नवी दिल्ली, 11 सप्टेंबर: यंदा कोरोनामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत. मात्र आता संपूर्ण देशभरात Admission चे वारे वाहू लागले आहेत. विविध शाखांमधील निरनिराळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया (Admissions in top universities) सुरु झाली आहे. त्यात देशातील टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश मिळवणं (How to take admissions in top universities in India) कठीणच. अनेक विद्यार्थ्यांना तर अशा मोठ्या आणि नामांकित युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय (How to apply for admissions in top universities in India) कसं करणार याबद्दल माहितीच नसते. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप युनिव्हर्सिटीजमध्ये प्रवेश कसा मिळवणार आणि त्यासाठी अप्लाय कसं करणार? याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC), बेंगळुरू
IISCनं NIRF रँकिंगच्या विद्यापीठ श्रेणीमध्ये पहिलं स्थान मिळवललं आहे. IISC मधील पदवीपूर्व अभ्यासक्रमांना JEE, NEET, KVPY, त्यानंतर मुलाखतीसह राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांद्वारे प्रवेश दिला जातो. MTech अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांना GATE आणि पात्रता चाचणीसाठी पात्र असणं आवश्यक आहे तर MD, SEED आणि व्यवस्थापन कार्यक्रमांमध्ये प्रवेश कॅटच्या आधारावर केला जातो. जे PHD प्रोग्रामसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांना जेएएम आणि जेईएसटी प्रवेश परीक्षांसाठी पात्र व्हावे लागेल.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), नवी दिल्ली
JNU संगणक-आधारित चाचणी (CBT) द्वारे विविध पदवी, पदव्युत्तर आणि एमफिल पीएचडी प्रोग्राममध्ये प्रवेश देतं. एमफिल आणि पीएचडी प्रवेशासाठी उमेदवारांना व्हिवा-व्हॉईस परीक्षेला बसणं देखील आवश्यक असत. जेएनयू प्रवेश परीक्षा (JNUEE) आणि बायोटेक्नॉलॉजीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (SEEB) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतली जाते. या परीक्षा उत्तीर्ण करून इथे प्रवेश मिळवता येतो.
हे वाचा - Indian Navy Recruitment: भारतीय नौसेनेत इंजिनिअर्सच्या तब्बल 181 जागांसाठी भरती
बनारस हिंदू विद्यापीठ (BHU), वाराणसी
BHU मध्ये प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा - UET आणि PET आयोजित केली जाते. MBA प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी कॉमन अॅप्टिट्यूड टेस्ट (CAT) पास करणे आवश्यक आहे.
अमृता विश्व विद्यापीठ, कोईम्बतूर
संस्था बीटेक अभ्यासक्रमांना अमृता प्रवेश परीक्षा (AEEE) किंवा संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य द्वारे प्रवेश देते. उमेदवारांनी त्यांचा अर्ज अधिकृत वेबसाइटवर सादर करणं आवश्यक आहे आणि ज्यांना शॉर्टलिस्ट केले आहे त्यांना मुलाखतीसाठी उपस्थित राहणं आवश्यक आहे. मास कम्युनिकेशन आणि फिलॉसॉफी सारख्या इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी, सामान्य अभियोग्यता चाचणी (CAP TEST) घेतली
जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
JMI मध्ये प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध अर्ज स्वतंत्रपणे भरावा.जाते.
मणिपाल हायर एज्युकेशन अकॅडमी, मणिपाल
मणिपाल अकादमीमध्ये UG आणि PG अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना MAHE द्वारे घेतल्या जाणाऱ्या MET (MU OET) प्रवेश परीक्षेसाठी पात्र व्हावे लागेल. BArch कार्यक्रमासाठी, JEE पेपर 2 किंवा NATA गुण स्वीकारले जातात तर MBA साठी, CAT, MAT, CMAT, XAT मधील उमेदवारांनी मिळवलेले गुण विचारात घेतले जातात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, JNU