नवी दिल्ली 11 जुलै : देशभरातील सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme) मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. मात्र, विरोधानंतरही सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत भरतीसाठी अर्ज मागवणं सुरू आहे. या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या तरुणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. अग्निपथ योजनेंतर्गत, नौदलात (Navy) अग्निवीरांच्या भरतीत पहिल्या बॅचमधील 20 टक्के उमेदवार महिला असतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. तसेच नौदलाच्या विविध विभाग आणि शाखांमध्ये या महिलांची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती नौदलाच्या एका अधिकाऱ्याने दिली. अग्निपथ योजनेअंतर्गत नौदलात महिलांची भरती केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच 10,000 हून अधिक महिला उमेदवारांनी नौदलात (Indian Navy) अग्निवीर होण्यासाठी नोंदणी केली आहे. भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर SSR आणि अग्निवीर MR या पदांसाठी भरती केली जाईल. 12वी उत्तीर्ण तरुण एसएसआरसाठी अर्ज करू शकतात आणि 10वी उत्तीर्ण तरुण एमआरसाठी अर्ज करू शकतात. 23 वर्षे वय ही दोन्हीसाठी निश्चित करण्यात आलेली कमाल वयोमर्यादा आहे. ही वयोमर्यादा फक्त या वर्षापुरतीच आहे. पुढील वर्षापासून वयोमर्यादा 21 वर्षे म्हणजेच दोन वर्षांनी कमी करण्यात येणार आहे. या संदर्भात पुणेकर न्यूज डॉट इनने वृत्त दिलंय. कोरोनानंतर फार्मसी क्षेत्राला वाढलीये मागणी; तुम्हालाही करिअर करायचंय? इथे मिळेल शिक्षणाची संपूर्ण माहिती अग्निवीर SSR साठी आवश्यक पात्रता: शैक्षणिक पात्रता - गणित, भौतिकशास्त्र, केमेस्ट्री, जीवशास्त्र किंवा कम्प्युटर सायन्स (Computer Scientce) या विषयांसह 12वी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा – किमान 17 वर्षे 6 महिने ते कमाल 23 वर्षे. अग्निवीर MR साठी पात्रता: अग्निवीर MR च्या शेफ, स्टीवर्ड आणि हायजिनिस्ट (Chef, Steward and Hygienist) अशा तीन श्रेणी असतील. शैक्षणिक पात्रता – 10वी पास. वयोमर्यादा – किमान 17 वर्षे 6 महिने ते कमाल 23 वर्षे. अर्ज कसा करायचा: - joinindiannavy.gov.in वेबसाईटला भेट द्या. तुम्ही यापूर्वी नोंदणी केली नसेल तर आधी नोंदणी करा. नोंदणी करताना तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर एंटर करा. - नंतर नोंदणीकृत ईमेल आयडीने लॉग इन करा. “Current Opportunities” वर क्लिक करा. Apply बटणावर क्लिक करा. अर्ज भरा आणि सबमिट वर क्लिक करा. - अर्ज भरताना तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यामुळे कागदपत्रे आधी स्कॅन करून ठेवा. फोटो अपलोड करण्यापूर्वी, तो चांगल्या दर्जाचा आहे आणि त्याचे बॅकग्राउंड निळं आहे, याची खात्री करून घ्या. सर्वांत चांगली नोकरी आणि भरघोस सॅलरी आता फक्त तुमचीच; जॉब सर्च करताना Ignore करू नका या गोष्टी निवड प्रक्रिया - उमेदवारांना आधी लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. त्यातून पास झालेल्या उमेदवारांना पुढे PFT म्हणजेच फिजिकल फिटनेस टेस्टसाठी (Physical Fitness Test) बोलावले जाईल. पीएफटीत पास झालेल्या उमेदवारांची मेरिट लिस्ट लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. फिजिकल टेस्ट - पुरुषांना 6.30 मिनिटांत 1.6 किमी धावावे लागेल. तसेच 20 स्क्वॅट्स आणि 12 पुश-अप करावे लागतील. - महिलांना 8 मिनिटात 1.6 किमी धावावे लागेल. तसेच 15 स्क्वॉट्स आणि 10 सिट-अप करावे लागतील. पात्रतेसाठी उंची - पुरुष - 157 सेमी - महिला - 152 सेमी या अग्निवीर योजनेसाठी पात्रतेच्या अटी आहेत. जे तरुण-तरुणी अग्निवीर योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत, ते अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.