मला भेटलेले भय्यू महाराज...!!

..पण या निमित्तानं काही प्रश्नही अनुत्तरीत राहिलेत. की जगण्यातला मानसिक ताण तणाव हा महाराजांनाही चुकला नाही.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2018 11:01 PM IST

मला भेटलेले भय्यू महाराज...!!

रणधीर कांबळे, प्रतिनिधी

भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला. खरं तर एवढा देशभरातल्या राजकारण्यांसोबत वावर होता. आयुष्य कसं जगायला हवं, अशी व्याख्यानं देणारा माणूस असा जावा हे काही मनाला रूचत नव्हतं.

भय्यूजी महाराज यांच्या संपर्कात आलेला माणूस त्यांच्याबद्दल नेहमीच सकारात्मक बोलायचा. मुंबईतले अनेक पत्रकार म्हणायचे आमचा महाराज हे बिरूद घेऊन वावरणाऱ्या माणसाला आमचा नेहमीच विरोध आहे.

पण भय्यूजी महाराज यांच्याबाबत मात्र नेमकं उलटं आहे. त्यांना भेटल्यावर त्यांच्याबाबतचा विरोध मनात राहिला नाही. माझा एक पत्रकार मित्र तर त्यांना थेट म्हणाला होता, राष्ट्रसंत ही उपाधी तुम्ही लावता ते काही पटत नाही. कारण ही उपाधी तुकडोजी महाराजांना लावली जाते. त्यावर हसून भक्त गण काहीही उपाधी लावतात असं हसत उत्तर दिलं होतं.

मी झी न्यूजमध्ये असताना माझे मित्र माथाडी नेते बाबूराव रामिष्टे यांचा सकाळी फोन आला आणि त्यांनी सांगितलं. "आज दुपारी घरी या, भय्यू महाराज येणार आहेत." मी म्हटलं अहो महाराज येणार आहेत तर मी येऊन काय करू. पण त्यांनी आग्रह करून बोलावलं. म्हणाले,आमचे मित्र म्हणून या...दुपारी रामिष्टे यांच्या वडाळ्यातील घरी पोहोचलो तर घरात पाय ठेवायला जागा नव्हती. अनेक संघटनांचे नेते ,कार्यकर्ते, अधिकारी, सरकारी कर्मचारी यांनी गर्दी केली होती.

Loading...

रामिष्टे यांनी मला हाताला धरूनच महाराजांकडे नेले. माझी ओळख करून दिली. त्यावेळी मी महाराजांशी हात मिळवला. त्यावर त्यांनी थेट म्हटलं. दादा तुम्ही माझ्या सोबत रहा... काही क्षण विचार केला इथं तर सगळेच त्यांच्या पाया पडताना दिसत होते आणि हे तर मला माझ्यासोबत रहा म्हणताहेत. नंतर मग त्यांच्या सोबतच जेवायला बसायचा आग्रह धरला. त्या दिवसापासून आमच्यात कायमचं संवाद राहिला. कधी फोनवरून तर कधी कार्यक्रमाच्या निमित्तानं भेट झाल्यावर... पण त्यांनी कधी माझ्या सामाजिक किंवा धार्मिक कार्याची बातमी करा असा आग्रह मात्र धरला नाही.

आज हे सगळं आठवलं कारण त्यांनी अचानक एक्झिट घेतली.. एक हसरं,लाघवी व्यक्तिमत्व निघून गेलं...त्यांच्या निमित्तानं अनेक खऱ्या खोट्या कहान्या ही इतिहासाच्या पानात बंद झाल्यात...पण या निमित्तानं काही प्रश्नही अनुत्तरीत राहिलेत. की जगण्यातला मानसिक ताण तणाव हा महाराजांनाही चुकला नाही.

जे या विषयावर मार्गदर्शन करत होते त्यांनाही यावर मात करता आली नाही. खरं तर महानगरी आयुष्यात जगत असताना सामान्य माणूस आपल्या ताणतणावातून मार्ग दाखवण्याची शक्यता महाराज,आध्यात्मिक गुरूंच्या कडे जाऊन शोधतात. त्यांना यातून एकच संदेश जातोय की, ,शेवटी तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्हालाच स्वत:शी झगडावं लागणार आहे. त्यातूनच खरा रस्ता आणि प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 11:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...