जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Alerts : सुरुवातीलाच 6 लाखांचं पॅकेज मिळतं; मुंबई विद्यापीठात 4 पैकी कुठलाही 1 कोर्स करा

Career Alerts : सुरुवातीलाच 6 लाखांचं पॅकेज मिळतं; मुंबई विद्यापीठात 4 पैकी कुठलाही 1 कोर्स करा

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

मुंबई विद्यापीठ, मुंबई.

विविध प्रकारची माहितीचे विश्लेषण हे संख्याशास्त्र करते. या क्षेत्राकडे तरुणांची ओढ वाढत आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. मुंबई विद्यापीठात संख्याशास्त्र विभागात 4 कोर्सेसचे प्रवेश सुरू झालेले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 2 जुलै : विषय कोणताही असो, त्यातील संशोधन संख्याशास्त्राशिवाय परिपूर्ण होत नाही. एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारे आगामी काळातील घटनांचा अनुमान बांधणे म्हणजे संख्याशास्त्र. विविध प्रकारची माहितीचे विश्लेषण हे संख्याशास्त्र करते. या क्षेत्राकडे तरुणांची ओढ वाढत आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. मुंबई विद्यापीठात MSc in Statistics, Certificate Course in SPSS, Post Graduate Diploma in Applied Statistics with Software, Post Graduate Diploma in Actuarial Science असे कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्सेस पूर्ण केेले की, भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यातील एक-एक कोर्सेची माहिती आपण घेऊया… 1) MSc in Statistics : या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन सुरू असून 4 जुलै अंतिम तारीख आहे. 2 वर्षांचा कोर्स असून यामध्ये 4 सेमीस्टर असणार आहेत. या कोर्सची एका वर्षाची फी 12000 इतकी असून विद्यार्थ्यांची संख्या 60 पर्यंत मर्यादित आहे. विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार आरक्षण देण्यात येते. वाचा :  2023 पर्यंत या 3 राशीच्या लोकांवर केतुची राहणार कृपा दृष्टी; करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी 2) Certificate Course in SPSS : या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया ऑनलाईन होणार असून त्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. 10,000 रुपये हा कोर्सची फी असणार आहे. 6 महिन्यांचा हा कोर्स आहे. विद्यार्थ्यांच्या संख्या 30 पर्यंत मर्यादित आहे. 3) Post Graduate Diploma in Applied Statistics with Software : या कोर्सची प्रवेश प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झाली आहे. 1 वर्षांचा हा कोर्स असून 2 सेमिस्टरमध्ये हा कोर्स पूर्ण केला जातो. या कोर्सची फी 40 हजार आहे. विद्यार्थ्यांची मर्यादा 50 इतकी आहे. वाचा :  Pune : सायन्स, काॅमर्स, आर्ट्स तीनही क्षेत्रात करिअर करता येतं; फक्त ‘या’ कोर्समध्ये घ्या प्रवेश 4) Post Graduate Diploma in Actuarial Science : या कोर्सची प्रवेश प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू झालेली आहे. एकूण 2 सेमिस्टरचा असा 1 वर्षांचा हा कोर्स असणार आहे. विद्यार्थ्यांची संख्या 50 आहे, तर 40 हजार इतकी या कोर्सची फी असणार आहे. जाॅबच्या संधी कुठं आणि किती पगाराचे जाॅब आहेत?  संख्याशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण संस्था, प्रसार माध्यमं, बिझनेस एनालिटिक्स, डेटा सायन्स, अशा विविध क्षेत्रांत जाॅबच्या भरपूर संधी आहेत. संख्याशास्त्रामध्ये वरील कोर्स पूर्ण केल्यानंतर किमान 6 लाखांचं पॅकेज मिळतं. मुंबई विद्यापीठात संख्याशास्त्र विभागामध्ये प्लेसमेंट सेल 2000 पासून कार्यरत आहे. दरवर्षी 15 कंपन्या प्लेसमेंटसाठी येतात. इतकंच नाही, तर त्यातून 80 टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळते. कोर्ससंबंधी चौकशीसाठी संपर्क कसा कराल? मुंबई विद्यापीठाच्या सुनियोजित विद्यानगरी कॅम्पसमध्ये असलेल्या लोकमान्य टिळक भवनमध्ये सांख्यिकी विभाग आहे. विद्यानगरी कॅम्पस कलिना जवळ CST रोड (आता विद्यानगरी मार्ग म्हणून ओळखले जाते) जवळ आहे. या पत्त्यावर तुम्ही भेट देऊन चौकशी करू शकता. तसेच https://mu.ac.in/department-of-statistics या वेबसाईटवरही तुम्ही भेट देऊ शकता. 91 22 2653 3710 क्रमांकावर संपर्क करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात