कोट्यवधीत फी नसणार आनंद महिंद्रा यांच्या या ट्विटनंतर अनेक युजर्सनी त्यांना सांगितले की, भारतातून मोठ्या संख्येने मुले वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये केवळ जागांच्या कमतरतेमुळे जात नाहीत. त्यापेक्षा भारतातील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च हेही एक मोठे कारण आहे. याबाबत पी. वमशीधर रेड्डी नावाच्या युजरने आनंद महिंद्रा यांना विनंती केली की, तुम्ही तुमच्या संस्थेत काळजी घ्या की त्याची फी इतर संस्थांप्रमाणे कोट्यवधीमध्ये नसावी, त्यावर आनंद महिंद्रा म्हणाले की, मी काळजी घेईन.I had no idea that there was such a shortfall of medical colleges in India. @C_P_Gurnani could we explore the idea of establishing a medical studies institution on the campus of @MahindraUni ? https://t.co/kxnZ0LrYXV
— anand mahindra (@anandmahindra) March 3, 2022
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटद्वारे शेअर केलेल्या बातमीनुसार, भारतातील सुमारे 18,000 मुले युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. तर सर्वाधिक 23,000 मुले वैद्यकीय पदवी घेण्यासाठी चीनमध्ये गेले आहेत. इतके विद्यार्थी बाहेर शिक्षण घेतात याचं त्यांना आश्चर्य वाटलं आहे. त्यामुळे लवकरच भारतात परवडणाऱ्या पैशात वैद्यकीय शिक्षण मिळण्याची शक्यता आहे.Noted. https://t.co/HQilTVJbe9
— anand mahindra (@anandmahindra) March 3, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.