Home /News /business /

घरीच थांबा आणि व्हा भारतातील एंटरटेनर नं.1!

घरीच थांबा आणि व्हा भारतातील एंटरटेनर नं.1!

Flipkart व्हिडीओ आणि वरुण धवन आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक अभिनव स्टे अॅट होम रिअलिटी शो 

    सध्याचा काळ थोडासा कठीण आहे, आणि हा काळाचा टप्पा निभावणे आपल्या सर्वांसाठी गरजेचे आहे. आपल्या सर्वांना आपापल्या घरात थांबून सुरक्षित रहायचे आहे. अशा परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन कसा बदलू शकतो? आपण यातून कसा मार्ग काढू शकतो आणि मिळालेल्या संधीचे सोने कसे करू शकतो? लोकांच्या जीवनामध्ये मनोरंजनाचे काही क्षण पेरून लोकांमध्ये उत्साह, आनंद, सकारात्मकता निर्माण करण्यासाठी ही तुमच्याकरिता एक संधी आहे. नवोदित कलाकारांनो, अगदी घरबसल्या लाखो लोकांना रिझवण्यासाठी सज्ज व्हा. ‘Entertainer No. 1’ flipkart व्हिडीओजच्या “एंटरटेनर नं. 1 “ या एका नव्याकोऱ्या रिअॅलिटी शोमध्ये तुम्ही आत्ताच सहभागी झाले पाहिजे. वरुण धवनच्या सूत्रसंचालनाने बहरलेला हा कार्यक्रम म्हणजे देशाचे मनोरंजन करण्याचा, सकारात्मकता आणि आनंद पेरण्यासाठी तुम्हाला सक्षम करण्यासाठी एक पर्वणीच आहे. ही स्टे अॅट होम रिअॅलिटी शोची अनोखी संकल्पना खरोखरच अतिशय सुलभ आहे. तुम्हाला केवळ एवढेच करायचे आहे की, .         Flipkart हे अॅप्लिकेशन उघडा, .         तळातील ‘व्हिडीओ’च्या बटणाला स्पर्श करा .         एंटरटेनर नं. 1 या कार्यक्रमाची निवड करा व सहभागी व्हा .         तेथील लायब्ररीमधून तुमच्या आवडत्या गाण्याची किंवा संवादाची निवड करा .         तुमच्या एन्ट्रीज रेकॉर्ड करून जमा करा .         जास्तीत जास्त हार्ट्स मिळवण्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणी व कुटुंबियांना पाठवा एवढेच! तुम्ही तुमच्या बाल्कनीत असाल, दिवाणखान्यात असाल किंवा तुमच्या कोचवर पहुडले असाल; हा कार्यक्रम तुम्हाला घरबसल्या संपूर्ण देशाचे मनोरंजन करण्याची संधी देईल. हा कार्यक्रम 8 आठवड्यांपर्यंत चालेल, आणि एकदा तुम्ही सहभागी झालात की, तुम्हाला दर आठवड्याला एक नवीन आव्हान दिले जाईल, त्यातून लोकप्रिय झालेले स्पर्धक पुढील फेरीमध्ये प्रवेश करतील. यामध्ये स्पर्धकांना प्रत्येक आठवड्यात काही बक्षीसे जिंकावी लागतील; पुढे कार्यक्रमाच्या अखेरीस एक महाविजेता घोषित केला जाईल. वरुण धवन या कार्यक्रमाबाबत थोडक्यात सांगतात की, “या नवीन कार्यक्रमाद्वारे आम्ही सध्या अत्यावश्यक असलेली सकारात्मकता निर्माण करून लाखो भारतीय बांधवांचे मनोरंजन करणार आहोत.” ते पुढे म्हणतात, “आपला देश म्हणजे प्रतिभावान लोकांची खाण आहे आणि माल खरोखर असे वाटते की कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आपले कला कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली पाहिजे. हे करण्यासाठी Flipkart या अॅप्लिकेशनवर अपलोड करण्याव्यतिरिक्त आणखी कोणता अधिक चांगला मार्ग असू शकतो?” या संकटाच्या वेळी आवश्यक असलेली प्रेरणा या कार्यक्रमातून मिळते. 13 वर्षांवरील कोणीही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकते. अंगी कौशल्य आहे? तर मग Flipkart हे अॅप्लिकेशन उघडा आणि आपल्या कौशल्याने सर्वांचे मनोरंजन करा. जेव्हा अशा डीजीटल शोजच्या भारतातील भवितव्याबाबत प्रश्न विचारले जातात, तेव्हा प्रसिद्ध नर्तक, अभिनेते, सूत्रसंचालक आणि या कार्यक्रमाचे सल्लागार राघव जुयाल म्हणतात, “भारताच्या कानाकोपऱ्यातून सर्वोत्तम प्रतिभावंतांचा शोध घेण्यासाठी Flipkart व्हिडीओ खूप चांगले कार्य करत आहे. भारतभरातील लोकांना त्यांची प्रतिभा सादर करण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ मिळेल, ज्याचा आपण विकास करू शकतो.” प्रख्यात विनोदवीर व सूत्रसंचालक तसेच या कार्यक्रमाच्या आणखी एक सल्लागार असलेल्या भारती सिंग यांनीही या कार्यक्रमाच्या बाबतीत आपली उत्साहपूर्ण प्रतिक्रिया देताना सांगितले की, “एंटरटेनर नं. 1 हा खरोखरच एक अनोखा आणि अभिनव कार्यक्रम आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे असा प्रत्येकजण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. ही प्रत्येकासाठी घरबसल्या आपली कल्पक प्रतिभा संपूर्ण भारतासमोर सादर करून आकर्षक बक्षिसे मिळवण्याची एक नामी संधी आहे.” या कार्यक्रमाच्या रचनेची सुलभता तसेच तुमच्या प्रतिभेच्या सहाय्याने घरबसल्या देशाचे मनोरंजन करण्याची संकल्पना आत्ताच्या परिस्थितीत कौतुकाचा विषय झाली आहे. या कार्यक्रमावर आधीच आलेल्या सहभागाच्या एन्ट्रीजसोबत देशभरातून उदंड प्रेमाचा वर्षाव होत आहे यात काहीच आश्चर्य नाही. आता प्रश्न फक्त एकच प्रश्न.... तुम्ही प्रतिभावान आहात का? तर वेळ आली आहे एंटरटेनर नं.1 बनण्याची! एंटरटेनर नं.1 बनण्यासाठी तुमचा प्रवास येथून सुरु करा.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या