Home /News /business /

Flipkart Video च्या एंटरटेनर नं. 1 ला मिळतो आहे उदंड प्रतिसाद, पहिल्या दोन आठवड्यातील विजेत्यांना भेटा आणि तयार व्हा अधिक मनोरंजनासाठी!

Flipkart Video च्या एंटरटेनर नं. 1 ला मिळतो आहे उदंड प्रतिसाद, पहिल्या दोन आठवड्यातील विजेत्यांना भेटा आणि तयार व्हा अधिक मनोरंजनासाठी!

हा या कार्यक्रमाचा तिसरा आठवडा चालू आहे आणि यामध्ये अत्यंत प्रतिभावंत लोकांनी भाग घेतला आहे.

    सर्वजण आपापल्या घरी अडकून पडलेले असताना Flipkart Video च्या एंटरटेनर नं. १ या ‘स्टे अॅट होम’ रिअॅलिटी शोची या नवीन आणि अभिनव कार्यक्रमाने देशभरात निखळ मनोरंजन घडवून चैतन्याची एक लाट आणण्याचे सर्वोत्तम कार्य केले आहे. देशभरातून मोठ्या प्रमाणात आलेल्या एन्ट्रीज आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक चांगला मंच मिळाल्याबद्दलचा भारतीयांचा उत्साह आणि उत्कटता दाखवतात.  हा या कार्यक्रमाचा तिसरा आठवडा चालू आहे आणि यामध्ये अत्यंत प्रतिभावंत लोकांनी भाग घेतला आहे. पहिल्या आठवड्यामध्ये, ‘फिल्मी तडका’ या चॅलेंजसाठी वरुण धवन यांनी देशभरातील स्पर्धकांनी एखाद्या बॉलीवूड ट्विस्टसह सादर केलेल्या नृत्य व अभिनयाच्या सर्वोत्तम व्हिडीओजपैकी काहींचे परीक्षण केले. ‘अतरंगी लॉकडाऊन’ या थीममुळे दुसऱ्या आठवड्यात स्पर्धकांच्या कल्पकतेला थोडी अधिक चालना मिळाली. या स्पर्धेतील सादरीकरणांना भारतातील लोकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, काहींनी तर स्पष्ट दादही दिली. एंटरटेनर नं. १ च्या पहिल्या दोन आठवड्यातील काही विजेते पुढीलप्रमाणे:  निष्ठा केसरवानी [1] :  उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथे राहणारी निष्ठा ही तरुणी रात्री तिचे कुटुंब झोपी गेल्यावर सराव करते; अशी तिची समर्पणवृत्ती आहे. तिने अनेक रिअॅलिटी शोजमध्ये भाग घेतला आहे आणि त्यांपैकी बऱ्याच कार्यक्रमांत तिने अंतिम फेरी गाठली आहे. आणि तिचे Flipkart Video एंटरटेनर नं. १ मधील सादरीकरण....लाजवाब! संताना रोच   नृत्य हा तिचा आवडीचा विषय. संताना सध्या Dance Work मध्ये व्यावसायिक प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे, तसेच तिने जवाहरलाल स्टेडियम येथे आयोजित Zomaland सह बऱ्याच कार्यक्रमांमध्ये व्यावसायिक सादरीकरण केले आहे.   पुनीत:   बालपणापासून नृत्य करणारा पुनीत नाटकांमध्ये अभिनयही करतो. त्याचे स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे, तसेच तो एक अभिनय प्रशिक्षकही आहे. तो जिंकण्यासाठी प्रेरित आहे आणि आगामी चॅलेंजेसमध्येही सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे.   दुसरा आठवडाही काही कमी नव्हता. या आठवड्यातील सादरीकरणांच्या विविध व्हिडीओजनी खूप मनोरंजन केले. दुसऱ्या आठवड्यातील काही सर्वोत्तम सादरीकरणे पुढीलप्रमाणे:   विशाल उर्फ कॅप किंग पंजाबचा रहिवासी असलेला २० वर्षीय विशाल हा स्वयंसिद्ध कलाकार आहे. ‘कॅप’ परफॉर्मन्स हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तो प्रयोगशीलतेवर भरवसा ठेवतो त्यामुळे त्याच्या नृत्य सादरीकारणाला जादुई किनार लाभली आहे. नृत्य विश्वात १५ कॅप्सचे सादरीकरण करून भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे त्याचे स्वप्न आहे. चिराग कालरा( व्हील डान्सर)   अतिशय लहान वयात नृत्य क्षेत्रात पाउल टाकणाऱ्या चिरागला नृत्य परंपरा लाभली आहे. व्हील्सच्या सहाय्याने नृत्य करण्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. त्याच्या या कौशल्यामुळे तो अनेक लघुपट व टीव्हीसीजमध्ये झळकला आहे. तो म्हणतो की, लॉकडाऊनमुळे त्याच्या कल्पकतेला चालना मिळाली आहे. आणि, एंटरटेनर नं. १ मध्ये सहभागी होता आल्याने त्याला अतिशय आनंद झाला आहे.     पहिल्या दोन आठवड्यांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे, आणि साप्ताहिक विजेत्यांनी प्रत्येकी १ लाख रुपये जिंकले आहेत. पण, ‘घर को बनाओ स्टेज’ या तिसऱ्या आठवड्याच्या थीमसह एंटरटेनर नं. १ अजूनही चालू आहे. तुम्ही तुमच्या घरातील वस्तूंचा साधन म्हणून वापर करून, त्यांचा तुमच्या सादरीकरणात समावेश करून अधिक मनोरंजन करू शकता.   तुम्हाला गरज आहे ती केवळ सहभागी होण्याची! १ कोटी रुपयांचे भव्य बक्षीस जिंकण्याची संधी अजून गेलेली नाही.   Flipkart Videoचा एंटरटेनर नं. १ हा ‘स्टे अॅट होम’ रिअॅलिटी शो तासन् तास मनोरंजन तर करत आहेच त्याचबरोबर लोकांची प्रतिभा सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांना एक मंच उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी कार्यरत आहे. म्हणून तुम्ही मनोरंजनासाठी एखाद्या पर्यायाच्या शोधात असाल तर, Flipkart Videoचा एंटरटेनर नं. १ हा कार्यक्रम पहाच! Flipkart अॅप्लिकेशनचा वापर करणारे लोक खालील बारवरील व्हिडीओ सेक्शनमध्ये प्रवेश मिळवून सर्व सादरीकरणे ताबडतोब त्यांच्या अॅप्लिकेशनद्वारे पाहू शकतात, किंवा येथे टिचकी द्या.    (पार्टनर्ड पोस्ट)
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या