तम उच्च शैक्षणिक संस्था म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. टाईम्स हायर एज्युकेशन (THE Ranking) क्रमवारीनुसार, या वर्षीच्या आशिया रँकिंगमध्ये सलग तिसर्‍या वर्षी पहिल्या दोन्ही स्थानांवर चीनमधील विद्यापीठे आहेत. इतकंच नाही तर चीनमधील जवळपास 30 विद्यापीठं पहिल्या शंभरांमध्ये आहेत. चीनमधील त्सिंगुआ (Tsinghua University) आणि पेकिंग या विद्यापीठांनी (Peking University) सलग तिसऱ्या वर्षी आशियातील अव्वल शैक्षणिक संस्था म्हणून स्थान मिळवले आहे. सौदी अरेबियातील (Saudi Arabian) विद्यापीठांनी अचानक उसळी मारत पुढे मुसंडी मारली आहे. त्यांनी आशियातील काही सर्वोत्तम विद्यापीठांनाही मागे टाकलं आहे. आता टॉप 100 मध्ये सहा सौदी अरेबियन विद्यापीठं आहेत. गेल्या वर्षी या देशातील चार विद्यापीठं टाइम्सच्या यादीमध्ये होती. या क्रमवारीत 28 व्या क्रमांकावर असलेलं सौदी अरेबियातील किंग अब्दुलाझीझ विद्यापीठ (King Abdulaziz University) हे सर्वोत्तम कामगिरी करणारी संस्था ठरली आहे. 2020च्या तुलनेत जपानच्या (Japan) कामगिरीमध्ये मात्र घसरण झाली आहे. 2020मधील यादीमध्ये टॉप 100 मध्ये असलेली सहा जपानी विद्यापीठं यादीतून बाहेर फेकली गेली आहेत. गेल्यावर्षी टॉप 100मध्ये 14 जपानी विद्यापीठं होती तर, या वर्षी फक्त आठ विद्यापीठांना या यादीमध्ये स्थान मिळवण्यात यश आलं आहे. असं असलं तरी जपान हे एकंदरीत सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारं राष्ट्र आहे. टॉप 200 मध्ये जपानच्या 118 शैक्षणिक संस्था (Japanese Institutions) आहेत. भारताबद्दल बोलायचं झाल्यास, आपला देश चीन, जपान आणि सौदी अरेबियानंतर आहे. या वर्षी भारतातील फक्त चार विद्यापीठं टॉप 100 मध्ये आहेत. टॉप 200 मध्ये 17 भारतीय विद्यापीठं (Indian Universities) आहेत. गेल्या वर्षी हा आकडा 18 वर होता. टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारी : आशियातील सर्वोत्तम विद्यापीठं 1: त्सिंगुआ विद्यापीठ, चीन 2: पेकिंग विद्यापीठ, चीन 3: नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर 4: युनिव्हर्सिटी ऑफ हाँग काँग 5 : नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर 6: युनिव्हर्सिटी ऑफ टोकियो 7: चायनिज युनिव्हर्सिटी ऑफ हाँग काँग 8: सेउल नॅशनल युनिव्हर्सिटी 9: द हाँग काँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी 10: फुदान युनिव्हर्सिटी, चीन 11: झेजियांग युनिव्हर्सिटी 12: क्योटो युनिव्हर्सिटी 13: शांघाय जिआओ टाँग युनिव्हर्सिटी 14: कोरिया अॅडव्हान्स्ड इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी 15: हाँग काँग पॉलिटेक युनिव्हर्सिटी 16 : युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ चायना 17: नानजिंग युनिव्हर्सिटी, चीन 18: सुंगक्युंवान युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरिया 19: सदर्न युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, चीन 20: उल्सन नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, दक्षिण कोरिया टाईम्स हायर एज्युकेशन क्रमवारी : भारतातील सर्वोत्तम 42: इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्सेस 65: जेएसएस अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च 68: आयआयटी रोपार 87: आयआयटी इंदूर 120: आयआयटी गांधीनगर 122: आलागप्पा युनिव्हर्सिटी 127: थापर इन्स्टिट्युट इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी 131: सविथा युनिव्हर्सिटी 139: महात्मा गांधी युनिव्हर्सिटी 149: दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी 153: बनारस हिंदू युनिव्हर्सिटी 158: इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी 160: जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी टाईम्स हायर एज्युकेशनचे मुख्य ज्ञान अधिकारी(Chief Knowledge Officer), फिल बॅटी (Phil Baty) म्हणाले, ‘आकड्यांवरून असं दिसून येतंय की, आशिया हा जगातील उच्च शिक्षण, संशोधन आणि नवनिर्मितीसाठी सर्वांत चांगला आणि सर्वांत प्रगतीशील खंड आहे.’ अध्यापन (शिकण्याचे वातावरण), संशोधन (खंड, उत्पन्न आणि प्रतिष्ठा), सायटेशन्स (संशोधनाचा प्रभाव), आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन (कर्मचारी, विद्यार्थी आणि संशोधन) आणि उद्योग उत्पन्न (ज्ञान हस्तांतरण) या पाच क्षेत्रांमध्ये या निवडीसाठीचे परफॉर्मन्स इंडिकेटर विभागलेले आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात