मुंबई, 14 जानेवारी: ‘अॅपल’ आणि ‘मेटा’ या जगातल्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांत काम करणं हे अनेकांचं स्वप्न असायचं. आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या तर प्रत्येक कर्मचाऱ्याला वाटायचं, की त्याला या दोन कंपन्यांपैकी एका कंपनीमध्ये तरी जॉब मिळावा; पण आता तसं राहिलं नसल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 2023मध्ये काम करण्यासाठी 100 सर्वोत्कृष्ट कंपन्यांची यादी ग्लासडोअर (Glassdoor) कंपनीने तयार केली आहे. त्या यादीत स्थान मिळवण्यात ‘अॅपल’ आणि ‘मेटा’ या दोन्ही कंपन्या अपयशी ठरल्या आहेत. या दिग्गज कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम सुविधा आणि वातावरण प्रदान करण्यासाठी ओळखल्या जातात. तरीही त्यांना काम करण्यासाठी उत्तम असणाऱ्या 100 सर्वोत्कृष्ट ठिकाणांच्या यादीत स्थान मिळालं नाही. फ्रेशर्स असाल तर हा गोल्डन चान्स सोडूच नका; थेट केंद्रीय मंत्रालयात 106 जागांसाठी होतेय मेगाभरती; करा अप्लाय ग्लासडोअरद्वारे कर्मचार्यांच्या अभिप्रायावर आधारित तयार करण्यात आलेल्या या अहवालात काम करण्यासाठी योग्य असणाऱ्या ठिकाणांच्या यादीत अॅपल आणि मेटा पहिल्या 100 कंपन्यांमध्येही स्थान मिळवू शकल्या नाहीत. त्याचबरोबर टॉप 10 च्या यादीत ‘गुगल’ हे नाव आहे; मात्र ती कंपनी 8व्या क्रमांकावर आहे. या यादीत मायक्रोसॉफ्ट कंपनी 13 व्या क्रमांकावर आहे. Indian Army Recruitment: देशसेवेची सुवर्णसंधी पुन्हा नाही; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडियन आर्मीत बंपर ओपनिंग्स; लगेच करा अप्लाय पहिल्या क्रमांकवर कोण? 2023साठी ग्लासडोअरने केलेल्या यादीमध्ये टॉप 10 कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी गेनसाईट (Gainsight) पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय टॉप 10 मध्ये NVIDIA , Box, Bain & Company, McKinsey & Company यांसह इतर काही कंपन्यांचा समावेश आहे. कर्मचार्यांच्या अभिप्रायावर आधारित असलेल्या या अहवालात, 19 ऑक्टोबर 2021 ते 17 ऑक्टोबर 2022 दरम्यान किमान 1000 कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अभिप्रायाचा समावेश आहे. ग्लासडोअरची रेटिंग प्रणाली स्वयंसेवी आणि अज्ञात कर्मचारी मत सर्वेक्षणांवर आधारित आहे. MPSC Recruitment: महिन्याचा तब्बल 2 लाखांपेक्षा जास्त पगार आणि थेट अधिकारी होण्याची संधी; करा अप्लाय याबाबात इनसाइडरशी बोलताना ग्लासडोअरचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ डॅनियल झाओ म्हणाले, की ‘या वर्षीचे रँकिंग कम्युनिकेशन, फ्लेक्झिबिलिटी आणि पारदर्शकता यांसारख्या सामान्य मुद्द्यांवर आधारित आहे, जे कंपनीच्या आर्थिक दृष्टिकोनाबद्दल कर्मचार्यांचं मत प्रतिबिंबित करतं.’
दरम्यान, कोरोना महामारीच्या वेळी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. यामध्ये आघाडीच्या कंपन्यांचासुद्धा समावेश होता. कंपनीमध्ये करण्यात आलेल्या या कॉस्ट कटिंगमुळे नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय बरा, अशी मानसिकता होऊ लागली आहे. त्यातच एके काळी नोकरी करण्यासाठी सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीतलं मतही बदलताना दिसत आहे. ग्लासडोअरचा हा अहवाल काही प्रमाणात हेच अधोरेखित करताना दिसतोय.