नाशिक, 18 सप्टेंबर : महाराष्ट्रातल्या काही मोठ्या कांदा व्यापाऱ्यांचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत असल्याचं समोर आलंय. आयकर विभागानं टाकलेल्या धाडीमध्ये ही बाब समोर आली आहे. दुबईतल्या हवाला दलालांमार्फत ही रोकड लोनच्या माध्यमातून या व्यापाऱ्यांना मिळाल्याचं कळतंय. दर महिन्याला तीन टक्के व्याजानं ही रक्कम मिळाल्याचे पुरावे देखील मिळालेत.
महाराष्ट्रात ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, चांदवड अशा एकूण 24 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले होते. गुरुवारपासून शनिवारपर्यंत जे छापे टाकले होते, त्यामध्ये राज्यातल्या सात मोठ्या व्यापाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे थेट दुबईपर्यंत पोचल्याचं उघड झालंय. व्यापाऱ्यांच्या घरांमधून, ऑफिसमधून अनेक महत्त्वाची कागदपत्रं मिळाली त्यातूनच हे कांदा व्यापाऱ्यांचं नवं हवाला ट्रेडिंग रॅकेट उघड झालंय.
आयकर विभागाच्या माहितीनुसार, यात अनेक बोगस कंपन्यांची कागदपत्रं आहेत ज्या अस्तित्वातच नाहीत, आणि त्याचं कंपन्यांच्या नावानं आयात निर्यातीचे व्यवहार करण्यात आलेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा