नवी दिल्ली, 2 मे : कार चालवताना स्टिअरिंगचा वापर खूप महत्वाचा असतो. कारण गाडीवर नियंत्रण स्टिअरिंगच्या माध्यमातून ठेवलं जातं. ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हर त्या स्टिअरिंगचा वापर करून सुरक्षितरित्या गाडी चालवतो. भारतात गाड्यांमधील स्टिअरिंग उजव्या बाजूला असतं. तर, अमेरिका, युरोपियन देशांसह अनेक देशांमध्ये वाहनांचं स्टिअरिंग डाव्या बाजूला असतं. या संदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय. इतकंच नव्हे तर भारतात स्टिअरिंग उजव्या बाजूला असल्याने गाड्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवल्या जातात. तर, अमेरिका व युरोपियन देशांमध्ये स्टिअरिंग डाव्या बाजूला असतं व वाहनं रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवली जातात. या मागचं नेमकं कारण काय, ते जाणून घेऊयात. खरं तर याचं उत्तर इतिहास, संस्कृती आणि काही प्रमाणात विज्ञानात दडलं आहे. सुरुवातीला या रस्त्याच्या या बाजूला धावायची वाहनं ‘द सन’ वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 19व्या शतकात जेव्हा कार धावू लागल्या, तेव्हापर्यंत सर्व देशांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने म्हणजेच वाहनांच्या स्टिअरिंग व्हीलच्या बाजूने वाहनं चालवण्यास प्राधान्य दिलं होतं. गाड्या आल्यानंतर त्यांनी त्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवायला सुरुवात केली म्हणजेच त्याचे स्टिअरिंग उजव्या बाजूला होतं. मात्र, पेट्रोलवर धावणाऱ्या वेगवान गाड्या बाजारात आल्यावर अनेक देशांनी स्टिअरिंग डाव्या बाजूला वळवून वाहनं रस्त्याच्या उजव्या बाजूला चालवण्यास सुरुवात केली. Back Pain : पाठदुखीची समस्या कायमची होऊ शकते दूर! फक्त करा हे 5 प्रभावी उपाय इंग्रजांनी केली होती सुरुवात हा ट्रेंड विशेषतः ब्रिटिश साम्राज्याचा भाग असलेल्या आणि त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालेल्या देशांमध्ये सुरू झाला. जरी ब्रिटिशांनी स्वतःच रस्त्याच्या डाव्या बाजूला गाडी चालवण्यास सुरुवात केली. रस्त्याच्या उजव्या बाजूने वाहन चालवणं अधिक सुरक्षित आहे ही कल्पना बरेच लोक उजव्या हाताने चालतात या गृहितकावर आधारित आहे. अशा परिस्थितीत रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडीवर नियंत्रण ठेवणं त्यांना सोपं जातं. असाही एक विश्वास आहे की उजवीकडे वाहन चालवल्याने चालकांना समोरून येणाऱ्या गाड्या अधिक चांगल्या प्रकारे दिसतात, त्यामुळे समोरासमोर वाहनं धडकण्याचा धोका कमी होतो. भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात गाड्या इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालेले सर्व देश रस्त्याच्या उजव्या बाजूनेच गाड्या चालवतात असं नाही. आयर्लंड, माल्टा आणि भारतदेखील एकेकाळी ब्रिटिश साम्राज्याचा भाग होते. असं असूनही, या देशांमध्ये ड्रायव्हिंग रस्त्याच्या डाव्या बाजूने केले जाते, म्हणजेच या देशांमध्ये स्टिअरिंग व्हील उजव्या बाजूला आहे. याचे कारण ड्रायव्हिंगच्या जुन्या सवयी, स्विचिंगचा खर्च, गैरसोय आणि ड्रायव्हर्सना पुन्हा प्रशिक्षण देण्यात अडचण, या गोष्टी आहेत. सुरक्षिततेची पातळी ठरवणारे घटक रस्त्याच्या कोणत्या बाजूला गाडी चालवणं अधिक सुरक्षित आहे ? या संदर्भात आतापर्यंत कोणताही स्पष्ट अभ्यास झालेला नाही आणि विरोधाभास कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, रस्ते सुरक्षेवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, ज्यात रस्ते पायाभूत सुविधा, रहदारीचे कायदे आणि ड्रायव्हरची वागणूक आहे. हे एकत्रितपणे देशातील रस्ते सुरक्षेची पातळी ठरवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.