जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / विद्यार्थ्यांची कमाल! जिल्हा परिषदेच्या शाळेतील 36 विद्यार्थी करणार विमानवारी; कारण वाचून वाटेल अभिमान

विद्यार्थ्यांची कमाल! जिल्हा परिषदेच्या शाळेतील 36 विद्यार्थी करणार विमानवारी; कारण वाचून वाटेल अभिमान

निवड झालेलं zp शाळेतील विद्यार्थी

निवड झालेलं zp शाळेतील विद्यार्थी

आज काही लहान शाळेत शिकणाऱ्या मुलांनी (Success story of Students) मोठमोठ्या लोकांच्या भुवया उंचावतील असं काम करून दाखवलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

यवतमाळ, 25 मार्च:  मनात जिद्द आणि कठीण परिस्थतीतून वाट काढत पुढे जाण्याची क्षमता असली तर काहीच अशक्य नाही हे आपण अनेकदा ऐकलं आहे. अनेकांना हे वाक्य खरंही करून दाखवलं आहे. मात्र आज काही लहान शाळेत शिकणाऱ्या मुलांनी  (Success story of Students) मोठमोठ्या लोकांच्या भुवया उंचावतील असं काम करून दाखवलं आहे.  यवतमाळ (Yavatmal News) जिल्हयातील तब्बल 36 विद्यार्थ्यांनी महादीप परीक्षा (Mahadeep Exam) उत्तीर्ण केली आहे. संकटाला संधी मानून संघर्ष करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतलेल्या महादीप परीक्षेत बाजी (Students passed in Mahadeep Exam) मारत 36 विद्यार्थ्यांनी दिल्ली भेटीसाठी  विमानाचे तिकीट (ZP students will travel by plane) निश्चित करून घेतले. मोठी बातमी! यंदा शाळांना उन्हाळ्याची सुटी नाही; एप्रिलमध्येही पूर्ण वेळ शाळा आणि परीक्षा खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना बाल वयातच स्पर्धा परीक्षांची सवय लागावी यासाठी शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून वर्षभर महादीप उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर मंगळवारी जिल्हास्तरीय परीक्षा घेण्यात आली. त्यात 36 विद्यार्थी पात्र ठरले. त्यापैकी सर्वाधिक 11 विद्यार्थी एकट्या घाटंजी पंचायत समितीमधील आहेत. विशेष म्हणजे येथील तिवसाळा जिल्हा परिषद शाळेचे तब्बल सात विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. येथील श्रवण अडकिने व मनीष मुनेश्वर या दोघांनी 50 पैकी 49 गुण मिळवून जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातील चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांमधून केंद्र, तालुका आणि जिल्हा पातळीवरील परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करून 36 विद्यार्थी पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा जिल्हा परिषदेत आयोजित होणार आहे. तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. सेस फंडातून विजेत्यांना सायकल देण्याचेही नियोजन केले आहे. तसेच येत्या काळात या विद्यार्थ्यांना विमानाने दिल्लीवारी घडविली जाणार आहे. Breaking: शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय; राज्यातील शाळा 100% उपस्थितीसह सुरु करण्यास परवानगी हे विद्यार्थी झाले उत्तीर्ण तिवसाळा (घाटंजी) येथील श्रवण अडकिने, मनीष मुनेश्वर, पलक शेलुकार, यशवंती राठोड, सोहम खंडाळकर, शिवम राठोड, वलिका चौहान, सायतखर्डा येथील नमन लेनगुरे, साक्षी पेटकुले, झटाळा येथील तन्वी ढवळे, जरंग येथील नेहा लेनगुरे, वालतूर (पुसद) येथील निखिल जाधव, वसंतपूर येथील दीपा चव्हाण, सुमित चव्हाण, बजरंगनगर येथील वैभव आडे, शारी (आर्णी) येथील नयना आडे, उमरी पठार येथील लकी पारधी, कोसारा (मारेगाव) येथील तनुष्का बाभळे, पिंपरी (राळेगाव) येथील संस्कार सांभारे, पिंपळापूर येथील वेदांत सातकर, विडूळ (उमरखेड) येथील राशी कुंटे, बोर येथील अक्षरा माने, ढाणकी येथील शेख मावान शेख इरफान, सोनम परवीन शेख मुश्तफा, कात्री (कळंब) येथील निशांत दुबे, वैष्णवी वाल्दे, ओंकार बनसोड, करळगाव (बाभूळगाव) येथील तेजस हिवरकर, गणोरी येथील अंजली मोकासे, वडगाव रोड (यवतमाळ) अश्विनी राऊत, शेजल भुरे, तायडेनगर येथील अलशिरा शेख फरीद, नायगाव (दारव्हा) येथील राशी जाधव, पाळोदी येथील वैष्णवी येवले, करजगाव येथील टीना राठोड, लाडखेड येथील अरसलान खान अजमत खान अशी या निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात