रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही नफ्यात 12.8 टक्क्यांची वाढ, 'जियो'चीही उत्तम कामगिरी

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तिमाही नफ्यात 12.8 टक्क्यांची वाढ, 'जियो'चीही उत्तम कामगिरी

रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योग समुहाला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 8, 097 कोटींचा नफा झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा नफा 12.8 टक्के अधिक आहे.

  • Share this:

मुंबई, 13 ऑक्टोबर : रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योग समुहाला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 8, 097 कोटींचा नफा झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा नफा 12.8 टक्के अधिक आहे. अर्थाच चालू वर्षीच्या पहिल्या तिमाहीत हाच नफ्याचा आकडा 9, 097 कोटी इतका होता. त्या तुलनेत चालू तिमाहीची नफ्याची ही टक्केवारी 10.8 टक्क्यांनी कमी असली तरी कंपनीची एकूण कामगिरी उत्तम असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

चालू तिमाहीच्या या परफॉर्मन्सबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी समाधान व्यक्त केलंय. ते म्हणाले, '' सलग दुसऱ्या तिमाहित कंपनीने उत्तम कामगिरी केली असून त्यात रिलायन्स जियोचंही मोठं योगदान आहे. 'जियो'नं पहिल्या तिमाहीमध्येच खूप चांगले रिझल्ट दिलेत. '

रिलायन्स जियो 4G कंपनीत उद्योग समुहाने ज्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली. त्या तुलनेत या बिझनेस मॉडेलनं खूप चांगले आर्थिक उत्पन्न दिलं असल्याचं मुकेश अंबानी यांनी म्हटलंय. टेलिकॉम क्षेत्रात गूंतवणूक करण्याचा उद्योग समुहाचा निर्णय योग ठरल्याचंही त्यांनी म्हटलंय.

रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योग समुहाला दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पादनात 16. 5टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीची आर्थिक उलाढाल 95, 085 कोटीपर्यंत पोहोचलीय. या उत्पादन वाढीत पेट्रोकेमिकल, रिफाईनिंग, रिटेल तसंच डिजीटल बिझनेसचा मोठा वाटा आहे.

First published: October 13, 2017, 8:20 PM IST

ताज्या बातम्या