मराठी बातम्या /बातम्या /बिझनेस /

'एफडी'पेक्षा तब्बल 4 पट फायदा, कशात गुंतवणूक कराल?

'एफडी'पेक्षा तब्बल 4 पट फायदा, कशात गुंतवणूक कराल?

भविष्यासाठी गुंतवणूक करताना एफडीपेक्षा अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत. त्यातील सोन्यामध्ये गुंतवणूक हा पर्यात उत्तम परतावा देऊ शकतो

भविष्यासाठी गुंतवणूक करताना एफडीपेक्षा अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत. त्यातील सोन्यामध्ये गुंतवणूक हा पर्यात उत्तम परतावा देऊ शकतो

भविष्यासाठी गुंतवणूक करताना एफडीपेक्षा अनेक पर्याय आता उपलब्ध आहेत. त्यातील सोन्यामध्ये गुंतवणूक हा पर्यात उत्तम परतावा देऊ शकतो

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 21 फेब्रवारी : प्रत्येकजण आपल्या भविष्याचा विचार करून काही ना काही रक्कम बाळगून ठेवत असतो. मुलांचा शिक्षणाचा खर्च असेल, लग्नकार्य असेल किंवा काही घरगुती महत्वाची कामं असतील यासाठी प्रत्येकजण ठराविक रकमेची बचत करत असतो. मग ही रक्कम घरात ठेवण्यापेक्षा बँकांमध्ये एफडी करण्यावर म्हणजेच मुदत ठेव ठेवण्यावर अनेकांचा भर असतो. म्हणजे पैसे सुरक्षितही राहतात आणि त्यावर आपल्याला व्याजही मिळतं. असा एफडीचा दुहेरी फायदा असतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत एफडीपेक्षाही अजुन असेल अनेक पर्याय उपलब्ध असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मात्र सोन्याच्या वाढत्या किमती आपल्याला कमाईची मोठी संधी देत आहे. कारण एफडीवरचा (Fixed Deposit) परतावा झपाट्याने कमी होत आहे. मागील एक वर्षांच्या काळात एफडीवरील व्याजदरात 1 टक्क्यापर्यंत कमी झाली आहे. तर सोन्याशी संबंधीत ईटीएफ (Gold ETF) योजनेमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे. अशात आपल्याजवळ गोल्ड ईटीएफमध्ये पैसे गुंतवून मोठ्या परताव्याची संधी आहे.

मुलांच्या भविष्यासाठी बचत सुरू करण्याआधी याचा विचार करा -

1. मुलांच्या वयानुसार कोणत्या वयात त्यांना किती पैशांची आवश्यकता आहे

2. किती कालावधीसाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे

3. यासाठी तुम्ही किती धोका पत्करू शकता

गोल्ड ईटीएफच्या संदर्भातील महत्वाची माहिती -

1. गोल्ड ETF चा अर्थ होतो की, गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold Exchange-traded fund). याची ट्रेडिंग सगळ्या मोठ्या स्टॉक एक्सचेंजेसमध्ये होते. स्टॉकमार्केटमध्ये एखाद्या शेअर्सची खरेदी करण्यासारखंच याची खरेदी करणंही आहे. आणि तिथेच त्याची विक्रीही करता येते. त्याची खरेदी आणि विक्री डॉ-मॅट अकाऊंटच्या माध्यमातून केली जाते. गोल्ड ईटीएफ फंडात मोठ्या प्रमाणावर फिजिकल सोन्याची खरेदी केली जाते. आणि त्याला स्टोअर केलं जातं. ते ईटीएफच्या जवळ असतं. आणि गुंतवणुकदारांना त्यांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात शेअर्स ऑफर केले जातात.

2. गुंतवणुकदाराकडून खरेदी केलेलं सोनं ईटीएफ शेअर डि-मॅट अकाऊंटमध्ये असतं. त्यामुळे सोन्यासारखी किमती वस्तू सुरक्षित ठेवण्यासंदर्भात काही चिंता राहत नाही. ज्वेलर्सकडून सोने खरेदीनंतर त्याच्या शुद्धतेवर नेहमीच शंका असते मात्र याच्या बाबतीत असं अजिबात होत नाही. त्यामुळे यामध्ये अगदी कमी प्रमाणातील गुंतवणुकीला सुरूवात करता येते.

