जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / संस्कार आणि शिस्तीसाठी मुलांना मिल्ट्री स्कुलमध्ये प्रवेश द्यायचाय? मग किती असते फी आणि प्रोसेस? इथे मिळेल माहिती

संस्कार आणि शिस्तीसाठी मुलांना मिल्ट्री स्कुलमध्ये प्रवेश द्यायचाय? मग किती असते फी आणि प्रोसेस? इथे मिळेल माहिती

मिल्ट्री स्कुलमध्ये प्रवेश

मिल्ट्री स्कुलमध्ये प्रवेश

आज आम्ही तुम्हाला सैनिक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया कशी असते आणि त्यांची फी किती असते? याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 10 डिसेंबर: ‘तू चांगला वागला नाहीस किंवा वागली नाहीस तर तुला आम्ही मिल्ट्री स्कुलला पाठवून देऊ’ अशी धमकी आपण नेहमीच लहानपणापासून ऐकत आलो आहोत. मुलं नीट वागली नाहीत की मुलांना होस्टेलची किंवा मिल्ट्री स्कुलची भीती दाखवण्यात येते. याचं प्रमुख कारण म्हणजे सैनिक शाळांमध्ये असलेली शिस्त. मुलांना चांगली शिस्त लागावी आणि चांगले संस्कार मिळावे यासाठी काही पाला आपल्या मुलांना सैनिक शाळांमध्ये पाठवतात. इथे त्यांना उत्तम ट्रेनिंग आणि शिक्षण मिळतं. तुमच्याही मुलांना सैनिक शाळांमध्ये प्रवेश मिळावा असं तुम्हाला वाटतं का? मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सैनिक शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया कशी असते आणि त्यांची फी किती असते? याबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. किती असावं मुलांचं वय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा दरवर्षी NTA द्वारे घेतली जाते. या परीक्षेद्वारे इयत्ता 6 वी आणि 9 वी मध्ये प्रवेश मिळतो. इयत्ता 6 मधील प्रवेशासाठी मुलाचे वय 10 ते 12 वर्षे, तर 9वी मधील मुलाचे वय 13 ते 15 वर्षे दरम्यान असावे. सैनिक शाळांमध्ये मुलांचे प्रवेश त्यांची कार्यक्षमता आणि वैद्यकीय तंदुरुस्ती तपासूनच केले जातात. क्या बात है! कोणतीच परीक्षा नाही आणि महिन्याचा 1,40,000 रुपये पगार; इथे मिळतेय थेट नोकरी अशी असते प्रवेश परीक्षा अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा अर्ज ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान भरला जातो. परीक्षा जानेवारीत घेतली जाते. कसा करावा अर्ज अखिल भारतीय सैनिक शाळा परीक्षेसाठी NTA द्वारे दरवर्षी अधिसूचना जारी केली जाते. ज्या अंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरले जातात. वेबसाइटवर ऑनलाइन फॉर्म भरताना, मुलांनी त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा ईमेल आयडी किंवा फोन नंबर टाकला पाहिजे जेणेकरून NTA ची सर्व माहिती ईमेल किंवा संदेशाद्वारे मुलांपर्यंत पोहोचू शकेल. SSC CHSL Recruitment: तब्बल 4500 जागा आणि पात्रता फक्त 12वी; सरकारी नोकरीची मोठी संधी; करा अप्लाय वैद्यकीय फिटनेस चाचणी लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाची वैद्यकीय फिटनेस चाचणीही द्यावी लागते. यानंतर सैन्यभरतीप्रमाणे मुलाची पडताळणी केली जाते, त्यानंतर प्रवेश दिला जातो. सैनिक शाळेची फी सैनिक शाळा या सामान्य शाळांपेक्षा खूप वेगळ्या आणि चांगल्या मानल्या जातात, म्हणूनच इथे फी देखील खूप वेगळी आहे. सैनिक शाळांच्या वार्षिक शुल्काबद्दल बोलायचे तर ते सुमारे 50,000 रुपये ते सुमारे 1,00,000 रुपये आहे. फी शाळेच्या प्रसिद्धी आणि शिक्षण पद्धतीवर अवलंबून असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात