BLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का?

गडचिरोली सारख्या दुर्गम जि्ल्ह्याला सर्वाधिक भेट देण्याचा विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 19, 2019 10:13 PM IST

BLOG : मुख्यमंत्र्यांचं गडचिरोली प्रेम विकासाला चालना देणार का?

महेश तिवारी,प्रतिनिधी

गडचिरोली माओवाद्यांच्या कारवाया असलेला अतिसंवेदनशील जिल्हा आहे अशा जिल्हयात मुख्यमंत्र्यांचे दर्शन हे दुर्मिळ चित्र असतांना राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी अशा जिल्हयात चार वर्षात सात दौरे केले असुन माओवादग्रस्त जिल्हयात सर्वाधीक दौरे करणारे मुख्यमंञी ठरले आहेत.

गडचिरोली जिल्हा राज्यात सर्वाधीक तर देशातल्या पंचवीस अतिमागास जिल्हयात समावेश असलेला जिल्हा आहे. माओवाद्याच्या हिंसक कारवायात होरपळणाऱ्या जिल्हयात मुख्यमंत्र्यांचे दर्शन सहसा होतच नाही असे चित्र या जिल्हयातल्या जनतेने बघीतले आहे. या जिल्हयाला लागुन छत्तीसगड आणि तेलंगणाची सीमा आहे त्या राज्याच्या सीमेत त्या राज्यांचे मुख्यमंत्री वारंवार येतात पण गडचिरोली जिल्हा निर्मितीनंतरचे चित्र जर बघीतले तर या जिल्ह्यात मुख्यमंञ्याचे दौरे झाले मात्र ते मोजकेच.


पाच वर्षात मोजुन दोन ते तीन दौरे त्याच्या कार्यकाळात व्हायचे माजी उपमुख्यमंञी आर आर पाटील यानी जिल्हयाचे पालकमंञीपद स्वीकारल्यानंतर  पाच वर्षात  तब्बल  साठ दौरे  केले होते. ज्यातुन गडचिरोली जिल्हयाचा अतिदुर्गम भागही आबांनी पिंजुन काढला होता. विलासराव देशमुख हे असे मुख्यमंत्री होते ज्यानी भामरागडसारख्या अतिदुर्गम आणि अतिसंवेदनशीलभागात 2006 च्या पुराच्या वेळी तत्कालीन उपमुख्यमंञी आर आर पाटील यांच्या समवेत भेट दिली.

Loading...

तर शरद पवार यांनी 1988 मध्ये मुंबईपासुन 1700 किमी अंतरावर असलेल्या सिरोंचाला भेट दिली त्यापुर्वी या तालुक्याला तत्कालीन मुख्यमंञी वसंतराव नाईक यानी भेट दिली होती. या दोन मुख्यमंत्र्यानंतर सिरोंचा तालुक्याच्या जनतेने मुख्यमंत्री बघीतलाच नव्हता मात्र नदीच्या पलीकडे तेलंगणाच्या हद्दीत वर्षातुन चार ते पाचवेळा आंध्रप्रदेश अस्तित्वात असताना नंतर तेलंगणा अस्तित्वात आल्यानंतर तिथल्या मुख्यमंत्र्यांचे दर्शन जनतेला व्हायचे.

नदीच्या पलीकडे असलेले हे चित्र पाहुन सिरोंचाची जनता विचार करायची आपले मुख्यमंत्री कधी दिसतील. अखेर सिरोंचा तालुक्याच्या जनतेला तब्बल 28 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस रुपाने मुख्यमंत्र्यांचे दर्शन झाले. सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुलाच्या उदघाटनाच्या निमीत्ताने केंद्रीय मंञी नितीन गडकरीसोबत मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यानी भेट दिली जिल्हयाचा विचार केला तर चार वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हयात सर्वात जास्त दौरे केले आहेत.


राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यानी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात गडचिरोली जिल्हयाच्या कुरखेडा येथुन केली होती कुरखेडा तालुक्यानंतर वर्षभरातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एटापल्ली तालुक्यातल्या सर्वाधीक अतिसंवादनशील अशा बुर्गी इथ गेले या भागातल्या जनतेने पहील्यादा मुख्यमंञी बघीतला नंतर सिरोंचा तालुक्यासह मुख्यमंत्र्यांनी चामोर्शी तालुक्यात कोनसरी इथे लायड मेटल्सच्या प्रकल्पाच्या भुमीपूजनासह अहेरी तालुक्यात आलापल्लीत आढावा बैठकही घेतली होती.

नंतर नगरपरिषद निवडणुकीच्या काळातही मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्हयाचा दौरा केला होता. सोमवारी 18 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करताना विविध विकास कामांच्या ई लोकार्पणासह अहेरी येथील महीला रुग्णालयाचे ई भुमीपुजनही केले.  मुख्यमंत्र्यांसमवेत केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरीही होते.


उल्लेखनीय म्हणजे नितीन गडकरी मुख्यमंञ्यासमवेत चार दोऱ्यात सोबत आले आहेत स्वतःच्या गडचिरोलीतल्या आतापर्यंतच्या दौऱ्यांचा उल्लेख करताना मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्हयातल्या प्रलंबीत विकास कामांचा पाठपुरावा करुन विकासाची गती वाढवल्याचा दावाही केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 10:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...