मराठी बातम्या /बातम्या /ब्लॉग स्पेस /

मालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही!

मालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही!

पावसाळ्यात छत्रीवाली ही मालिका आली.. मग हिवाळ्यात स्वेटरवाली, कानटोपीवाला, गोधडी, तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी रजई - उब नात्यातली किंवा उन्हाळ्यात सुती शर्ट माझा पाठिराखा, कैरीपन्ह, गारवा निसर्गातला... अशा मालिका आल्या तर मग आश्चर्य वाटायला नको.

पावसाळ्यात छत्रीवाली ही मालिका आली.. मग हिवाळ्यात स्वेटरवाली, कानटोपीवाला, गोधडी, तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी रजई - उब नात्यातली किंवा उन्हाळ्यात सुती शर्ट माझा पाठिराखा, कैरीपन्ह, गारवा निसर्गातला... अशा मालिका आल्या तर मग आश्चर्य वाटायला नको.

पावसाळ्यात छत्रीवाली ही मालिका आली.. मग हिवाळ्यात स्वेटरवाली, कानटोपीवाला, गोधडी, तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी रजई - उब नात्यातली किंवा उन्हाळ्यात सुती शर्ट माझा पाठिराखा, कैरीपन्ह, गारवा निसर्गातला... अशा मालिका आल्या तर मग आश्चर्य वाटायला नको.

पुढे वाचा ...

संदीप देसाई, प्रतिनिधी

छत्रीवाली. काही दिवसांपासून या मालिकेची जाहिरात आपण सगळ्याच चॅनेल्सवर पाहतोय. स्टार प्रवाहवर लवकरच ही नवी मालिका सुरू होतेय. थोडसं वेगळं नाव आहे.. आणि मराठी मालिकांची धाटणीही बदलतेय असं काहीसं या मालिकेच्या नावाकडे पाहिल्यावर वाटतंय. कथा काय असेल माहीत नाही पण निदान नावात तरी वेगळेपण आहे. नाहीतर मालिका म्हटल्या की सासू-सुनेची भांडणं, घराघरातील कुरघोडी आणि त्याला दिलेली प्रेमकथांची फोडणी असाच काहीसा तामझाम असतो.

मालिका हिंदी असो किंवा मराठी! मग मराठीमध्ये प्रचंड गाजलेली मालिका घ्या, चार दिवस सासूचे किंवा हिंदीमधील क्योंकी साँस भी कभी बहू थी. अशी अनेक नावं आपल्याला मराठी आणि हिंदीमध्ये पाहायला मिळू शकतात आणि दुसरा पॅटर्न म्हणजे प्रेमकथांची नावं. म्हणजे सध्याचीच नावं घेतली तर तुझ्यात जीव रंगला, लागिरं झालं जी, तुझं माझं ब्रेकअप अशी नावं सांगता येतील आणि यातूनच राहिलं तर एखाद्या मुख्य पात्राचं नावं, म्हणजे देवयानी, रुंजी, नकोशी किंवा सरस्वती अशा मराठीत येऊन गेलेल्या काही मालिका.

आता या सगळ्यांमध्ये अचानक छत्रीवाली असं मालिकेचं नाव पाहिलं आणि थोडसं आश्चर्य वाटलं. आश्चर्य यासाठी कारण या नावाकडे पाहिलं की लगेच आपल्या लक्षात येतं की मालिका पावसातलीच असणार. म्हणजे आता मालिका हंगामी व्हायला लागल्यात की काय असा प्रश्न पडावा. आता या मालिकेच्या निर्मात्यांनी या मालिकेचं नाव छत्रीवाली का ठेवलं असेल ? मग ही मालिका फक्त पावसाळ्यापुरतीच चालणार का? पाऊस संपल्यानंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ही छत्रीवाली मालिका प्रेक्षकांना पावसाळ्या इतपत पसंतीला उतरणार का? हा पावसाळा संपल्यानंतरचा मुद्दा आहे.

आता पहिल्या मालिका वर्षानुवर्ष चालत होत्या. त्यातले अनेक कलाकार बदलायचे मात्र मालिकांच्या एपिसोडचं एरंडाचं गुऱ्हाळ मात्र सुरूच राहायचं. प्रेक्षकही या सगळ्याला कंटाळतात. हे निर्मात्यांनाही आता कळलं असणार. त्यामुळेच आता निर्मात्यांचा कल हंगामी मालिकांकडे वळलाय. म्हणजे तेवढेच चार महिने मालिका सुरू ठेवायची आणि पुढे समाप्त. म्हणजे जर छत्रीवाली मालिका जूनमध्ये सुरू झाली आणि पावसाळा संपला म्हणजे साधारण गणपती झाले की काही दिवसांतच या मालिकेचंही विसर्जन. किंवा जास्तीतजास्त दसऱ्याच्या पावसापर्यंत सुरू ठेऊन एकीकडे घटस्थापना आणि दुसरीकडे या हंगामी मालिकेचा हरीओम.  कदाचित असाच काहीसा बेत या छत्रीवालीच्या निर्मात्यांचा असेल का

पावसाळ्यात छत्रीवाली ही मालिका आली.. मग हिवाळ्यात स्वेटरवाली, कानटोपीवाला, गोधडी, तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी रजई - उब नात्यातली किंवा उन्हाळ्यात सुती शर्ट माझा पाठिराखा, कैरीपन्ह, गारवा निसर्गातला... अशा मालिका आल्या तर मग आश्चर्य वाटायला नको. म्हणजे पावसाळ्याची मालिका पावसाळा संपेपर्यंत हिवाळ्याची हिवाळा आणि उन्हाळ्याची उन्हाळा संपेपर्यंत. असं हंगामी मालिकांचं सत्र सुरू होऊ शकतं आणि मग आयपीएलसारखे याचे हंगामही सुरू होऊ शकतात.  म्हणजे जसे सिनेमांचे सिक्वल असतात तसंच. रेस वन, रेस टू आणि आता आलेला रेस थ्री. म्हणजे 2018च्या पावसाळ्यात छत्रीवाली तर 2019 च्या पावसाळ्यात छत्रीवाली सिझन 2, किंवा छत्रीवाली टू. कारण बदल प्रेक्षकांना हवेच आहेत.. आणि वेगळं काही तरी देण्याच्या प्रयत्नात निर्माते, दिग्दर्शकही असं काही तरी भन्नाट करू शकतात.

त्यामुळे बघू ही छत्रीवाली आणि तिची छत्री टीआरपीच्या पावसात किती तग धरते ? मालिकेचं नाव वेगळं वाटलं म्हणजे आतापर्यंतच्या मालिकांच्या नावांपेक्षा.  त्यामुळे हे सर्व लिहिण्याचा खटाटोप. चला तुर्तास छत्रीवाली आणि भर पावसात तिच्या छत्रीच्या आडोशाला येणाऱ्या एका देखण्या अभिनेत्याला (अभिनेत्रीच्या हातात छत्री म्हणजे अभिनेता आसरा घेणारच हा आतापर्यंतचा प्रघात) नव्या मालिकेसाठी शुभेच्छा देऊया.

First published:

Tags: Chatriwali, Fans, Marathi serials, TRP, छत्रीवाली, टीआरपी, मराठी मालिका