3. एफडीवर मिळतं आहे 7.9 टक्के व्याज - एका वर्षाच्या कालावधीसाठी RBL बँकेत जर तुम्ही एफडी केलीत तर 7.9 टक्के व्याजानुसार आपली रक्कम 10 हजार रुपयांवरून वाढून 10 हजार 814 रुपये होऊ शकेल. अशाच पद्धतीने तुम्ही लक्ष्मी विलास बँकेमध्ये एफडी कराल तर तुम्हाला 7.15 टक्के व्याजानुसार तुमची रक्कम 10 हजार 798 रुपये होईल. तर देशतील इतर बँका सध्या 7 टक्केच व्याज देत आहेत.

4. Kotak World Gold Fund ने एका महिन्यामध्ये 32 टक्के परतावा दिला आहे. त्याच्यानंतर DSP World Gold Fund ने एका वर्षाच्या कालावधीत 38 टक्के परतावा दिला आहे. गोल्ड फंड्ससाठी एका वर्षाच्या कालावधीतील सरासरी परतावा 26 टक्के इतका आहे.

5. चीनमध्ये पसरलेल्या जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑगस्टमध्ये सोन्याच्या किमती जिथे 1500 डॉलर प्रती औंस होता. आता मात्र सोन्याची किंमत वाढून प्रति औंस 1600 रुपयांवर पोहोचली आहे. त्याबरोबरच स्थानिक बाजारपेठेतही सोन्यची किंमत प्रतितोळा 42 हजार रुपयांवर पोहोचली आहे. तर पुढच्या काळात ही किंमत 45 हजारांच्या घरात जाण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

6. केडिया कमोडिटीचे प्रमुख अजय केडिया यांनी न्यूज18 नेटवर्कला सांगितलं की, फक्त अधिक परताव्यासाठी सोन्यामध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करायला नको. तर धोक्याच्या विभागणी संदर्भातील एक पर्याय म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे. यामध्ये तुम्हाला सोन्याला थेट तुमच्याकडे ठेवण्याचीही काही कटकट नाही आहे. याचा फायदा हा आहे की तुम्ही सोने कधीही तुम्हाला हवं असेल तेव्हा बाजारभावानुसार विकू शकता.

7. ईटीएफच्या माध्यमातून सोनं युनिट्समद्ये खरेदी करता येतं. इथं एक युनिट एक ग्रॅमचं असतं. त्यामुले कमी प्रमाणात सोनं खरेदी करमं सोप होऊन जातं. तिथं स्थानिक बाजारामध्ये सोनं हे तोळ्याच्या दरामध्ये विकलं जातं. त्यामुळे ज्वेलर्सकडून खरेदी करताना सोनं युनिट्समध्ये खरेदी करता येत नाही.

8. गोल्ड ईटीएफच्या माध्यामातून खरेदी केलेल्या सोन्याच्या शुद्धतेबाबत 99.50 टक्के खात्री असते. जी सर्वात उच्चप्रतिची शुध्धता असते. आपण जे सोनं खरेदी करतो त्याची किंमत त्याच्या शुद्धतेवर आधारीत असते. गोल्ड ईटीएफवर खरेदीमध्ये 0.5 टक्के किंवा त्यापेक्षा कमी ब्रोकरेजचा भार पडतो. जी खूप कमी आहे. आमि पोर्टफोलिओ मॅनेज करण्यसाठी वर्षाला 1 टक्के चार्ज लागतो. ही रक्कम ज्वेलर्स किंवा बँकेतून सोनं खरदी करण्याच्या तुलनेत खूपच कमी आहे.

9. ईटीएफवर सोनं खरेदी किंवा विकण्यासाठी ट्रेडर्सला फक्त ब्रोकरेज द्यावं लागतं. तर थेट सोनं खरेदी करण्यासाठी जास्त रक्कम त्याच्या मेकिंग चार्जेसमध्ये खर्च होते. आणि ते फक्त ज्वेलर्सलाच विकता येतं. भलेही ते सोनं तुम्ही बँकेतूनही खरेदी केलं असलं तरीही. इलेक्ट्रॉनिक गोल्ड डीमैट एकाऊंटमध्ये फक्त आपल्याला वार्षिक डी-मॅट चार्ज द्यावा लागतो. त्यासोबतच चोरीची काही भिती नसते. तर दुसरीकडे थेट सोनं खरेदी केलं तर चोरीचा धोका असतो आणि त्याच्या सुरक्षेवरही पैसे खर्च करावे लागतात.

First published:

Tags: Gold