कायच्या काय! सिनेमा पाहात मस्त पिझ्झा खायचा आणि या कामाचा Netflix चक्क पगारही देणार!

कायच्या काय! सिनेमा पाहात मस्त पिझ्झा खायचा आणि या कामाचा Netflix चक्क पगारही देणार!

जगात लोक उपजीविका चालवायला नाना प्रकारची कामं करतात. इथं Netflix हा OTT प्लॅटफॉर्म कमालीचं भन्नाट काम करायचा पगार देणार आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 14 जानेवारी : अनेकदा कित्येकजण नावडतं काम नोकरी म्हणून करत असताना आपण पाहतो. त्यांचा जातो नाईलाज असतो. मात्र मनोरंजनाच्या नावावर आपण जे करतो तेच आपलं काम असेल असा विचार कुणी केलाय का? या चित्रविचित्र जगात हेसुद्धा खरोखर घडतं आहे.

एक अमेरिकन कंपनी ही अविश्वसनीय ऑफर आणि नोकरी लोकांना देते आहे. नेटफ्लिक्स बघा, सोबत पिझ्झाचाही आस्वाद घ्या आणि वर घ्या मस्त पगार! बोनसफाईन्डर ही एक अमेरिकन वेबसाईट आहे. ही वेबसाईट वैध-कायदेशीर जुगार अर्थात (गॅम्बलिंग)साठी केल्या जाणाऱ्या सौद्यांची चिकित्सा-समीक्षा करत असते. आता या कंपनीला ( Netflix professional binge watchers) प्रोफेशनल बिंज वॉचर्स म्हणजे व्यावसायिक पद्धतीनं सलग सिनेमे किंवा वेब सिरीज पाहणारे  पाहिजे आहेत. असे लोक, जे अधिकाधिक वेळ नेटफ्लिक्स किंवा सिनेमे पाहू शकतात.

बोनसफाईंडरनं आपल्या वेबसाईटवर सांगितलं आहे, की 2021 मध्ये लॉकडाऊन संपल्यानंतर बोनसफाईंडरची टीम एक नवी जॉब ऑफर लोकांना देत त्यांना एकदम खुश करणार आहे. आम्ही नेटफ्लिक्स बघत पिझ्झा खाण्याचा पगार देऊ.

पुढं त्यांनी लिहिलं आहे, '9 फेब्रुवारीच्या 'नॅशनल पिझ्झा डे'ला एका नशीबवान व्यक्तीला काही पिझ्झा देत सोबतच तीन नेटफ्लिक्स शोज दाखवत आम्ही 500 डॉलर्स देणार आहोत. यासाठी निवडलेल्या उमेदवाराला कथा आणि प्लॉट, अभिनय आणि एकूणच कलाकृतीची गुणवत्ता यांची समीक्षा करावी लागेल. हरेक सीरिज संपल्यावर ही समीक्षा केली जाणं अपेक्षित आहे. शिवाय ज्याचा आस्वाद घेतला त्या पिझ्झाची चव, किंमत या सगळ्यांचीही समीक्षा या व्यक्तीनं करावी.

यादरम्यानच अजून एका भन्नाट नोकरीची ऑफर सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. ब्रिटनची एक कंपनी स्लिपर टेस्टर या पदासाठी व्यक्तींना निवडते आहे. निवड झालेल्या व्यक्तीला महिन्यातून 2 दिवस 12 तास स्लिपर घालावी लागेल. त्यासातही 333 पाउंड इतकं वेतन दर महिन्याला दिलं जाईल.

Published by: News18 Desk
First published: January 14, 2021, 6:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading