S M L

#AmritsarTrainTragedy नियमांच्या अवमानाचे बळी

पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी जी रेल्वे दुर्घटना झाली, त्याला कोण जबाबदार याविषयी आता ब्लेम गेम सुरू झालाय. पण ६३ लोकांचा बळी घेणारा हा अपघाच नियमांच्या अवमानानंच झाला, हे खरं!

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2018 07:54 PM IST

#AmritsarTrainTragedy  नियमांच्या अवमानाचे बळी

अमेय चुंभळे

शुक्रवारी 19 ऑक्टोबरला रात्री अमृतसरमध्ये जे झालं, ते व्यवस्थेपेक्षाही नियमांच्या सर्रास उल्लंघनाचे बळी होते.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वानी लोहानींशी सहमती व्यक्त करावीच लागेल. ते म्हणाले, ‘मी रेल्वे चौकशीचे आदेश देत नाहीये. यामध्ये रेल्वेची काहीही चूक नाही.’  मुळात, बहुतांश भारतीय लोकांना कायदे आणि नियम पाळण्याची ना सवय, ना ओढ ना इच्छा. नियम केले की ते मोडण्यात आपण धन्यता मानतो.मला सांगा, समोरच्या मैदानावर रावणदहन असो किंवा खुद्द अमिताभ बच्चन तेथे येवो, रुळावर उभं राहून बघण्याची गरजच काय ? रेल्वेचे रुळ म्हणजे सार्वजनिक मैदान किंवा सिनेमा आहे काय ? त्या रुळांवरून शेकडो टन वजनाच्या गाड्या जातात, हे आपण कधी लक्षात घेणार आहोत ? मुंबईत सर्रास रुळ ओलांडणं असो, सिग्नल तोडून पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालून गाडी चालवणं असो किंवा पोहता येत नसूनही समुद्रात जाणं असो.

तर्क आणि नियम यांना धाब्यावर बसवणं हा साधारण भारतीय स्वभाव. आणि हा स्वभाव कायम राहिला तर हे अपघात होतच राहणार. नियम आणि व्यवस्था, याचं भारतीय समाजाला आधीपासून वावडं. हेल्मेट घालणार नाही, पूल चढणार नाही, विसर्जनाच्या वेळी काळजी घेणार नाही, सीटबेल्ट लावणार नाही, लेनची शिस्त पाळणार नाही... शेकडो उदाहरणं आहेत. सर्वांना सगळं कळतं, पण समाज म्हणून वळत मात्र नाही.

व्यवस्थाहीन समाज असल्यामुळे वर्षाला लाखो जीव जातात, याकडे आपलं लक्षही जात नाही. आपल्याला फरक पडत नाही. कारण अपघात असो वा मृत्यू, तो दुसऱ्याचाच होतो यावर आपली दृढ श्रद्धा आहे. प्रशासनाचं बोलयाचं झालं, तर परवानगी नसतानाही हा कार्यक्रम सुरू होता,असं काही बातम्या सांगतात. आता याची सविस्तर चौकशी होईलही. पण मुळात परवानदी असेल तरीही अशा पद्धतीनं रेल्वे रुळांशेजारच्या जागेच एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणं उचित आहे का याकडे हा अपघात झाला नसता, तर कुणाचं लक्षही गेलं नसतं.

Loading...
Loading...

हा रेल्वेचा अपघात झाला. पण ४० ते ५० फूट उंचीचे रावणाचे पुतळे उभारण्याची गरजच काय ? याला परवानगी देतं कोण ? त्या पुतळ्यावर वरपर्यंत फटाके चिकटवलेले असतात. ते दूरवर उडून माणसं जखमी झाल्याच्या घटनाही याआधी घडल्या आहेत. पण असं काही बोललं की लगेच युक्तिवाद करण्यात येतो – धार्मिक बाबतीत बोलू नका, ‘आमच्या’च सणांना नियम का, ‘त्यांना’ कोणती बंधनं का नाहीत वगैरे.

मुद्दा धर्म बघून बंधनं घालण्याचा नाहीच. मी सुरक्षेपेक्षा अधिक महत्वाचा आहे, असं ना कोणता देव म्हणत ना धर्म. धर्माच्या बडव्यांचं मात्र सांगता येत नाही. अमृतसरची पुनरावृत्ती होऊ नये, असं वाटत असेल तर समाज आणि व्यावस्था आतून बदलावा लागेल. त्रास होईल, गैरसोय सहन करावी लागेल. पण सर्वांना सुरक्षित ठेवायचं असेल तर ते आज ना उद्या करावंच लागणार आहे. तोपर्यंत, पुढील ‘अमृतसर’ची प्रतीक्षा करायची. बस्स.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2018 07:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close