मराठी बातम्या /बातम्या /करिअर /तब्बल 4200 केबिन क्रू अन् 900 पायलेट्ससाठी बंपर ओपनिंग्स; AIR INDIA मध्ये मोठ्या भरतीची घोषणा

तब्बल 4200 केबिन क्रू अन् 900 पायलेट्ससाठी बंपर ओपनिंग्स; AIR INDIA मध्ये मोठ्या भरतीची घोषणा

एअर इंडियात होणार मेगाभरती

एअर इंडियात होणार मेगाभरती

एअर इंडिया या वर्षी एकूण 5100 क्रू मेंबर्सची भरती करणार आहे. यामध्ये 4200 केबिन क्रू आणि 900 वैमानिकांचा समावेश असेल.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 फेब्रुवारी: टाटा उद्योग समूहाने जानेवारी 2022च्या अखेरीस एअर इंडिया (एआय) आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा (एआय एक्स्प्रेस) ताबा घेतला होता. तेव्हापासून ही विमान वाहतूक कंपनी सातत्याने चर्चेत आहे. टाटांनी कंपनीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यास आणि कंपनीचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडिया या वर्षी एकूण 5100 क्रू मेंबर्सची भरती करणार आहे. यामध्ये 4200 केबिन क्रू आणि 900 वैमानिकांचा समावेश असेल. कंपनी आपल्या ताफ्यात शेकडो नवीन विमानं सामावून घेण्याची तयारी करत आहे. त्यासाठी जास्त मनुष्यबळाची आवश्यकता भासेल. म्हणून कंपनीने नवीन कर्मचारी भरती सुरू करण्याचा विचार केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत कंपनीनं नवीन 1900 हून अधिक केबिन क्रू आणि 285 पायलट भरती केले आहेत. 'द टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

"रूम भाड्याने देऊन असे किती पैसे कमावणार?" लोकांनी डिवचलं अन् पठ्ठयानं उभी केली 8000 कोटींची कंपनी

संपूर्ण देशभरातून केबिन क्रूची भरती केली जाईल. त्यानंतर त्यांच्यासाठी सुरक्षितता आणि सेवा कौशल्यं प्रदान करणारा 15 आठवड्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाईल. या प्रशिक्षणादरम्यान नवीन कर्मचाऱ्यांना भारतीय आदरातिथ्य पद्धती आणि टाटा समूहातलं वर्क कल्चर या अनुषंगाने प्रशिक्षित केलं जाईल. मे 2022 ते फेब्रुवारी 2023दरम्यान एअर इंडियाने 1900 पेक्षा जास्त केबिन क्रू कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. गेल्या सात महिन्यांत (जुलै 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान) 1100 हून अधिक केबिन क्रू कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलं आहे. गेल्या तीन महिन्यांत 500 केबिन क्रू कर्मचाऱ्यांना विमान कंपनीनं प्रत्यक्ष उड्डाणासाठी सज्ज केलं आहे.

Bank Jobs: जागा तब्बल 203 आणि पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; इंडियन बँकेत जॉबची ही घ्या डायरेक्ट लिंक

एआयच्या इनफ्लाइट सर्व्हिसेसचे प्रमुख संदीप वर्मा म्हणाले, "महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केलेल्या मोठ्या विमान खरेदीच्या ऑर्डरमुळे, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत नेटवर्कमध्ये अधिक उड्डाणं करण्यात व एआयएक्स कनेक्टसह देशांतर्गत मार्गांचं री-अलाइनमेंट करण्यास मदत होईल. या बदलांच्या आधारे एअर इंडिया ग्रुपची वर्तमान स्थिती आणि भविष्य घडवण्यात केबिन क्रू निर्णायक भूमिका बजावेल. आम्ही आणखी काही पायलट्स आणि मेंटेनन्स इंजिनीअर्सची नियुक्ती करण्याचाही विचार करत आहोत." टाटा समूह सद्यस्थितीत आपल्या कंपन्यांमध्ये सुमारे 10 लाख जणांना रोजगार देत आहे.

कंपनीने गेल्या आठवड्यात 470 विमानांची (70 वाइड-बॉडी आणि 400 सिंगल-आयल्स) विक्रमी ऑर्डर दिली आहे. भविष्यात आणखी 370 विमानं खरेदी करण्याचाही कंपनीचा विचार आहे. या व्यतिरिक्त कंपनीने 36 विमानं भाड्यानं घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी दोन वाइड बॉडी विमानं आधीच ताफ्यात समाविष्ट झाली आहेत.

First published:
top videos

    Tags: Air india, Career, Career opportunities, Job Alert, Jobs Exams